Vasai : वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी निघाली अन् रस्त्यात मृत्यूनं गाठलं…भयंकर घटनेने शहर हादरलं
वसईत एका 27 वर्षीय महिलेची खड्यात पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावर ही घटना घडली आहे. या घटनेने आता परिसरात संताप व्यक्त आहे.
ADVERTISEMENT
मुंबईसह (Mumbai) उपनगरात पडलेल्या पावसामुळे सध्या रस्त्यांची चाळण झाली आहे. त्याचसोबत रस्त्यांवर भले मोठे खड्डे देखील पडले आहेत. य़ा खड्ड्यांमुळे रस्त्यावर अपघातांच्या घटना वाढल्या आहेत. या खड्ड्यांमुळे रस्ते अपघातात अनेकांचा मृत्यू झाला आहे.अशीच एक घटना आता वसईतून समोर आली आहे. या घटनेत एका 27 वर्षीय महिलेची खड्यात पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावर ही घटना घडली आहे. या घटनेने आता परिसरात संताप व्यक्त आहे. (mumbai women died in road accident mumbai ahmedabad highway vasai news)
ADVERTISEMENT
मुबंईच्या मालाड (Malad) पश्चिम परिसरात राहणारी पुजा गुप्ता (27) ही महिला पतीसह दुचाकीवरून वसईच्या (Vasai) वालीवच्या दिशेने निघाली होती. पुजाची बहिण ही वसईच्या वालीव परिसरात राहते. तिचा आज वाढदिवस होता. या बहिणीच्याच वाढदिवसाचे सेलिब्रेशन करण्यासाठी पुजा पतीसह दुचाकीवरून वसईच्या दिशेने निघाली होती.
हे ही वाचा : Mumbai Crime: 17 दिवसांचं बाळ अन्…अंगावर काटा आणणारी कहाणी
या दरम्यान पती पत्नी मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून प्रवास करत होते. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अनेक खड्डे पडले आहेत. असाच एक खड्डा आल्याने दुचाकीवरून पुजा गुप्ता जमिनीवर कोसळल्या होत्या. आणि त्या गंभीररीत्य़ा जखमी झाल्या. त्यामुळे त्यांना नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत माळवली होती.
हे वाचलं का?
महामार्गावरील खड्ड्यामुळे पुजा गुप्ता यांचा मृत्यू झाला. या घटनेने गुप्ता कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला होता आणि परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
हे ही वाचा : Mumbai Crime : अल्पवयीन मुलगी रिक्षात बसली अन् वासनांध चालकाने…धक्कादायक घटनेने शहर हादरलं
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT