‘कालपर्यंत जो मुलगा माझ्यासाठी रडायचा त्याने…’ Priya Singh ने अश्वजीतबद्दल काय सांगितलं?
ठाण्यातील एका आयएएस अधिकाऱ्याच्या मुलावर गर्लफ्रेंडच्या अंगावर कार घालण्याचा आणि तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
Priya Singh Case : ठाण्यातील एका आयएएस अधिकाऱ्याच्या मुलावर गर्लफ्रेंडच्या अंगावर कार घालण्याचा आणि तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एमएसआरडीसीच्या (MSRDC) व्यवस्थापकीय संचालकाचा विवाहित मुलगा अश्वजित गायकवाड याने गर्लफ्रेंड प्रिया सिंगसोबत झालेल्या वादानंतर तिच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप आहे. माहितीनुसार, वादाचे कारण अश्वजीतचे लग्न झाले होते आणि त्याने हे गर्लफ्रेंडपासून लपवून ठेवले होते. (Instagram Influencer Priya Singh Accident Case in Thane Maharashtra Mumbai What She told About Ashwajit Gaikwad)
ADVERTISEMENT
प्रिया सिंहसोबत नेमकं काय घडलं?
11 डिसेंबरला अश्वजीतने प्रिया सिंगला सांगितले की, तो त्याच्या एका मित्रासोबत कार्यक्रमात जाणार आहे. यावर प्रिया म्हणाली, ‘त्या रात्री मी एका कार्यक्रमात होते. मी त्याची वाट पाहत होते, पण तो आला नाही. तो जिथे होता तिथे मी त्याला भेटण्यासाठी सोमवारी पहाटे साडेचार वाजता घोडबंदर रोडवरील एका हॉटेलजवळ पोहोचले. अश्वजीत आधीच पत्नीसोबत तिथे होता. मी अचानक तिथे पोहोचेन, असा विचारही त्याने केला नसेल, यामुळे तो अस्वस्थ झाला.
वाचा : Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन खासदार लोकसभेतून निलंबित
मी तिथे त्याला काहीच बोलले नाही. मी तिथून बाहेर आले आणि जोरजोरात रडू लागले. मला त्याच्याशी बोलायचं होतं. बाहेर आल्यावर त्याने वाद घालण्यास सुरुवात केली. त्याने यावे आणि माझ्याशी याबद्दल बोलावे अशी माझी इच्छा होती.’
हे वाचलं का?
पुढे प्रिया सिंह म्हणाली, ‘अश्वजीत माझ्याशी विचित्र वागत होता. त्याने त्याच्या ड्रायव्हरला पाठवलं. ड्रायव्हरने मला गाडीत बसण्यास सांगितलं. मी सुरूवातीला नकार दिला पण शेवटी ड्रायव्हरसोबत गाडीत गेले. त्याने गाडी सर्व्हिस रोडवर नेली. काही वेळाने अश्वजीत गाडीजवळ आला. मी त्याला माझ्याशी एकट्यात बोलण्यास सांगितलं.
वाचा : धावत्या रेल्वेत तरूणाचा थंडीने गेला जीव, 300 किमीपर्यंत कुणालाच लागला नाही पत्ता!
पण तो आला नाही. तिथे त्याचे काही मित्रही होते. सगळे मला शिव्या देऊ लागले. त्याचे मित्र आमच्या नात्यात ढवळाढवळ करायचे. तो त्यांना काहीच बोलत नव्हता. यानंतर अश्वजीतने माझा गळा आवळला, बेदम मारहाण केली. अश्वजीत आपल्या मित्रांसोबत कारमध्ये बसला आणि पळ काढत होता. मी गाडीसमोर उभे राहिले, कारण माझे सामान गाडीत होते. यानंतर कार माझ्या अंगावर घातली. सागर गाडी चालवत होता. मी रस्त्यावर पडले होते. यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. जो मुलगा कालपर्यंत माझ्यासाठी रडायचा त्याने माझी ही अवस्था केली.’
ADVERTISEMENT
प्रिया म्हणाली, ‘सुरुवातीला मला कोणीही मदत केली नाही. माझा पाय लटकत होता. एक मुलगा स्कूटरवर आला. त्याने मला मदत केली. यानंतर आरोपी पुन्हा दुसऱ्या गाडीत पाहण्यासाठी आले होते. अखेर मी रूग्णालयात पोहोचले. आरोपींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, अशी माझी मागणी आहे.’
ADVERTISEMENT
11 डिसेंबरला प्रिया सिंहने अश्वजीतला पत्नीसोबत पाहिले होते. यामुळे दोघांमध्ये भांडण झालं. यादरम्यान अश्वजीत आणि त्याचे तीन मित्र रोमिल, प्रसाद पाटील आणि सागर शेळके यांनी प्रियाला मारहाण केली. यानंतर तिला कारने चिरडून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.
वाचा : छगन भुजबळ कुटुंबासह ‘त्या’ मोठ्या प्रकरणातून सुटले, कोर्टाने काय दिला निकाल?
प्रिया सिंह आहे तरी कोण?
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत राहणारी 26 वर्षीय प्रिया सिंह इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर आहे. तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. प्रिया सिंह महाराष्ट्रातील एमएसआरडीसीचे एमडी यांचा मुलगा अश्वजित गायकवाड याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती.
अश्वजित गायकवाडसह इतर दोघांविरूद्ध गुन्हा दाखल
पोलिसांनी आरोपी अश्वजित गायकवाड आणि इतर दोघांविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम ३२३ (जाणूनबुजून दुखापत करणे), २७९ (रॅश ड्रायव्हिंग), ५०४ (नियमांचे उल्लंघन करण्याच्या हेतूने जाणूनबुजून अपमान) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT