मुंबई Tak Chavadi: नागराज मंजुळेच्या सिनेमात संभाजीराजे करणार काम, साकारणार ‘ही’ भूमिका
माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी स्वराज्य संघटनेची घोषणा केल्यानंतर त्यांच्या नावाची नेहमीच चर्चा होत राहिली आहे. त्यातच मराठा आरक्षणावरूनही त्यांचे नाव नेहमीच चर्चेत राहिले आहे तर आता वेगळ्याच कारणासाठी त्यांचे नवा चर्चेत आले आहे, कारण छत्रपती संभाजीराजे आता काही दिवसात चित्रपटातून रसिकांच्या भेटीला येणार आहेत.
ADVERTISEMENT
chhtrapati sambhajiraje : भारताला राजघराण्यांचा वारसा आणि परंपरा आहे. त्यामुळे अशा राजघराण्यातील वारसदारांच्या आयुष्याविषयी सर्वांनाच अप्रूप असते. त्यातच राजघराण्यातील व्यक्ती राजकारणात असेल तर त्याविषयीच उत्सुकताही आणखी लागून राहिलेली असते. महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज वारसदार (Descendant heirs) म्हणून ओळखले जाणारे माजी खासदार छत्रपती संभाजीराजे (Former MP Chhatrapati Sambhaji Raje) आज मुंबई तकच्या चावडीवर आले होते. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तर तर दिलीच मात्र त्यांनी यावेळी एक खास गोष्ट सांगितली ती म्हणजे नागराज मंजुळे काढत असलेल्या खाशाबा जाधवांच्या (Khashaba Jadhav) आयुष्यावर येत असलेल्या चित्रपटात ते भूमिका साकारणार आहेत.
ADVERTISEMENT
मोठी आणि महत्वाची भूमिका
त्यावेळी राजघराण्यातील त्यांचा जन्म, आयुष्य जगताना येणाऱ्या मर्यादा, फायदे-तोटे याविषयी बोलत त्यांनी अनेक प्रश्नांची अगदी दिलखुलासपणे उत्तरं दिली आहेत. आजच्या त्यांच्या मुलाखतीत बोलताना त्यांनी एक गुपित फोडून सांगितले की, भविष्यात ते एका मराठी चित्रपटातही महत्वाची आणि मोठी भूमिका करणार आहेत. त्यामुळे छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी आता महाराष्ट्रातील लोकांना आणखी उत्सुकता लागून राहिली आहे.
हे ही वाचा >>शिवसेनेनंतर राष्ट्रवादीचं काय होणार? राहुल नार्वेकरांनी कायदाच सांगितला
या चित्रपटात झळकणार
छत्रपती संभाजीराजे यांनी मुंबई तकच्या चावडीवर बोलताना राजकारण, समाजकारण आणि शिक्षणावर अनेक अंगानी बोलत त्यांनी त्यांचा विद्यार्थी ते राजकारण असा प्रवास उलघडून दाखवला. मात्र यावेळी त्यांनी चित्रपटाविषयीही मोठी गोष्ट सांगितली. फँड्री आणि सैराटसारख्या चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे खाशाबा जाधव यांच्या जीवनावर चित्रपट बनवत आहेत. त्या चित्रपटातील शहाजी महाराज यांच्या भूमिकेसाठी माजी खासदार संभाजीराजे यांची विचारणा करण्यात आली आहे. नागराज मंजुळे यांनी त्यांना भूमिकेसाठी विचारल्यानंतर छत्रपती संभाजीराजेंनीही आता होकार देत संभाजीराजे यांचे आजोबा शहाजी महाराज यांची भूमिकेसाठी तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
शरीरयष्टी जशीच तशी
छत्रपती संभाजीराजे यांनी मुंबई तक चावडीवर बोलताना सांगितले की, नागराज मंजुळेंनी सांगितले की, तुम्ही तुमच्या आजोबांसारखे दिसता. त्यांच्या नाकाची ठेवण जशी होती, तशी तुमच्या नाकाची ठेवण आहे. तुमची शरीरयष्टी तशीच आहेत, तुम्ही ती भूमिका करणार का, त्यावर मी होकार दिला असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे येत्या काही दिवसात छत्रपती संभाजीराजे खाशाबा जाधव यांच्या जीवनावर येत असलेल्या चित्रपटात दिसणार आहे.
हे ही वाचा >> मुंबई Tak Chavadi: अफजल खान, औरंगजेबाच्या कबरीबाबत संभाजीराजे छत्रपती थेट म्हणाले, ‘शिवाजी राजांनी…’
ADVERTISEMENT