Balu Dhanorkar : काँग्रेसवर आघात! चंद्रपूरचे खासदार धानोकर यांचं दिल्लीत निधन
काँग्रेस पक्षाचे चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचं दिल्लीत निधन झालं. ते 47 वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी बाळू धानोकर यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना दिल्ली येथे हलवण्यात आले होते.
ADVERTISEMENT
मंगळवारची सकाळ महाराष्ट्र काँग्रेससाठी आणि राजकीय वर्तुळासाठी वाईट बातमी घेऊन उगवली. काँग्रेस पक्षाचे चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचं दिल्लीत निधन झालं. ते 47 वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी बाळू धानोकर यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना दिल्ली येथे हलवण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना 30 मे रोजी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
ADVERTISEMENT
बाळू धानोकर यांना 26 मे रोजी अचानक त्रास सुरू झाला. त्यांना किडनी स्टोनची व्याधी असल्यानं शस्त्रक्रियेसाठी नागपूर येथील रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान उपचारादरम्यान गुंतागुंत निर्माण झाल्याने त्यांना तातडीने नवी दिल्ली येथील मेदांता रुग्णालयात हलवण्यात आले होते.
हेही वाचा >> 2024 लोकसभा निवडणूक: BJP-शिंदेंसाठी धोक्याची घंटा, मविआ मारणार मोठी मुसंडी?
नवी दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी पहाटेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव दिल्ली येथून नागपूरमार्गे वरोरा येथे (30 मे) दुपारी 1.30 वाजता वरोरा येथील निवासस्थानी आणण्यात येणार आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
आज (30 मे) रोजी दुपारी 2 वाजेपासून 31 मे रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत वरोरा येथील निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर 31 मे रोजी वणी – वरोरा बायपास मार्ग येथील मोक्षधाम येथे सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
कट्टर शिवसैनिक ते काँग्रेस खासदार
चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर महाराष्ट्रातील एकमेव काँग्रेस खासदार होते. 47 वर्षात कट्टर शिवसैनिक ते ते काँग्रेसचे खासदार असा त्यांचा प्रवास राहिला आहे.
ADVERTISEMENT
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती हे बाळू धानोरकर यांचं मूळ गाव. शिवसेनेच्या स्थानिक शाखेचे प्रमुख, तालुका प्रमुख ते जिल्हाप्रमुख असा प्रवास करीत युतीच्या काळात त्यांनी वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघ बांधून काढला.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> विधानसभेनंतर आता मुंडे भावा-बहिणीची लोकसभेत लढाई?
धानोरकर यांना 2009 साली शिवसेनेने याच मतदारसंघातून तिकीट दिले. मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला. पुढे 2014 पर्यंत काम करत त्यांनी मतदारसंघात बांधणी केली आणि शिवसेनेच्या तिकिटावर ते आमदार झाले.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत धानोरकर हे काँग्रेसमध्ये गेले. त्यांना काँग्रेसने चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. भाजपचा बाल्लेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात धानोरकरांनी काँग्रेसचा झेंडा फडकावला.
अशोक चव्हाण भावूक
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी दुःख व्यक्त केलं आहे. “काँग्रेसचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचं अचानक आजारी पडणं, अत्यवस्थ होणं आणि दोन दिवसांत त्यांच्या निधनाचे वृत्त येणं, हे सारं अकल्पनीय, अविश्वसनीय व धक्कादायक आहे. राजकीय कारकिर्द बहरास येत असताना ऐन उमेदीच्या काळात त्यांचं अकाली निधन प्रत्येकाला अस्वस्थ करणारं आहे”, असं चव्हाण यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा >> राष्ट्रवादी की काँग्रेस, पुण्यात वरचढ कोण; आकड्यात समजून घ्या कुणाची ताकद जास्त?
“खासदार बाळूभाऊ धानोरकर आमचे एक सक्षम, उर्जावान सहकारी होते, संवेदनशील, कर्तव्यदक्ष व सतत कार्यमग्न असे लोकप्रतिनिधी होते. जमिनीशी नाळ जुळलेले, दांडगा जनसंपर्क आणि सार्वजनिक प्रश्नांची जाण असलेले नेते म्हणून ते सुपरिचित होते. त्यांच्या चेहर्यावर सदोदित दिसणारे हास्य, आपुलकीने बोलणं नेहमी स्मरणात राहील. बाळूभाऊ धानोरकर यांचे निधन माझ्यासाठी वैयक्तिक हानी आहे. या दुःखद क्षणी आम्ही सर्व त्यांच्या कुटुंबियांसमवेत आहोत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली”, अशा भावना अशोक चव्हाण यांनी व्यक्त केल्या आहेत.
ADVERTISEMENT