Delhi News : 6 जणांचा गाढ झोपेतच मृत्यू! नेमकं घडलं तरी काय?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Delhi News to escape cold family lit fireplace in room and slept 6 people died due to suffocation
Delhi News to escape cold family lit fireplace in room and slept 6 people died due to suffocation
social share
google news

Delhi News : राजधानी दिल्लीत (Delhi) एकाच कुटुंबातील चार जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तर दुसर्‍या ठिकाणीही, दोन जणांचा मृत्यू याच कारणामुळे झाला आहे. खरं तर, हे मृत लोक स्वतःचा थंडीपासून बचाव करण्यासाठी, शेकोटी पेटवून खोलीत झोपले होते. यावेळी खोलीत धुराचे लोट पसरले. यानंतर कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या घटनेतही असंच घडलं असून दोघांचा मृत्यू झाला. माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळ गाठून दरवाजा तोडला. (Delhi News to escape cold family lit fireplace in room and slept 6 people died due to suffocation)

ADVERTISEMENT

मिळालेल्या माहितीनुसार, पहिली घटना उत्तर दिल्लीच्या खेडा भागातील आहे. येथील घरात 4 जणांचे मृतदेह सापडले आहेत. यामध्ये पती, पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. घराचा दरवाजा आतून बंद होता आणि खोलीत शेकोटी जळत होती. अशी माहिती पोलिसांनी दिली.

वाचा : Crime : डेटिंग अ‍ॅपवर भेट, ऑफिसमध्येच केला बलात्कार, व्हिडीओ बनवून 26 वर्षीय…

पोलीस अधिकाऱ्यांनी घटनेबाबत काय सांगितलं?

पोलीस अधिकाऱ्यांना प्राथमिक तपासात असे समजले आहे की, थंडीपासून बचाव करण्यासाठी खोलीत शेकोटी पेटवली होती. यानंतर धुरामुळे गुदमरल्याने चौघांचाही मृत्यू झाला. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दोन मुलांपैकी एक 7 वर्षांचा तर दुसरा 8 वर्षांचा आहे. सध्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.

हे वाचलं का?

पश्चिम दिल्लीत दोघांचा मृत्यू!

पश्चिम दिल्लीतील इंद्रपुरी भागात दोन लोक घरामध्ये बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांच्या घरात शेकोटी जळत होती. बेशुद्ध पडल्यानंतर दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यांना वाचवता आले नाही. दोघेही मूळचे नेपाळचे होते.

वाचा : Milind Deora : शिंदेंच्या शिवसेनेत जाण्यामागे देवरांचा ‘हा’ आहे खरा प्लॅन?

मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये एक व्यक्ती 50 वर्षांची होती तर दुसरी 28 वर्षांची होती. अपघाताच्या वेळी दरवाजा आतून बंद होता. थंडीपासून बचाव करण्यासाठी घरात शेकोटी पेटवली होती. गुदमरल्याने दोघांचा मृत्यू झाल्याचे समजते. पोस्टमॉर्टमनंतर खरं काय ते समोर येईल.

ADVERTISEMENT

खोलीत शेकोटी पेटवून त्याच्या धूराने गुदमरून मृत्यू झाल्याच्या घटना यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, शेकोटी किंवा कोळसा जाळल्यानंतर कधीही खोली बंद करून झोपू नये. त्यामुळे खोलीत हळूहळू धूर जमा होऊ लागतो.

ADVERTISEMENT

खोलीत शेकोटी पेटवण्याबद्दल तज्ञ काय म्हणतात?

या प्रकरणाबाबत तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कोळसा किंवा शेकोटी पेटवल्यानंतर कार्बन मोनोऑक्साइडसारखे वायू बाहेर पडतात, जे विषारी असतात. जर कोणी बंद खोलीत जळत्या फायरप्लेससह झोपले तर कार्बन मोनोऑक्साइड वायूची पातळी लक्षणीय वाढते.

वाचा : Milind Deora : 27व्या वर्षी खासदार, मनमोहन सिंगांच्या सरकारमध्ये मंत्री; कोण आहेत देवरा?

कार्बन मोनोऑक्साइडमध्ये कार्बन असतो, ज्याचा मेंदूवर परिणाम होऊ शकतो. यानंतर बंद खोलीत झोपलेली व्यक्ती बेशुद्धही होऊ शकते. जेव्हा एखादी व्यक्ती श्वास घेते तेव्हा धोकादायक कार्बन मोनोऑक्साइड वायू फुफ्फुसात पोहोचतो आणि रक्तात मिसळतो. हे दीर्घकाळ राहिल्यास रक्तातील हिमोग्लोबिन कमी होऊ लागते. यानंतर व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT