Manipur violence : मणिपूर पुन्हा पेटलं! लोकांनी भाजपचं कार्यालयाच जाळलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Manipur Violence once again Agitators set BJP offices on fire two students are missing. AFSPA has been extended by six months increasing violence.
Manipur Violence once again Agitators set BJP offices on fire two students are missing. AFSPA has been extended by six months increasing violence.
social share
google news

Manipur Violence: मणिपूरमध्ये पुन्हा एकदा परिस्थिती बिघडत चालली आहे. मैतेई आणि कुकी समाजात (Maitai and Cookie community) सुरु असलेला हा वाद काही शांत होण्याची काही चिन्हे दिसत नाहीत. एकीकडे मणिपूरमध्ये हिंसाचार वाढत आहे. तर दुसरीकडे सहा महिन्यांसाठी अफ्स्पा वाढवण्यात आला आहे. तर दुसरीकडे आंदोलनकर्त्यांनी भाजपचे कार्यालय पेटवून दिले आहे. हिंसाचार पेटल्यानंतर संतप्त झालेल्या जमावाने थौबल जिल्ह्यातील भाजपचे विभागीय कार्यालय पेटवून दिले आहे. आंदोलकांनी (agitators) जोरदार हिंसाचार केल्यामुळे त्यानंतर सुरक्षा दलाने धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र आंदोलकांनी लावलेल्या आगीत भाजपच्या कार्यालयातील सामान जळून खाक झाले आहे. जाळपोळीची घटना घडली असली तरी यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. (manipur violence again bjp office set fire agitators)

ADVERTISEMENT

भाजपचे कार्यालय पेटवले

मणिपूरमध्ये जातीय दंगल पेटल्यानंतर भाजपचे कार्यालय पेटवण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही थोबाल जिल्ह्यातील भाजपची तीन कार्यालये आंदोलनकर्त्यांनी जाळून खाक केली होती. हिंसाचार पेटल्यानंतर जमावाने कार्यालयाचे गेट तोडून खिडक्या फोडून आणि भाजप कार्यालयात उभा असलेल्या कारच्या काचाही फोडण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा >> Ganesh Visarjan 2023 Mumbai : ‘…आता डोळे भरुन आलेत बाप्पा तुला पाहुन जाताना’

आंदोलनात बहुतांश विद्यार्थी

मणिपूरमध्ये मागील 6 जुलैपासून दोन विद्यार्थी बेपत्ता झाले आहेत, त्यांच्या झालेल्या हत्येविरोधात येथील नागरिकांनी जोरदार निदर्शने केली आहेत. बेपत्ता झालेल्या विद्यार्थ्यांवरुनच आंदोलक आणि आरएएफच्या सुरक्षा जवानांमध्ये चकमक झाली आहे. त्यानंतर हिंसक झालेल्या जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दलाकडून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, यावेळी लाठीचार्जही करण्यात आल्याने अनेक नागरिक आणि महिलाही यामध्ये जखमी झाले आहेत. 45 नागरिक जखमी झाले असून या आंदोलनात बहुतांश विद्यार्थी असल्याचे सांगण्यात आले आहे.

हे वाचलं का?

अशांत मणिपूर

मणिपूरमधील हिंसाचार वाढत असल्याने तेथील राज्य सरकारने डोंगराळ भागात लावण्यात आलेला अफ्स्पा 1 ऑक्टोबरपासून 6 महिन्यांनी वाढवण्यात आला आहे. अफ्स्पाची सूचना देण्यात आल्यानंतर सरकारने सांगितले की, मणिपूरच्या 19 पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातील क्षेत्र वगळता संपूर्ण मणिपूर अशांत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत. राज्य सरकारने दिलेल्या क्षेत्रात इम्फाळ, लम्फेल, शहर, सिंगजामेई, सेकमाई, लमसंग, खेडूत, वांगोई, पोरोम्पत, हिंगांग, लमलाई, इरीबुंग, लिमाखोंग, थौबल, बिष्णुपूर, नंबोल, मोइरांग, काकचिन आणि जर्बम या ठिकाणांचा समावेश आहे.

हे ही वाचा >> Deepak Kesarkar: ‘मला 25 कोटींची ऑफर पण…’, केसरकरांच्या वक्तव्यामुळे खळबळ

अफ्स्पा लावण्याचा निर्णय

मणिपूरमधील हिंसाचार वाढत असल्याने सरकारने हा अफ्स्पा लावण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे. मात्र ज्या प्रकारे येथील आंदोलक तीव्र स्वरुपाची आंदोलन करत आहेत. त्यांना शांत करण्यासाठी असा निर्णय घेतला आहे. भाजपचे कार्यालय पेटवण्यात आल्याने परिसरात तणाव पसरलेला होता.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT