Viral: ‘डोक्यावर पदर, तोंंडात गुटखा..’ नव्या नवरीचा कहर.. पोलीस स्टेशनात झाला राडा!
उत्तर प्रदेशामध्ये एक विचित्रच घटना घडली आहे. बायकोला गुटखा खाण्याची इतकी सवय जडली की, गुटखा खाऊन कुठंही थुंकत असल्यामुळे त्याने थेट हे प्रकरण पोलिसात दाखल केले. त्यावेळी पत्नी म्हणाली की, मी नवऱ्याला सोडेन पण गुटखा खाणं बंद करणार नसल्याचे सांगितल्यामुळे पोलिसांनाही आता धक्का बसला आहे.
ADVERTISEMENT
Husband Wife : उत्तर प्रदेशातील आग्रा (Agra Uttar Pradesh) येथे सुखी संसार एका क्षुल्लक कारणामुळे मोडण्याच्या मार्गावर आला आहे. महिलेच्या सासर आणि माहेरच्या लोकांनी आधी पोलिसात आणि नंतर कुटुंब समुपदेश केंद्राचा आधार घेतला तरी एकाच गोष्टीवर आता दोन्ही कुटुंबं हटून बसली आहेत. त्यामुळे आता माघार कोण घेणार असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. आग्रामध्ये असलेल्या एका कुटुंब समुपदेशन केंद्रात (Family Counseling Center) विचित्र घटना घडली आहे. ती घटना समजताच अनेकांना त्याचा धक्का बसला आहे. एका कुटुंबात आलेल्या सुनेला गुटखा (Gutkha) खाण्याचे व्यसन जडले होते, तिच्या त्या व्यसनामुळे आता घटस्फोटापर्यंत ती गोष्ट गेली आहे. पतीसह घरातील सगळ्यांनीच तिने गुटखा सेवन करू नये म्हणून समजावण्याचा प्रयत्न केला नाही, मात्र ती पदराखाली तिच्या व्यसनानुसार गुटखा खातच राहिली.
ADVERTISEMENT
दोन्ही कुटुंबं समोरासमोर
घरामध्ये तिच्या व्यसनामुळे हा कलह चालूच असताना आता सुनेने नवऱ्याचे दुसऱ्या एका महिलेबरोबर अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला आहे. त्याबाबत तिने पोलिसात थेट तक्रारही दाखल केली आहे. सुनेने पोलिसात तक्रार दाखल केल्यामुळे हे प्रकरण आता कुटुंब समुपदेश केंद्रात गेले आहे. त्यानंतर ती दोन्ही कुटुंबं समोरासमोर आली आहेत. या दोन्ही घटनेतील वादामुळे आता एक दुसराच प्रकार समोर आला आहे. नवऱ्याने आपल्या बायकोवर गुटखा खाण्याचा आरोप केला आहे. बायकोला गुटखा खाण्याचे व्यसन असल्याचे समजल्यापासून त्याने तिला समजवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तिला सांगूनही तिने गुटखा खाणे बंद केले नव्हते.
हे ही वाचा >> Virat Kohli शी पंगा घेणारा ‘हा’ खेळाडू IPL मधून ‘आऊट’, कारण…
कुठंही असते थुंकत
बायकोच्या व्यसनामुळे त्रस्त असलेल्या नवऱ्याने सांगितले आहे की, बायको सकाळी उठल्यापासून तोंडावर पदर घेते आणि गुटखा खाते, गुटखा खात असल्याने ती कुठंही थुंकत असते. त्यानंत तिला अनेक वेळा समजूनही सांगण्यात आले. मात्र तिने कधी ऐकलेच नाही. तिच्या त्या व्यसनामुळेच नवऱ्याने तिला सोडून दिले आणि त्यानंतर तिने नवऱ्यावर अनेक गंभीर आरोप लावले आहेत.
हे वाचलं का?
गुटखा सोडणार नाही
छत्तामध्ये राहणाऱ्या मुलीचं लग्न शहागंज येथील युवकाबरोबर झाले होते. लग्न झाल्यानंतर ती सासरी आल्यापासूनच तिने गुटखा खायला सुरुवात केल्याचे तिच्या सासरच्या मंडळीने सांगितले. तिच्या त्या व्यसनाबद्दल सासरच्या मंडळीने तिला किती तरी वेळा समजून सांगितले होते. तरीही ती पदर तोंडावर घेऊन गुटखा खात होती, मात्र तिच्या त्या कुठंही थुंकण्याच्या सवयीमुळे तिचं गुटखा खाण्याचं व्यसन लपून राहिलं नाही. त्यामुळे गुटखा खाण्यावरून वादही विकोपाला गेला, आणि नवऱ्याने तिच्या त्याच गुटखा खाण्याच्या व्यसनाला कंटाळून तिला सोडून दिले. त्यामुळे हे प्रकरण नंतर पोलिसात गेले आणि नंतर ते कुटुंब समुपदेशन केंद्रात गेले.
नवऱ्याचे अनैतिक संबंध
ज्या प्रमाणे नवऱ्याने बायकोवर गुटखा खाण्याचा आरोप केला आहे, त्याच प्रमाणे बायकोनेही त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामध्ये तिने म्हटले आहे की, माझा नवरा गुजरातमध्ये नोकरीला आहे. त्यामुळे गुजरातमध्ये त्याचे दुसऱ्याच मुलीबरोबर अनैतिक संबंध आहेत. त्यातच मला मुलं झाले नसल्यामुळे सासरच्या मंडळीने मला मारहाण करून घरातून हाकलून दिल्याचा गंभीर आरोप केला आहे.
ADVERTISEMENT
संसार मोडायची वेळ
या सर्व घटनेबद्दल कुटुंब समुपदेश केंद्रातील डॉ. अमित गौड यांनी सांगितले की, एका कुटुंबातील विवाहितेला गुटखा खाण्याच्या तिच्या सवयीमुळे तिचा संसार मोडायची वेळ आली आहे. तर तिचा नवरा म्हणतो की, बायकोनं फक्त गुटखा खाणं सोडून द्यावं तर बायको म्हणते की म्हणते मी गुटखा खाणं सोडणारच नाही. या दोन्ही घटना समजून सांगितल्यानंतरही पत्नी गुटखा खाण्यावर अडून बसली आहे, त्यामुळे अजून तरी या घटनेवर कोणताही तोडगा निघाला नाही.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> मनोज जरांगेंचा भुजबळांवर पलटवार, ‘पाय तोडण्याची भाषा करणाऱ्यांनी आम्हाला…’,
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT