Manoj Jarange : “फडणवीसांच्या ताटात जेवणारी माणसंच…”, जरांगेंना संताप अनावर

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Manoj Jarange warned devendra fadnavis after bjp leader hits out at him.
Manoj Jarange warned devendra fadnavis after bjp leader hits out at him.
social share
google news

Manoj Jarange Speech : मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी करत मनोज जरांगे सध्या राज्यभर दौरे करत आहेत. रविवारी जरांगे हे लातूर जिल्ह्यात होते. यावेळी बोलताना मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केला. “देवेंद्र फडणवीस यांच्या ताटात जेवणारी माणसंच सध्या मराठा आरक्षणाविरोधात बोलत आहेत”, असा आरोप करत जरांगेंनी गंभीर इशारा दिला. (Manoj Jarange Patil has resorted on Devendra fadnavis)

ADVERTISEMENT

मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केले. “मराठा समाज शांत आहे. देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की, आम्हाला शांत राहू द्या. तुमच्या डोक्यातील विषारी विचार मराठी नेत्यांच्या डोक्यात टाकू नका. त्यांच्या माध्यमातून लोकांमध्ये कलह निर्माण करू नका. अन्यथा तुमचा आमच्याशी सामना आहे”, असा थेट इशारा जरांगे पाटलांनी फडणवीसांना दिला.

Manoj Jarange : “फडणवीसांनी पुन्हा खोड्या सुरू केल्या…”

फडणवीसांचं नाव घेत मनोज जरांगे म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांनी आधी मोठेपणा दाखवला होता. आमचा त्यांच्यावर विश्वास बसायला लागला होता, पण आता त्यांनी पुन्हा खोड्या सुरू केल्याचं दिसत आहे. कारण मराठा आरक्षणाविरोधात जे लोक बोलत आहेत, ते भाजपमधीलच काही मराठा नेते आहेत. जे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहेत. त्यामुळे फडणवीसांनी त्या नेत्यांना समज द्यावी, नाहीतर उघडपणे भूमिका जाहीर करावी. मग आम्हीही बघून घेऊ. या नेत्यांना आवरलं नाही, तर आम्ही तुमचं सगळं बाहेर काढू”, असा इशारा मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांनी दिला.

हे वाचलं का?

हेही वाचा >> बसपा अध्यक्षा मायावतींचा वारसदार ठरला! कोण आहे आकाश आनंद?

छगन भुजबळांना इशारा

जरांगे यांनी छगन भुजबळ यांना नावाचा उल्लेख न करता इशारा दिला. ते म्हणाले, “आपण रागीट लोक आहोत. राग आणू नका. त्यांनी कितीही अपमान केला तरी पचवा. शांत रहा. संयम आणि शांतता दोन्ही सोबत राहू द्या. एकदा आरक्षण मिळालं, मग आपण मोकळे. त्याला (छगन भुजबळ) कुठं जायचं नाही. आपल्याला कुठं जायचं नाही. तो आणि आपण एकाच गल्लीत आहोत. तू (छगन भुजबळ) नुसता बाहेर निघ म्हणा… आरक्षण मिळू द्या फक्त”, असा गर्भित इशारा मनोज जरांगेंनी भुजबळांना दिला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT