Hari Narke Death : ‘दोन उलट्या झाल्या अन्…’; नरकेंचा मृत्यू कसा झाला?

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Hari Narke Death News : cabinet minister chhagan bhujbal gets emotional after hari narke passed away.
Hari Narke Death News : cabinet minister chhagan bhujbal gets emotional after hari narke passed away.
social share
google news

Hari Narke Lates News : ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत आणि प्राध्यापक हरी नरके यांचं निधन झाले. हरी नरके हे ज्येष्ठ नेते, कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांचे जवळचे सहकारी होते. ते महात्मा फुले समता परिषदेचे उपाध्यक्षही होते. त्यामुळे छगन भुजबळ यांना नरके यांच्या निधनाचा धक्का बसला. हरी नरकेंबद्दल बोलताना भुजबळांचा कंठ दाटून आला. यावेळी त्यांनी नरकेंचा मृत्यू कसा झाला, याबद्दल माहिती दिली.

‘एबीपी माझा’वृत्तवाहिनीला बोलताना भुजबळांनी हरी नरकेंबद्दल भावना व्यक्त केल्या. छगन भुजबळ म्हणाले, “9 ऑगस्टच्या कार्यक्रमात असताना अतिशय धक्कादायक बातमी मला कळाली. मी विचार करू शकत नाही की, हरी नरके आमच्यात नाहीत. फुले-शाहू-आंबेडकरवादी ही जनता आहे, त्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. कारण महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या बाबतीत फार जुनी पुस्तकं शोधून काढून लिखाण… ऐतिहासिक ज्या गोष्टी घडल्या, त्या लोकांसमोर आणण्याचं काम त्यांनी केलं.”

‘त्यांच्यासारखा माणूस आम्हाला कोण भेटणार?’

भुजबळ म्हणाले की, “महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचं काम किती महत्त्वाचं होतं, या सगळ्याबाबतीत त्यांनी तारीख वारासह अनेक पुस्तकांत वादविवाद करून पटवून दिले. महात्मा फुले समता परिषदेचे ते आधारस्तंभ होते. आम्हाला काळजी पडलीये की, यांच्यासारखा मनुष्य जो अभ्यास करणारा, इतिहासात जाऊन शोधणारा… कोण भेटणार आहे?”, अशी खंत भुजबळांनी व्यक्त केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

वाचा >> पुरोगामी चळवळीचा शिलेदार गेला! हरी नरके यांचे निधन

“नायगावचं सावित्रीबाई फुलेंचं घर, त्यांचं स्मृतिस्थळ आपण निर्माण केलं. त्यांनी पुढाकार घेतला होता. त्याप्रमाणे ते घर तयार केलं. कितीतरी पुस्तकं त्यांनी लिहिलीत. गेल्या वर्षभरापासून ते आजारी होते. त्यांना लिलावती रुग्णालयात 15-20 दिवसांसाठी दाखल केले होते. एक-दोन महिन्यांपूर्वी राजकोटच्या रुग्णालयात गेले होते. तिथे बरं वाटत असल्याचे ते म्हणाले होते”, असंही भुजबळ यांनी सांगितलं.

मुंबई येत असताना झाल्या उलट्या

हरी नरके यांच्या प्रकृतीबद्दल सांगताना भुजबळ म्हणाले, “त्यांना मी सांगितलं की, मुंबईतील, पुण्यातील चांगल्या डॉक्टरकडे आपण दाखवू या. परंतू त्यांनी त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. आज मला असं कळलंय की, ते मुंबईत येत असतानाच सकाळी 6 वाजता त्यांना गाडीत दोन उलट्या झाल्या. समीर भुजबळांनी त्यांना एशियन हार्ट रुग्णालयात नेण्यास सांगितलं. समीर भुजबळ तिथे गेले. अतिशय धक्कादायक आणि दुःख देणारी बातमी आहे. त्यांच्याबद्दल बोलायला शब्द नाहीत. आमचं फार मोठं नुकसान झालं आहे”, असं भुजबळ यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

वाचा >> Ncp ECI : राष्ट्रवादी नाव आणि चिन्ह काढून घेतलं जाऊ शकत, पण…; शरद पवारांनी काय सांगितलं?

“फुले-शाहू-आंबेडकर महामंडळावर ते होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोचे पुस्तक तयार केले होते. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांची मूळ चित्रं त्यांनी शोधून काढली होती. आमच्या पुरोगामी चळवळीचा सपोर्ट हरी नरके होते. ओबीसी आयोगावरही त्यांनी काम केले होते. आरक्षणाबद्दलही ते सातत्याने माहिती पुरवत होते. आठवणी तर खूप आहे. मी हॉस्पिटलमध्ये पोहोचतोय. बोलेन कधीतरी, पण बोलण्यापलीकडचे हे सगळं दुःख आहे”, असे बोलताना भुजबळांचा कंठ दाटून आला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT