Ahmednagar : शेवगावमध्ये दोन गट भिडले! तुफान दगडफेक, वाहनांची तोफफोड
शेवगाव शहरात एका गटाकडून मिरवणुकीचं आयोजन करण्यत आलं होतं. सायंकाळी 5.30 वाजता निघालेल्या या मिरवणुकीवर दुसऱ्या दुसऱ्या गटाने दगडफेक केल्याचं म्हटलं जात आहे. त्यातूनच ही घटना चिघळली आणि दगडफेक सुरू झाली.
ADVERTISEMENT
अहमदनगर शहरात झालेल्या हिंसाचाराच्या घटना विस्मरणात जात नाही, तोच जिल्ह्यातील शेवगामध्ये दोन गटात तुफान राडा झाला. शहरात मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आल्याचा दावा करत दुसऱ्या गट आक्रमक झाला आणि दगडफेक केली. दोन्ही गटांनी रस्त्यावर असलेल्या वाहनांना लक्ष्य करत तोडफोड केली. या घटनेत अनेक घरांच्या काचाही फुटल्या आहेत. पोलिसांनी जमावाला पांगवत शहरात शांतता प्रस्थापित केली. सध्या शहरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
शेवगाव शहरात एका गटाकडून मिरवणुकीचं आयोजन करण्यत आलं होतं. सायंकाळी 5.30 वाजता निघालेल्या या मिरवणुकीवर दुसऱ्या दुसऱ्या गटाने दगडफेक केल्याचं म्हटलं जात आहे. त्यातूनच ही घटना चिघळली आणि दगडफेक सुरू झाली.
शेवगावमध्ये नेमकं काय घडलं?
मिरवणुकीवर अज्ञातांनी दगडफेक केली. त्यानंतर मिरवणुकीत सहभागी लोक भडकले आणि त्यांनीही दगडफेक करण्यास सुरुवात केली. दोन्ही गटांकडून करण्यात आलेल्या दगडफेकी लोकांच्या वाहनांसह घराचंही नुकसान झालं आहे.
हे वाचलं का?
भडकलेल्या जमावाने दुकानांवरही दगडफेक सुरू केली. त्यामुळे बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली. जमावाने रस्त्यावरील दुचाकी, चारचाकी वाहनांची तोडफोड केली. त्याचबरोबर घरांच्या दिशेनेही दगड भिरकावले, त्यामुळे खिडक्या फुटल्याचे प्रकारही घडले.
हेही वाचा >> Akola Violence : दगडफेक-जाळपोळ अन् गोळीबार; दोन गटात तुफान राडा का झाला?
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी परिसरात धाव घेतली. संतप्त जमावाला रोखण्याचे प्रयत्न पोलिसांनी सुरू केले. मात्र, दोन्ही गटाकडून दगडफेक होत असल्याने पोलिसांनी लाठीमार केला. काही वेळानंतर जमावाला पांगवण्यात पोलिसांना यश आलं.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> Karnataka : सर्वात मोठा विजय! BJP, JD(S) चे बालेकिल्ले काँग्रेसने कसे बळकावले?
दरम्यान, या घटनेनंतर शेवगामधील काही भागांत पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली. प्रत्येक चौकात पोलीस तैनात करण्यात आले असून, या घटनेचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
ADVERTISEMENT
अहमदनगरमध्येही झाला होता हिंसाचार
गेल्या महिन्यात म्हणजेच एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अहमदनगर शहरातही दगडफेक आणि जाळपोळीची घटना घडली होती. दोन गट समोरासमोर आल्यानंतर वाद झाला होता. गजराज नगर भागात ही घटना घडली होती. जमावाने चारचाकी आणि दुचाकी वाहनं जाळली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT