Irshalwadi Landslide : निसर्गासमोर टेकले हात! जिथे झाला मृत्यू, तिथेच होणार अंत्यसंस्कार, कारण…

सौरभ वक्तानिया

ADVERTISEMENT

Irshalwadi landslide deaths : 16 dead bodies found while rescue opration.
Irshalwadi landslide deaths : 16 dead bodies found while rescue opration.
social share
google news

Irshalwadi Landslide Deaths : 19 जुलैची रात्र इर्शाळवाडीसाठी काळरात्र ठरली. 50 घरांचं गाव 20 फूट मातीच्या ढिगाराखाली गाडलं गेलं. 218 लोकवस्तीच्या ठाकर समुदायाच्या या वाडीवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. एका रात्रीत इर्शाळवाडीचे अवशेष शिल्लक राहिले असून, आतापर्यंत 16 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. पण, त्यांच्यावरही आता जिथे मृत्यू झाला, तिथेच अंत्यसंस्कार करण्याची परिस्थिती ओढवलीये. अत्याधुनिक यंत्रणा असूनही प्रशासनाला निसर्गसमोर हात टेकवावे लागलेत.

ADVERTISEMENT

खालापूर तालुक्यात इर्शाळगडाच्या कुशीत इर्शाळवाडी वस्ती. मुख्य रस्त्यापासून वर जायचं म्हणजे दोन टेकड्या पार करून जाव्या लागतात. इर्शाळवाडीत जाणं किती कठीण याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधान परिषदेत दिली आणि बचाव कार्य करणं किती आव्हानात्मक आहे, तेही सांगितलं.

इर्शाळवाडी हे इर्शाळगडाच्या डोंगरात वसलेले गाव असून, सरळ चढण असल्याने केवळ शारीरिकदृष्ट्या सक्षम असलेली किंवा व्यक्तीच अशा ठिकाणी जाऊ शकते. त्यामुळे मदत कार्यासाठी आलेल्या काही जणांना त्रास सुरू झाल्यानं अर्ध्या वाटेतूनच खाली पाठवण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेत बोलताना दिली होती.

हे वाचलं का?

वाचा >> Irshalwadi Landslide : …म्हणून इर्शाळवाडीवर कोसळली ‘मड फ्लो’ दरड!

हे गाव इतके उंचावर आहे की, दोन डोंगर चढून तिथे पोहोचावं लागतं. त्यामुळे आता ठिकाणी जे मृतदेह सापडले आहेत. त्यांना खाली आणणे अशक्य असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. बचाव व मदत कार्य करताना जवानांनी आतापर्यंत 13 जणांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढले आहेत.

ADVERTISEMENT

हे मृतदेह खाली आणणे अशक्य असल्याने ज्या ठिकाणी ही दुर्घटना झाली, तिथेच बाजूला एक कॅम्प उभारण्यात आला असून, तिथे त्यांचे शवविच्छेदन केले जाणार आहे. त्यानंतर दुर्घटना झालेल्या परिसरातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

ADVERTISEMENT

वाचा >> Irshalwadi Landslide : “आम्ही हाताने माती उकरून लेकरं बाहेर काढली”

जखमींनाही खाली घेऊन जाणं जिकिरीचे काम बनले आहे. कारण सरळ 30 अशांत ही चढण असून, पाऊसामुळे त्यांना खाली आणणं अवघड झाल्याने आता डॉक्टरांना घटनास्थळी नेण्यात आलं आणि तिथेच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मदत कार्य थांबवलं…

मध्यरात्रीपासून सुरू असलेले बचाव व मदत कार्य थांबवण्यात आलं. सायंकाळी 5 वाजता प्रशासनाने हा निर्णय घेतला. गेल्या काही तासांपासून इर्शाळगड भागात संततधार पाऊस सुरू असून, पावसातच बचाव कार्य सुरू होतं. पण, पावसाचा जोर कायम असल्याने पुन्हा दरड कोसळण्याची भीती, तसेच रात्री रेस्क्यू करणं शक्य नसल्याने प्रशासनाने मदत व बचाव कार्य थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे एनडीआरएफचे जवान डोंगरावरून खाली परतले आहेत.

20 फूट मातीच्या ढिगाऱ्याखाली दबली इर्शाळवाडी

बचाव कार्यात सहभागी झालेल्या स्वयंसेवी संस्थेच्या व्यक्तीने सांगितलं की, ‘आम्ही दोघांना बाहेर काढलं. हा परिसर खूप कठीण आहे. प्रचंड पाऊस आहे. 20 फूट मातीच्या ढिगाऱ्याखाली हे गाव दबलं गेलं आहे.’ या दुर्घटनेत ज्याचा भाऊ या ढिगाऱ्याखाली दबला गेला आहे, त्या व्यक्तीने सांगितलं की, वाडीत 50 घरं होती आणि दोनशेपक्षा जास्त लोक दबले असतील, असं त्यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT