India Today Conclave Mumbai 2023 : शिंदे, पवार, फडणवीसांसोबत राजकीय गप्पा, ‘या’ सेलिब्रिटी लावणार हजेरी

मुंबई तक

ADVERTISEMENT

india today conclave mumbai politics society films businessman participate shinde fadnavis pawar sule sharad pawar urfi javed eknath shind
india today conclave mumbai politics society films businessman participate shinde fadnavis pawar sule sharad pawar urfi javed eknath shind
social share
google news

India Today Conclave Mumbai 2023: मुंबईत आजपासून इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह सुरू होत आहे. दोन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमामध्ये राजकारणी, अभिनेत्यांपासून ते अर्थशास्त्र, व्यवसाय आणि विज्ञानाच्या क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ व्यक्ती सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम हॉटेल ग्रँड हयात (Grand Hyatt) येथे होणार असून आज पहिल्या दिवशी या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.

ADVERTISEMENT

दिग्गज येणार एकत्र

इंडिया टुडे ग्रुपचे ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह’मधून नेहमीच जगभरातील उद्योजक, लेखक, अभिनेते आणि राजकारण्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जातो. इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमधून घडणाऱ्या घटनांवर चर्चा करण्यासाठी तज्ज्ञ आणि दिग्गज लोकांना एकत्र आणून विचारमंथन केले जाते. 2002 पासून हा मंच तयार केला असून त्याच्या माध्यमातून विविध विषयावर चर्चा केली जाते.

हे ही वाचा >>Hemant Patil : शिंदेंच्या खासदाराला स्टंटबाजी भोवली! पोलिसांनी दाखल केला अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

युतीचे राजकारणावर झडणार चर्चा

या कार्यक्रमात राजकारणापासून अर्थकारण, मनोरंजन आणि घडणाऱ्या अनेक घटनांवर यामध्ये चर्चा रंगणार आहे. कार्यक्रमाची सुरुवातच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होार आहे. त्यामध्ये युतीचे राजकारण आणि सध्याच्या गुंतागुंतीच्या राजकारणावर चर्चा केली जाणार आहे. तर भारतातील ब्रिटीश उच्चायुक्त अ‍ॅलेक्स एलिस यांच्या उपस्थितीत G-20 जागतिक घटना घडामोडींवरही चर्चा केली जाणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

महिला शास्त्रज्ञांचे विश्व

या चर्चांबरोबरच अंतराळ संशोधनात आघाडीवर असलेल्या महिला शास्त्रज्ञांवरही कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅस्ट्रोफिजिक्सचे संचालक डॉ. अन्नपूर्णी सुब्रमण्यम आणि आदित्य सोलर मिशनचे प्रकल्प संचालक निगार शाजी हे यामध्ये सहभागी होणार आहेत.

‘समान नागरी कायद्यावरही चर्चा ‘

कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक यांच्याबरोबर बँकिंगच्या भविष्याबाबत चर्चा होणार आहे. तर सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असलेली अभिनेत्री उर्फी जावेदही एका सत्रात सहभागी होणार आहेत. तर दुपारी 3 वाजता समान नागरी कायद्यावरही चर्चा होणार आहे. यामध्ये भाजप नेते आणि राज्यसभा खासदार सुशील कुमार मोदी, एआयएमआयएमचे प्रवक्ते वारिस पठाण, महिला हक्क कार्यकर्त्या आणि वकील फ्लेव्हिया अ‍ॅग्नेस यांचा समावेश असणार आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> अजित पवार गटाच्या भूमिकेनं भाजपचं वाढणार टेन्शन! शिंदे सरकार काय करणार?

‘G-20’ परिषदेवरही चर्चा

भारताच्या शिखर परिषदेतीलही अनेक घटना घडामोडींवर यावेळी चर्चा केली जाणार आहे. त्यामध्ये भारताचे G20 शेर्पा अमिताभ कांत सहभागी होणार आहेत. तर दुपारी 4 वाजता आरएसएसची 100 वर्षे या विषयावरही चर्चा केली जाणार आहे. या सत्रात स्वपन दासगुप्ता, डॉ.विक्रम संपत, डॉ.शमसुल इस्लाम, निलांजन मुखोपाध्याय सहभागी होणार आहेत. सायंकाळी 5 वाजता क्रिकेट विश्वचषकावर चर्चा होणार आहे. त्यामध्ये सुनील गावस्कर आणि हरभजन सिंग सहभागी होणार आहेत. तर संध्याकाळी 6 वाजता राष्ट्रवादी आणि INDIA ध्येय धोरणांवर चर्चा केली जाणार आहे. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचा समावेश असणार आहे. या कार्यक्रमाची सांगता बॉलिवूडच्या नव्या चेहऱ्यांच्या उपस्थित होणार आहे.

ADVERTISEMENT

भारत विरुद्ध I.N.D.I.A’ वर चर्चा

इंडिया टुडे कॉन्क्लेव्हचा दुसरा दिवसही तितकाच महत्वाचा असणार आहे. गुरुवारी सकाळी 10.30 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या भवितव्यावर बोलणार आहेत. तर आदित्य ठाकरे यांचे अधिवेशन होणार आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा होणार आहे. तर आणखी एका महत्त्वाच्या सत्रात ‘भारत विरुद्ध I.N.D.I.A’ या विषयावर चर्चा होणार आहे.
दुपारच्या सत्रात पटकथाकार विशाल भारद्वाज, अली फजल, वामिका गब्बी यांचाही समावेश असणार आहे. गांधी-आंबेडकर याविषयावर मनोज मित्ता, मिलिंद कांबळे, नरेंद्र जाधव आणि तुषार गांधी चर्चा करणार आहेत.

सद्य परिस्थिती आणि महिला

या कार्यक्रमाबरोबरच सध्याच्या युगातील महिलांना काय हवे आहे. त्यावर भूमी पेडणेकर, कुशा कपिला, शहनाज गिल, डॉली सिंग, शिबानी बेदी आणि रिया कपूर या विषयावर सहभागी होणार आहेत. भारतीय बाजारपेठ आणि त्याच्या विकासावर चर्चा होणार आहे.

हे ही वाचा >> Ajit Pawar : अजित पवारांची मुख्यमंत्र्यांवर नाराजी? देवगिरीवरील बैठकीत काय घडलं, तटकरे स्पष्टच बोलले…

भविष्यातील निवडणुकीवर रंगणार गप्पा

तर भविष्यातील 2024 ची सार्वत्रिक निवडणूक कोण जिंकणार? यावर प्रियांका चतुर्वेदी, राहुल शेवाळे, गौरव भाटिया आणि सुप्रिया श्रीनेट आपले मत व्यक्त करणार आहेत.  कार्यक्रमानंतर समारोपच्या मनोरंजनाच्या कार्यक्रमामध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या उपस्थित हा कार्यक्रम होणार आहे. तर दिग्दर्शक आणि पटकथा लेखक अ‍ॅटली यांच्यासोबत ब्लॉकबस्टर की कहानीवर चर्चा होणार आहे. ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह मुंबई-2023’ हा केवळ एक कार्यक्रम नाही तर तो एक समृद्ध अनुभव आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT