Irshalwadi Landslide : …म्हणून इर्शाळवाडीवर कोसळली ‘मड फ्लो’ दरड!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Khalapur Irshalwadi News : landslide in maharashtra's raigad district, many famillies trapped under the debris.
Khalapur Irshalwadi News : landslide in maharashtra's raigad district, many famillies trapped under the debris.
social share
google news

Irshalwadi landslide latest News : आक्रोश आणि दुःखाच्या किंकाळ्यांनी इर्शाळगडही शहारून गेलाय. गडाच्या डोंगरमाथ्याला असलेल्या इर्शाळवाडीचा दरडीने घात केला. 20 जुलैच्या मध्यरात्री भलीमोठी दरड इर्शाळवाडीवर कोसळली अन् क्षणाधार्त गाव उद्ध्वस्त झालं. या घटनेने अवघा महाराष्ट्र हळहळला असून, गावावर दरड कोसळण्याची काही कारणं समोर आली आहेत. विशेष म्हणजे रायगड जिल्ह्यातील दरडी कोसळू शकतात, अशा भागांना इशाराही आधीच दिला गेला होता.

ADVERTISEMENT

सर्तक संस्थेने इर्शाळवाडी गावावर दरड कोसळण्याची कारण अधोरेखित केली आहे. संस्थेने दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळाच्या जवळील म्हणजे इर्शाळवाडीजवळ असलेल्या खालापूर आणि कर्जत या दोन्ही भागात गेल्या 72 तासांत 600मिलीमीटर पाऊस कोसळला.

इर्शाळवाडी गावावर दरड का कोसळली?

डोंगर उतारावर असलेल्या गावाच्या वरील बाजूस असणारी झाडांची गर्दी परिसरातील मातीची खोली दर्शवते. जी दृश्ये समोर आली आहेत. त्यावरून ही दरड मड फ्लो (चिखलाची) प्रकारची दिसत आहे. दरड कोसळण्याचं कारण सांगताना संस्थेने असं म्हटलं आहे की, कमी कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे मातीची पाणी धारण (पाणी धरून ठेवण्याची क्षमता) क्षमता संपते. त्या ठिकाणी झालेला चिखल उतारावरून घसरून खाली येतो.

हे वाचलं का?

वाचा >> Irshalwadi Landslide : “आम्ही हाताने माती उकरून लेकरं बाहेर काढली”

‘…तर सगळ्यांनाच वाचवता आलं असतं’, काय दिला गेला होता इशारा?

इर्शाळवाडी दरड दुर्घटनेबद्दल या संस्थेने आणखी एक बाब मांडली आहे. रायगड जिल्ह्यातील दरड प्रवण क्षेत्रांसाठी सतर्कतर्फे 19 जुलै रोजी अलर्ट दिला गेला होता, असं या संस्थेने म्हटलं आहे. प्रशासनाकडून वेळीच खबरदारीचे उपाय केले गेले असते, तर ही मोठी जीवितहानी टाळता आली असती, अशी चर्चा आता होत आहे.

ADVERTISEMENT

48 कुटुंबांच्या इर्शाळवाडीत काय घडलं?

या दुर्घटनेतून काही स्थानिक नागरिक वाचले. काही अर्धवट मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. त्यांनी हाताने माती उकरून स्वतःला आणि त्यांच्या मुलांना बाहेर काढलं. अनेक घरं पूर्णपणे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली असून, 100 हून अधिक लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

Irshalwadi News : satark issued landslide warnning for raigad district.

वाचा >> इर्शाळवाडी : दरडीने गिळलं गाव, 5 जणांचा मृत्यू, अनेक लोक ढिगाऱ्याखाली

एनडीआरएफकडून सध्या मदत व बचाव कार्य सुरू असून, केंद्राने आणखी चार तुकड्या इर्शाळवाडीत पाठवल्या आहेत. बाहेर काढण्यात आलेल्या जखमींवर सध्या उपचार सुरू असून, 5 जणांचे मृतदेह आतापर्यंत हाती लागले आहेत. मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT