“दादा’ आरआर पाटलांबद्दल जे बोलले ते सांगू शकत नाही”, मीरा बोरवणकरांचा स्फोट

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Ex IPS Meera Borwankar serious allegations on Ajit pawar.
Ex IPS Meera Borwankar serious allegations on Ajit pawar.
social share
google news

Meera Borwankar Ajit Pawar : पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्या पुस्तकातील एका चाप्टरने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिलीये. मीरा बोरवणकर यांनी पोलिसांची जमीन बिल्डर देण्यावरून जे घडलं, त्यांची इनसाईड स्टोरी ‘मॅडम कमिशनर’ पुस्तकातून मांडली आहे. यात महत्त्वाचं म्हणजे त्या जमिनीच्या प्रकरणावरुन दादांनी तेव्हाचे गृहमंत्री आरआर पाटील यांच्याबद्दल अशी विधानं केली, जी सांगण्यासारखी नाहीत, असा दुसरा स्फोटक दावा बोरवणकरांनी केला आहे.

ADVERTISEMENT

मीरा बोरवणकर यांनी पुस्तकातील द मिनिस्टर या चॅप्टरमध्ये तेव्हाचे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनी (दादा) येरवडा येथील पोलीस विभागाची मोक्याची जागा बिल्डर हस्तांतरीत करण्यास सांगितले होते. त्याला नकार दिल्यानंतर पालकमंत्र्यांना राग अनावर झाला. त्यांनी हातातील मोठा नकाशा काचेच्या टेबलवर भिरकावला, असं म्हटलेलं आहे.

हेही वाचा >> ‘दादा’ म्हणत होते पोलिसांची जमीन बिल्डरला द्या, मी म्हणाले देणार नाही; मीरा बोरवणकरांचा गौप्यस्फोट

पुढे बोरवणकरांनी पुस्तकात लिहिलेलं आहे की, “नकाशा फेकल्यानंतर पालकमंत्र्यांनी रागात तेव्हाचे महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याबद्दल अशी अनेक विधानं केली, जी न सांगितलेलीच बरी. त्यानंतर मी पालकमंत्र्यांना सॅल्यूट करून निघून गेले”, असा दावा त्यांनी पुस्तकात केलेला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

बिल्डरची कोर्टात धाव

“पोलिसांची जमीन घेण्यासाठी बोली लावणाऱ्या व्यक्तीने १ कोटी रुपये आगाऊ (डिपॉझिट) रक्कम सरकारकडे जमा केलेली होती. त्या बिल्डरने मुंबई उच्च न्यायालयात केस दाखल केली. बिल्डरने त्या जागेसाठी जी बोली लावलेली होती. ती बाजारभावापेक्षा खूपच कमी होती. पुढे माझ्या सुदैवाने त्या व्यक्तीला सीबीआयने 2जी घोटाळ्यात आरोपी केलं”, असंही बोरवणकर यांनी म्हटलेलं आहे.

गृह विभागाची वेगळी भूमिका… सरकारी वकील झाले नाराज…

बोरवणकरांनी म्हटलेलं आहे की, या जागेबद्दल माहिती असलेल्या पोलीस अधिकाऱ्याला मी या प्रकरणाची संपूर्ण डीलची माहिती गोळा करायला सांगितली. काही महिन्यानंतर जेव्हा हे प्रकरण कोर्टात सुनावणीसाठी आलं, तेव्हा मी त्या पोलीस अधिकाऱ्याला सरकारी वकिलांना माहिती देण्यासाठी मुंबईला पाठवलं. पण, वकील नाराज झाल्याचं समजलं. कारण पोलीस विभाग आणि गृहविभागाची भूमिका वेगवेगळ्या होत्या. सरकारने आगाऊ रक्कम स्वीकालेली होती. यावर आयुक्त आणि गृह सचिवांनी तोडगा काढण्याचा सल्ला दिल्यानंतर मी गृह विभागाला या कथित लिलावाप्रकरणी खरमरीत पत्र पाठवलं होतं”, असं बोरवणकर यांनी म्हटलेलं आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Hardik Pandya, Ind vs Pak: ‘मी स्वत:लाच शिवी दिली’, हार्दिक काय म्हणाला?

आरआर पाटलांनी घेतली बैठक

बोरवणकर यांनी पुढे लिहिलेलं आहे की, त्यानंतर आरआर पाटलांनी बैठक बोलावली. त्या बैठकीत मी भूमिकेवर ठाम राहिले. त्यानंतर पाटलांनी सुद्धा त्यांची भूमिका बदलली आणि गृहखातं जागा हस्तांतरित करणार नाही, असा निर्णय घेतला. आरआर पाटलांनी नेहमीच मला पाठिंबा दिला, पण त्यावेळी त्यांचे हात बांधलेले आहेत, असं मला दिसले. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मला सांगितलं की, अधिकारी असो वा माध्यमं कुणाचीच ‘दादा’ला नाही म्हणायची हिंमत नाही”, असं बोरवणकरांनी म्हटलेलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT