Parle-G चा ‘तो’ चेहरा बदलला, कोण आहे पॅकेटवरचा हा मुलगा? नेमकं घडलं काय?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Is Parle-G's that girl face changed who is this boy on the packet Instagram Viral Post
Is Parle-G's that girl face changed who is this boy on the packet Instagram Viral Post
social share
google news

Parle-G Instagram Viral Post : जेव्हा-जेव्हा बिस्किटांची नावं घेतली जातात तेव्हा डोळ्यांसमोर पहिलं नाव पार्ले-जी (Parle-G) ब्रँडचं येतं. यासोबतच बिस्किटांच्या पॅकेटवर छापलेली ती पार्ले गर्ल आठवते. पण, आता पॅकेटवरून पार्ले गर्ल खरंच गायब झाली आहे का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. कारण, कंपनीने स्वतःच आपल्या अधिकृत इंस्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर एका नवीन चेहऱ्यासह पॅकेटचा फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये पार्ले गर्लऐवजी, एका इंस्टाग्राम इन्फ्लूएन्सरचा फोटो दिसत आहे. एवढंच नाही तर नावही बदलले आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे समजून घेऊया. (Is Parle-G’s that girl face changed who is this boy on the packet Instagram Viral Post)

ADVERTISEMENT

स्वातंत्र्यापूर्वी पार्ले-जी ची सुरूवात!

देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी सुरू झालेल्या पार्ले-जी बिस्किटचे चाहते काही कमी नाही आहेत. त्यामुळेच एका छोट्याशा कारखान्यात कँडीपासून सुरू झालेली पार्ले ही कंपनी आज 17000 कोटी रुपयांहून अधिक किमतीची कंपनी बनली आहे. . या क्षेत्रात अनेक ब्रँड बाजारात आले आणि गेले पण पार्ले-जीचा दबदबा कायम आहे.

वाचा : Ram Mandir : “उद्धव ठाकरेही अयोध्येला जाणार, पण…”, राऊतांनी सांगितला प्लॅन

2011 मध्ये, निल्सन सर्वेक्षणानुसार, पार्ले-जी हा जगातील सर्वाधिक विकला जाणारा बिस्किट ब्रँड म्हणून उदयास आला होता. त्याच्या पॅकेटवर एका गोंडस मुलीचे चित्र सर्वांचे लक्ष वेधून घेते आणि ती या बिस्किट ब्रँडची ओळख बनली. पण नुकताच पार्ले कंपनीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर बिस्किट पॅकेटचा एक नवीन फोटो शेअर केला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामुळे पार्ले गर्लची जागा दुसऱ्याने घेतली आहे की काय अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.

हे वाचलं का?

व्हायरल व्हिडीओत नेमकं काय?

पार्ले कंपनीने पार्ले गर्लच्या फोटो ऐवजी एका इंस्टाग्राम इन्फ्यूएन्सरच्या फोटोने सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. हा फोटो सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर झेरवान जे बनशाहचा आहे. केवळ फोटोतच नाही तर पॅकेटवर पार्ले-जी ऐवजी बनशाह-जी हे नावही लिहिले आहे. खरं तर, झेरवान बनशाहने त्याच्या एका व्हिडीओ फॉलोअरला विचारले होते की, जर तुम्ही पार्लेच्या मालकाला भेटलात, तर तुम्ही त्यांना पार्लेसर, मिस्टर पार्ले की पार्ले जी म्हणाल?

वाचा : Maratha Reservation March : मुंबईकरांना मनोज जरांगे यांची विनंती, म्हणाले…

या व्हिडीओमध्ये अनिल कपूरच्या ‘राम-लखन’ चित्रपटातील ‘ए जी ओ जी’ हे प्रसिद्ध गाणेही बॅकग्राउंडमध्ये वाजत आहे. बनशाहचा हा व्हिडीओ झपाट्याने व्हायरल झाला आणि यूजर्स त्यावर विविध प्रकारे प्रतिक्रिया देत आहेत.

ADVERTISEMENT

कंपनीची इंस्टाग्रामवर गंमतीदार पोस्ट

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओने केवळ इंस्टा यूजर्सना आकर्षित केले नाही तर पार्ले कंपनीचेही लक्ष वेधून घेतले. मग काय, कंपनीनेही या मनोरंजक व्हिडीओला प्रतिसाद म्हणून काहीतरी पोस्ट केले, जो चर्चेचा विषय बनला. पार्ले-जी ने आपल्या अधिकृत अकाउंटवर कमेंट करत बनशाह जी, तुम्ही आम्हाला OG देखील म्हणू शकता असं म्हटलं. यासोबतच पार्ले-जीने बिस्किट पॅकेटच्या रॅपरवर पार्ले गर्लच्या ऐवजी बनशाहचा फोटो पोस्ट केला आहे.

ADVERTISEMENT

फोटोच्या कॅप्शनमध्ये कंपनीने लिहिले की, ‘जेव्हा तुम्ही पार्ले-जीच्या मालकाला काय म्हणायचे याचा विचार करत असाल, तेव्हा तुम्ही एक कप चहाच्या कपसोबत आनंद घेण्यासाठी आम्हाला तुमचं आवडतं बिस्किट म्हणू शकता @Bunshah जी.’

वाचा : Ajit Pawar Amol Kolhe : “हिंमत उरली नाही का?”; कोल्हेंचा अजित पवारांवर पहिला वार

बिस्किटाच्या पाकिटावर छापलेली पार्ले-गर्ल कोण?

पार्ले-जी बिस्किटांच्या कव्हरवर दिसलेल्या मुलीबाबत बराच वाद झाला आहे. पार्ले या मुलीसाठी तीन महिलांच्या नावावर दावा करण्यात आला आहे. यामध्ये नीरू देशपांडे, सुधा मूर्ती आणि गुंजन गंडानिया यांच्या नावाचा उल्लेख होता. मात्र, हा कोणाचाही फोटो नसून, ६० च्या दशकात मगनलाल दहिया नावाच्या चित्रकाराने हे चित्र काढले असल्याचे पार्ले यांनी स्पष्ट केले. पार्ले-जीला ओळख मिळवून देण्यात या मुलीच्या चेहऱ्याचा मोठा वाटा मानला जातो.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT