मोठी बातमी! रायगडच्या हरिहरेश्वर किनाऱ्यावर संशयास्पद बोट, बोटीत आढळल्या तीन AK-47 रायफल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मेहबूब जमादार

ADVERTISEMENT

रायगड: रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर समुद्रकिनारी बेवारस स्थितीत एक बोट आढळली आहे. या नौकेत काही हत्यारं असल्याची माहिती समोर आली आहे. समुद्र किनाऱ्यावर अडकलेल्या बोटला काही लोकांच्या मदतीने बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. बोटीत तीन AK-47 रायफल आढळल्याने जिल्ह्यात हाय अलर्ट (Raigad Red Alert) जारी करण्यात आला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमिवर रत्नागिरीतमध्येही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरीच्या लँडिंग पॉईंटवर बंदोबस्त वाढवला आहे. हरिहरेश्वर बोट घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी हा बंदोबस्त वाढवला आहे.

श्रीवर्धनच्या आमदार अदिती तटकरे काय म्हणाल्या?

श्रीवर्धनच्या आमदार अदिती तटकरे माध्यमांशी बोलताना म्हणाल्या ”मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात येऊन तत्काळ माहिती द्यावी. स्पेशल टीमची नेमणूक करा. रेड अलर्ट जाहीर करून रायगडच्या जनतेच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना कराव्या. गृहविभाग यासंदर्भात काय उपाययोजना करणार आहे.” अशा विविध मागण्या अदिती तटकरे यांनी केल्या आहेत.

हे वाचलं का?

बोटीवर सापडल्या तीन AK-47

दरम्यान एटीएस प्रमुख विनित अग्रवालसह त्यांचे पथक रायगडकडे रवाना झाले आहेत. ही भरकटलेली स्पीडबोट असलेल्याची माहिती सुत्र देत आहेत. महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी ही बोट पकडली गेली त्यावेळी बोटीवर एकही व्यक्ती हजर नव्हती. त्यामुळे वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. बोटवरती एकून तीन रायफल सापड्याची माहिती आहे, परंतु या रायफल डमी आहेत की ओरीजनल याचा तपास सुरु आहे.

घटनेबाबत पोलिसांनी काय माहिती दिली?

रायगडचे एसपी अशोक धुधे यांनी हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्याजवळ बोटीमध्ये एके ४७ सापडल्याबद्दल दुजोरा दिला आहे. परंतु ही बोट स्पीड बोट आहे की दुसरी कुठली याबाबत त्यांनी अद्याप माहिती दिलेली नाही. तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही ऑस्ट्रेलियन मेक बोट आहे. हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्याजवळ बोटीवरील लोकांनी तटरक्षक दलाला त्यांच्या प्रवेशाची माहिती दिली नव्हती असेही माहिती आहे.

ADVERTISEMENT

काय म्हणाले एटीएस प्रमुख विनीत अग्रवाल?

हरिहरेश्वरमध्ये आढळून आलेली बोट ही अधिकारीक बोट असल्याचे दिसते आहे. ते दहशतवादाच्या उद्देशानेही असू शकतो, कदाचित ती दुसऱ्या देशातील देखील असू शकते. ही एक बेवारस बोट आहे, आम्ही सर्व शक्यता तपासत असल्याचं एटीएस प्रमुख विनीत अग्रवालम्हणाले आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT