नारायण राणेंविरोधात ठाकरे-शिंदे गटाची एकजूट, कोर्टही म्हणालं, चला इथं तरी…

मुंबई तक

ADVERTISEMENT

narayan rane court matter case thackeray shinde group leaders gathering shiv sena mns mumbai latest news
narayan rane court matter case thackeray shinde group leaders gathering shiv sena mns mumbai latest news
social share
google news

मुस्तफा शेख/भाग्यश्री राऊत, मुंबई: शिवसेना (Shiv sena) फुटली… एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) वेगवेगळे झाले. शिंदेंना शिवसेना पक्षही मिळाला. दोन्ही गटातले नेते एकमेकांवर टोकाची टीका करताना दिसतात. पण, याच दोन्ही गटातल्या शिवसैनिकांसह मनसेचे (MNS) नेतेही कोर्टात एकत्र आले आणि ते ही नारायण राणेंविरोधात. कोर्टात नेमकं काय घडलं? नारायण राणेंबद्दलचं ते 2005 साली घडलेलं प्रकरण काय होतं? हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. (narayan rane court matter case thackeray shinde group leaders gathering shiv sena mns mumbai latest news)

ADVERTISEMENT

नारायण राणेंबद्दलचं ते प्रकरण काय होतं? याआधी एकमेकांवर टोकाची टीका करणारे शिवसैनिक कोर्टात एकत्र आले तेव्हा काय घडलं? हे सगळ्याता आधी पाहूयात. शिंदे आणि ठाकरे असे दोन गट झाल्यानंतर शिवसैनिक एकमेकांवर टोकाची टीका करताना दिसतात. पण, हेच शिवसैनिक कोर्टात एकत्र आले होते. यावेळी आमचे प्रतिनिधी मुस्तफा शेख हे स्वतः कोर्टात हजर होते.

नारायण राणेंबाबतचं ‘ते’ प्रकरण काय?

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या शिंदे गटात असलेले सदा सरवणकर, यशवंत जाधव, यांच्यासह ठाकरे गटातले अनिल परब, अरविंद सावंत, विनायक राऊत, अनिल देसाई, मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्यासह एकूण 38 शिवसैनिक कोर्टात हजर होते. अनिल परब आणि यशवंत जाधव यांच्यात चर्चा सुरू असलेलीही यावेळी पाहायला मिळाली, तर विशाखा राऊत आणि किरण पावस्कर यांच्याममध्ये कुजबूज चालली होती. ज्येष्ठ शिवसैनिक दगडू सपकाळ ज्यावेळी कोर्टात आले त्यावेळी दोन्ही गटाच्या शिवसैनिकांनी त्यांचा आदर केला. किरण पावस्करांनी तर पायाला स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यामुळे सर्व शिवसैनिकांमध्ये खेळीमेळीचं वातावरण दिसलं.

तरी किरण पावस्कर आणि अनिल परब यांनी सुनावणी संपेपर्यंत एकमेकांकडे साधं बघितलं सुद्धा नाही. दोन्ही गटातले शिवसैनिक कोर्टात एकत्र आल्यावर असं वेगळं चित्र पाहायला मिळालं. पण, ज्या प्रकरणात शिंदेंची शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेचे नेते एकत्र आले ते नारायण राणेंबद्दलचं प्रकरण नेमकं काय होतं? ते ही समजून घेऊया.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी सामना कार्यालयासमोर शक्तीप्रदर्शन केलं. 2005 साली देखील अशाच प्रकारचं शक्तीप्रदर्शन नारायण राणेंनी केलं होतं. नारायण राणेंनी ज्यावेळी शिवसेना सोडली होती तेव्हाची ही घटना आहे. राणेंनी जुलै 2005 मध्ये सामना कार्यालयाबाहेर जाहीर सभा आयोजित केली होती. राणे यांनी पक्ष सोडला म्हणून लाखो शिवसैनिकांनी त्यांचा निषेध केला. त्यांच्या निषेधार्थ शिवसैनिक सभास्थळी जमले होते. त्यांनी गोंधळ घातला आणि राणेंची सभा उधळण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी शिवसैनिकांना थांबवण्याचा प्रयत्न केलेला. पण, त्यांनाही जुमानतील ते शिवसैनिक कसले. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामध्ये काहीजण जखमीही झाले होते.

ADVERTISEMENT

या प्रकरणात त्यावेळी ठाकरेंसोबत असलेले आणि सध्या शिंदे गटात असलेले सदा सरवणकर, त्यावेळचे शिवसैनिक आणि सध्याचे मनसेचे नेते बाळा नांदगावकर, उद्धव ठाकरे गटाचे अनिल परब, विनायक राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई यांच्यासह एकूण 48 जणांवर गुन्हा दाखल झाला होता. तब्बल 18 वर्ष ही सुनावणी चालली. शेवटी मंगळवारी 6 जूनला या प्रकरणात आरोपांची निश्चिती करण्यात आली.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> मुंबईत खळबळ! विद्यार्थिनीचा वसतिगृहात सापडला विवस्त्र मृतदेह, काय घडलं?

या 18 वर्षात पाच आरोपींचा मृत्यू झाला असून 4 आरोपी कोर्टात हजर नव्हते. याच चार आरोपींपैकी श्रीधर सावंत हे रुग्णालयात उपचार घेत असल्यानं त्यांना मुदत वाढवून देण्यात आली. तसेच हजर नसलेल्या तीन जणांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आला आहे. पण या तीन आरोपींना कोणीही ओळखत नसल्याची नवीन माहिती या सुनावणीत पुढे आली. पण, त्या आरोपींसाठी ही सुनावणी थांबवू नये. आमच्यापैकी कोणीही त्यांना ओळखत नाही. त्यामुळे सध्या कोर्टात हजर असलेल्यांविरोधात सुनावणी घ्यावी आणि बाकीच्यांचा नंतर विचार करावा, असा युक्तीवाद अनिल परबांनी केला.

त्यानंतर कोर्टानं आपले विशेषाधिकार वापरून त्या तीन लोकांना वगळलं आणि कोर्टात हजर असलेल्या 38 जणांवर आरोप निश्चित केले.

6 जूनला मंगळवारी झालेल्या सुनावणीत एकूण 38 जणांवर आरोप निश्चित करण्यात आले. परवानगी नसताना आंदोलन करणं, सामाजिक शांतता भंग करणे, तोडफोड करणे असे आरोप या 38 जणांविरोधात दाखल करण्यात आले. हे आरोप मान्य आहेत का? असं न्यायमूर्ती रोकडे यांनी विचारलं, तेव्हा 38 जणांनी एकमुखानं हे आरोप फेटाळून लावले. तेव्हा चला निदान इथं तरी तुमच्यात एकमत झालं, असं न्यायमूर्ती रोकडे मिश्किलपणे म्हणताच सर्वजण कोर्टात हसताना पाहायला मिळाले.

हे ही वाचा>> Mumbai : “ती म्हणायची सुरक्षारक्षकाची भीती वाटते”, ‘त्या’ तरुणीने वडिलांना काय सांगितलं होतं?

नारायण राणेंची सभा उधळल्याचं हे प्रकरण होतं आणि या प्रकरणात या शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाले होते. पण, या प्रकरणात एकमेकांवर टीका करणारे शिंदे गट आणि ठाकरे गटातले शिवसैनिक एकत्र आलेले पाहायला मिळाले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT