Elvish Yadav: रेव्ह पार्टीमध्ये का नेतात नाग, विषारी साप अन् नशा.. काय आहे कनेक्शन?
एल्विश यादवमुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही अडचणीत आले आहे. कारण मुख्यमंत्री शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी गणपती पुजनाला एल्विशला आमंत्रण दिले होते, त्याच्या हस्ते पूजाही केली होती.
ADVERTISEMENT
Snake Venom at Rave Party, Elvish Yadav : बिग बॉस ओटीटी (Big Boss OTT) विजेता एल्विश यादव (Elvish Yadav) सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. एल्विश यादववर अवैधरित्या रेव्ह पार्ट्यांचे आयोजन आणि सापाची तस्करी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याच एल्विश यादवमुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही अडचणीत आले आहे. कारण मुख्यमंत्री शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी गणपती पुजनाला एल्विशला आमंत्रण दिले होते, त्याच्या हस्ते पूजाही केली होती. त्यामुळे आता सातत्याने विरोधकांना मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले जाते आहे. अशात ही स्नेक रेव्ह पार्टी काय असते? सापाच्या विषेचा आणि नशेचा संबंध काय असतो? हे जाणून घेऊयात. (elvish yadav bigg boss ott snake venom at rave party case cm eknath shinde What is the connection between snake venom and intoxication)
ADVERTISEMENT
सापाच्या विषाची नशा कशी करतात?
देशात केवळ 30 टक्के विषारी साप आढळतात. यातील काहींच्या विषाचा मेंदूवर थेट परिणाम होऊन पॅरालिसीसचा अटॅक येतो. तर काहींच्या विषाचा रक्तावर थेट परीणाम होतो आणि रक्त गोठण्यास सुरुवात होते. विषाचा वापर नशेसाठी केला जातो, ज्याचा मेंदूवर परिणाम होतो.
हे ही वाचा : Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा जीआर अन् तारखेचा घोळ! शिंदेंच्या शिष्टमंडळाच्या भेटीत काय घडलं?
सापाच्या विषाची नशा करताना अत्यंत सावधगिरी बाळगली जाते. विषाचा डोस हलका आहे की नाही याची विशेष काळजी घेतली जाते. विषामध्ये इतर काही रसायने देखील मिसळली जातात, ज्यामुळे डोस हलका राहतो. व्यक्ती नशा करू शकतो आणि काही तासांसाठी सुन्न होतो. जोपर्यंत कोब्रा आणि वाइपरचा संबंध आहे, त्यांचे विष रक्त गोठवते.
हे वाचलं का?
शरीरावर कसा परिणाम होतो?
सापाच्या विषामुळे निर्माण होणारी नशा सामान्यतः उपलब्ध असलेल्या नशापेक्षा वेगळा असतो, तो जास्त वेगाने वाढतो आणि अल्कोहोल किंवा ड्रग्सपेक्षा जास्त काळ टिकतो. पण कधी कधी तो धोकादायकही ठरू शकतो. एखाद्याने चुकून सापाच्या विषापासून बनवलेले औषध जास्त प्रमाणात घेतले तर मृत्यूही ओढवू शकतो. रेव्ह पार्टीमध्ये सहभागी असलेल्या काही तरुणांनी आता सापाचे विष नष्ट करण्यास सुरुवात केली आहे. काहींना तर थेट साप चावला आहे. त्यामुळे अशा रेव्ह पार्ट्यांमध्ये सर्पमित्र सापांसह येतात आणि नशा करताना साप चावल्याच्या घटना घडतात.
हे ही वाचा : Maratha Reservation : मुख्यमंत्री अॅक्शन मोडवर! ‘वर्षा’ बंगल्यावरील बैठकीत काय घडलं? Inside Story
औषधासाठी विषाचा वापर
औषधासाठीही सापाच्या विषाचा वापर फार पूर्वीपासून केला जातो. त्यात आता काही लोक त्याचा नशा म्हणूनही वापर करू लागले. कोब्राच्या विषापासून अनेक औषधे तयार केली जातात. हृदयविकाराच्या झटक्यामुळे होणाऱ्या स्मृतिभ्रंशात हे विशेषतः वापरले जातात.
ADVERTISEMENT
विषाची किंमत किती?
सापाचं विष खूपच महागडे विकले जाते, पण त्याहून महागडे कोब्य्राचे विष असते. त्याच्या प्रत्येक थेंबाची किंमत लाखो रुपयांपर्यंत असू शकते. अशा परिस्थितीत जेव्हा सापाच्या विषापासून नशा तयार केली जाते तेव्हा अनेक रसायनांचा वापर करून त्याचे प्रमाण वाढवले जाते.
ADVERTISEMENT
दरम्यान या प्रकरणात रेव्ह पार्ट्या आयोजित केल्याबद्दल आणि नशेसाठी सापाचे विष पुरवल्याबद्दल तसेच परदेशी मुलांचा आमंत्रित केल्याबद्दल एल्विश यादवसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व आरोपींवर वन्यजीव सरंक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केलेअ असता त्यांना 14 दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT