Vaijnath Waghmare : सुषमा अंधारेंच्या विभक्त पतीवर जीवघेणा हल्ला, काय घडलं?
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेता सुषमा अंधारे यांचे पती वैजनाथ वाघमारे यांच्यावर हल्ला करण्यात आला. वाघमारे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली.
ADVERTISEMENT
Sushma Andhare Husband : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेता तथा प्रवक्ता सुषमा अंधारे यांच्या विभक्त पतीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. बीडमध्ये वैजनाथ वाघमारे यांच्यावर रविवारी (17 सप्टेंबर) मध्यरात्री टोळक्याने हल्ला केला. या घटनेने बीडमध्ये खळबळ उडाला आहे. (Sushma andhare ex husband vaijnath waghmare attacked by mob in beed)
ADVERTISEMENT
उपनेता सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांची गाडी अडवून हा हल्ला करण्यात आला. यात त्यांच्या गाडीचं नुकसान झालं आहे.
वैजनाथ वाघमारेंची गाडी थांबवली अन्…
17 सप्टेंबर रोजी रात्री वैजनाथ वाघमारे हे अहमदनगर जिल्ह्यातील एका बैठकीला गेले होते. बैठक संपवून ते घरी जात होते. बीड जिल्ह्यातील केज-आडस भागात काही हल्लेखोरांनी वैजनाथ वाघमारे यांची गाडी अडवली. टोळक्याने वाघमारे काही बोलण्याआधीच त्यांच्या गाडीवर हल्ला केला. दगडफेक केली. यात वाघमारे यांना जबर मार लागला असून, गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
हे वाचलं का?
हेही वाचा >> NCP Crisis : ‘…मग आम्ही कोण?’ छगन भुजबळांनी केली शरद पवारांची कोंडी, थेटच बोलले
वाघमारे यांच्यासह दोघे जखमी
वाघमारे यांच्यावर ज्यावेळी हल्ला झाला. त्यावेळी गाडीत त्यांचा मुलगा आणि पुतण्याही होता. अचानक गाडीवर झालेल्या दगडफेकीत त्यांनाही मार लागला आहे. कारच्या काचा फुटल्या. दरम्यान, हा हल्ला कुणी केला? का केला? हे अद्याप समोर आलेले नाही. दुसरीकडे या घटनेने बीड जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
ADVERTISEMENT
हल्ल्यानंतर वैजनाथ वाघमारे काय बोलले?
या घटनेनंतर बोलताना वैजनाथ वाघमारे म्हणाले की, “या हल्ल्याने कुटुंब हादरले आहे. आमच्या जीवाला धोका आहे. हल्लेखोर कोण आहेत माहिती नाही. या हल्ल्याची चौकशी व्हावी, पण मला आणि माझ्या कुटुंबाला सुरक्षा देण्यात यावी.”
ADVERTISEMENT
हेही वाचा >> अजित पवारांनी काढलेल्या चिठ्ठीत निघालं ‘आदित्य’ नाव, CM एकनाथ शिंदे म्हणाले…
वैजनाथ वाघमारे यांनी यापूर्वीही सुरक्षा देण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे त्यांनी ही मागणी केली होती. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे केली आहे. पण, तरीही मला सुरक्षा दिली जात नाहीये. सुरक्षा असती, तर हल्ला झालाच नसता,” असं वैजनाथ वाघमारे यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT