Kirit Somaiya : सोमय्यांचे सर्व व्हिडीओ मुंबई पोलीस घेणार ताब्यात, कारण

सौरभ वक्तानिया

ADVERTISEMENT

Mumbai Crime branch BJP ex MP Kirit Somaiya video case : The crime branch will take the help of technical experts and cyber experts to investigate the matter.
Mumbai Crime branch BJP ex MP Kirit Somaiya video case : The crime branch will take the help of technical experts and cyber experts to investigate the matter.
social share
google news

Kirit Somaiya Latest News : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचे नको त्या अवस्थेतील व्हिडीओ व्हायरल झाल्याने मोठी खळबळ माजली. विधिमंडळ अधिवेशनात याचे पडसाद उमटले. या प्रकरणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीची घोषणा केली. फडणवीस यांनी घोषणा केल्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाच तपास सुरू केला असून, चॅनेलला पत्रही पाठवलं आहे. (Mumbai police Crime branch unit will investigate the authenticity of the video and entire matter.)

ADVERTISEMENT

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी किरीट सोमय्या यांचे आठ तासांचे व्हिडीओ आपल्याकडे आहे, असा दावा करत उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे पेन ड्राईव्ह दिला. त्याचबरोबर अनिल परब यांनीही या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी विधान परिषदेत केली. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी सखोल चौकशीची घोषणा केली.

किरीट सोमय्या व्हिडीओ प्रकरण मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे

दरम्यान, एकीकडे फडणवीसांनी चौकशीची घोषणा केली, तर किरीट सोमय्या प्रकरणी महिला आयोगाने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास मंगळवारीच (18 जुलै) सुरू केला. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे प्रकरण तपासासाठी दिलं गेलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

वाचा >> Kirit Somaiya : ‘महिलांना फोन करून…’, सोमय्यांच्या व्हिडीओवर अनिल परबांनी काय सांगितलं?

व्हायरल झालेले व्हिडीओ खरे की खोटे याची सत्यता गुन्हे शाखेकडून बघतली जाणार आहे. त्याचबरोबर हे संपूर्ण प्रकरण काय, याचाही तपास केला जाणार आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी गुन्हे शाखा पोलीस तंत्रज्ञान विशेषज्ज्ञ आणि सायबर तज्ज्ञांची मदत घेणार आहेत. मराठी चॅनेलवरून किरीट सोमय्यांचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला होता. हे व्हिडीओ ताब्यात घेतले जाणार असून, तसे पत्र पोलिसांकडून चॅनेलला देण्यात आले आहे.

ती महिला कोण? फडणवीसांनी सभागृहात काय सांगितलं?

शिवसेनेचे (युबीटी) आमदार अनिल परब यांनी ती महिला कोण हे महाराष्ट्राला कळायला हवं, असा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, ‘ती महिला कोण आहे? असं आपण विचारलं आहे… तशी ओळख आपल्याला सांगता येत नाही. ती ओळख त्या केसपुरती पोलिसांना सांगितली जाईल. पोलीस कायद्याच्या चौकटीत राहून ती ओळख देखील हुडकून काढतील.’

ADVERTISEMENT

वाचा >> Kirit Somaiya : नीलम गोऱ्हेंसमोरच काढला व्हिडीओंचा पेन ड्राईव्ह, अंबादास दानवे म्हणाले…

“कुठलंही प्रकरण दाबणं, मागे टाकणं, लपवणे असं काहीही होणार नाही. सोमय्यांनी देखील पत्र लिहून मागणी केली आहे की, चौकशी करा. आपण स्वत:ही मागणी करत आहात की, चौकशी करा. याची अतिशय सखोल आणि वरिष्ठ स्तरावरची चौकशी केली जाईल”, असं फडणवीस विधान परिषदेत बोलताना म्हणाले होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT