‘तुला एक दिवस चांगलाच धडा शिकवीन’, अजित डोवाल मीरा बोरवणकरांबाबत असं का म्हणाले होते?
मॅडम कमिशनर हे आत्मचरित्र लिहून महाराष्ट्राबरोबरच राजकीय वातावरण ज्या मीरा बोरवरणकर यांच्यामुळे ढवळून निघाले आहे. त्यांच्या मुलाखतीमुळे आता आणखी खळबळ उडाली आहे. राजकारण्यापासून पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत चालत असलेल्या अनेक भ्रष्टाचाराच्या मुद्यावर त्यांनी खुलासा केला आहे.
ADVERTISEMENT
Meera Borwankar: माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांचे ‘मॅडम कमिशनर’ आत्मचरित्र (Madam Commissioner’ Autobiography) प्रसिद्ध होताच राज्यातील राजकारण ढवळून निघाले. राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात मीरा बोरवरणकर यांच्या आत्मचरित्रातील अनेक घटनांमुळे खळबळ उडाली. त्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांच्या येरवडा तुरुंगप्रकरणातील (Yerawada Jail) जमिनीवरुन केलेल्या आरोपामुळे राजकीय भूकंप झाला. त्यानंतर आज मुंबई तकला त्यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये अनेक गोष्टींचा खुलासा केल्यामुळे जोरदार खळबळ उडाली आहे.(i will teach you good lesson one day why ajit doval was furious with meera borvankar)
ADVERTISEMENT
भ्रष्टाचाराने पोखरलेली व्यवस्था
राज्यातील सामान्य नागरिकांपासून ते लोकप्रतिनिधीपर्यंत आणि पोलीस शिपायांपासून ते पोलीस महासंचालकापर्यंत कशा पद्धतीने भ्रष्टाचार चालू असतो अशा अनेक गोष्टींवर त्यांनी आपली परखड मतं व्यक्त केली आहेत. आजच्या दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याबद्दलही काही गोष्टींबाबत मोठा खुलासा केला आहे.
हे ही वाचा >> Crime : ”बलात्कार झाल्याचं कोणालाच सांगू नको, नाहीतर…”, पोलिसांनीच पीडितेला…
अजित डोवालांनाच थेट इशारा
मुंबईमध्ये त्यांनी मुंबई क्राईमचे काम करत असताना विकी मल्होत्रा प्रकरणी तपासासाठी त्यांनी मुंबई पोलिसांची एक पथक ज्यावेळी दिल्लीला पाठवले होते. त्यावेळी त्यांनी सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांना अजित डोवाल यांच्याबरोबर पंगा घेतला होता. त्यावेळी त्यांनी मी तुम्हाला एक दिवस चांगलाच धडा शिकवीन असं म्हणत त्यांनी त्यांच्याबरोबर पंगा घेतला होता. त्या घटनेची आठवण सांगताना त्यांनी मुंबई पोलीस अधिकाऱ्यांच्या कामाचे कौतुक करत त्यांनी पोलीस प्रशासनात असलेल्या भ्रष्टाचारावरही बोट ठेवले.
धाडस मुंबई पोलिसांचं
विकी मल्होत्रा प्रकरणाची माहिती सांगताना त्या म्हणाल्या की, हे प्रकरण 2005 मध्ये घडले होते. मुंबई पोलिसांकडून काही कॉलची माहिती घेतली जात होती. त्यावेळी एका फोनची माहिती काढल्यानंतर त्याच्या तपासासाठी कोलकात्ता येथे पोलिसांचे पथक पाठवण्यात आले होते. मात्र त्यावेळी तिथे यश आले नाही. त्यानंतर मुंबई पोलिसांचे एक पथक दिल्लीला पाठवण्यात आले. त्यावेळी तपास करुन विकी मल्होत्रा यांचे नाव त्यातून स्पष्ट झाले होते.
ADVERTISEMENT
पोलीस दाऊदकडून सुपारी घेतात
त्यासाठी दिल्ली पोलिसांची मदतही घेण्यात आली. मात्र त्यावेळी अजित डोवाल यांच्या हस्तक्षेपामुळे मीरा बोरवणकर आणि अजित डोवाल यांच्यामध्ये ठिणगी पडली. त्यावेळी त्यांनी त्यांना मी तुम्हाला धडा शिकवीन असा थेट इशाराच दिला होता. त्याकाळात मुंबई पोलिसांवर आरोप करण्यात आले होते की, मुंबई पोलीस हे दाऊदकडून सुपारी घेऊन काम करतात असा गंभीर आरोप करण्यात आला होता. मात्र त्यामध्ये काही तथ्य नव्हतं असंही मीरा बोरवणकर यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Hemant Patil : मराठा आरक्षणासाठी शिवसेना नेत्याने दिला खासदारकीचा राजीनामा
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT