Manoj Jarange Patil शिंदे सरकारवर कडाडले! म्हणाले, “आमचे आणखी किती मुडदे पाडायचेत”

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Maratha Reservation Update : Manoj Jarange appealed Maratha community after sunil kamble suicide case
Maratha Reservation Update : Manoj Jarange appealed Maratha community after sunil kamble suicide case
social share
google news

Maratha Reservation Supporter Committed suicide in Mumbai : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी जालना जिल्ह्यातील सुनील कावळे (Sunil Kawale) या आंदोलकाने मुंबईत आत्महत्या केली. या घटनेनंतर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) सरकारवर प्रहार केला. ‘हे पाप सरकारचं आहे. सरकारला आमचे किती मुडदे पाडायचे आहेत’, असं म्हणत जरांगेंनी सरकारला गंभीर इशारा दिला आहे. (Manoj Jarange Patil Reaction On Maratha Reservation supporter suicide in mumbai)

ADVERTISEMENT

सुनील कावळे या मराठा आंदोलकाच्या आत्महत्येबद्दल मनोज जरांगे पाटील यांनी दुःख व्यक्त केलं. मुंबईत माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, “सरकारने का बळी घ्यायचं ठरवलं कळत नाहीये. हे सरकारमुळे आमचे बळी पडायला लागले आहेत. मराठा समाजाला मी हातपाय जोडून आवाहन करतो की, बापानो, भावानो… आरक्षण मिळणार आहे. आपण घेतल्याशिवाय सोडणार नाही.”

हेही वाचा >> Manoj Jarange Patil: ‘राजकारण्यांचे डाव उधळून लावले’, जरांगे पाटलांनी नेमकं ते सांगितलं

हे सगळे पाप सरकारचे, जरांगे भडकले

सुनील कावळे यांच्या आत्महत्येच्या घटनेवर बोलताना जरांगे पाटील पुढे म्हणाले की,”खूप वर्ष दम धरला. आणखी थोडे दिवस दम धरा. मी पुन्हा पुन्हा सांगतो. पोरं बळी जायला लागेल. आत्महत्या करायला लागले, तर आरक्षण घेऊन उपयोग काय? हे सगळं पाप सरकारचं आहे. सरकारला आमचे आणखी किती मुडदे पाडायचे आहेत, माहिती नाही”, असा संताप त्यांनी व्यक्त केला.

हे वाचलं का?

हेही वाचा >> Lalit Patil: ललितच्या महिला मैत्रिणी अन्… नवा ट्विस्ट; ‘त्या’ 2 महिला नेमक्या कोण?

“आमच्या एका बंधुने आत्महत्या केली. तो आता आमच्यात नाहीये. याला पूर्ण जबाबदार सरकार आहे. सरकारने आतातरी त्या भावांचं बलिदान वाया जाऊ देऊ नये. सरकारने तातडीने मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा. नसता २४ ऑक्टोबरनंतर होणारं शांततेतलं आंदोलन सरकारला परवडणार नाही. आम्ही आता हे बलिदान वाया जाऊ देणार नाही”, असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी शिंदे सरकारला दिला आहे.

“…तर बळी पडणार नाही”, जरांगे पाटील काय बोलले?

मराठा समाजाला जरांगे पाटील यांनी आवाहन केलं. यावेळी ते म्हणाले की, “फक्त सरकार जबाबदार आहे. आमच्यावर ही वेळ आलीच नसती. सरकारने जर हक्काच्या असलेल्या आरक्षणाचा विषय तत्काळ मिटवला, तर बळी पडणार नाही. सरकारने मराठा समाजाचा अंत बघू नये. आम्ही आता सरकारला सुट्टी देणार नाही. मराठा समाजाला पुन्हा पुन्हा सांगतो की, वेदना होतात. थोडे दिवस सहन करा. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही”, अशी भूमिका त्यांनी सुनील कावळे यांच्या आत्महत्येनंतर मांडली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT