फोन चार्ज करायला गेली अन् गर्भवती महिलेचा…,धक्कादायक घटनेने शहर हादरलं

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

nine months pregnant women dies electrical shock while charge phone shocking story
nine months pregnant women dies electrical shock while charge phone shocking story
social share
google news

Nine months pregnant women dies electrical shock : सध्याची पिढी स्मार्टफोनच्या (Smartphone) इतक्या आहारी गेली आहे की त्याचे दुष्परिणाम देखील विसरत चालली आहे. तसेच या स्मार्टफोनमुळे जीवघेणे अपघातही होऊ शकतात, याचा देखील त्यांना विसर पडत चालला आहे. आता अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत स्मार्टफोन चार्ज करताना एका नऊ महिन्याच्या गर्भवती महिलेचा (Pregnant Women) मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने महिलेच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळलाय, तसेच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान नेमकी ही घटना काय आहे? जाणून घेऊयात. (nine months pregnant women dies electrical shock while charge phone shocking story)

ADVERTISEMENT

ब्राझीलमध्ये ही हादरवून टाकणारी घटना घडली आहे. ब्राझीलच्या कॅम्पिना ग्रांडे परिसरात जेनिफर केरोलायने नावाची गर्भवती महिला राहते. जेनिफर ही अवघ्या 17 वर्षाची असून ती नऊ महिन्याची प्रेग्नेट आहे. दरम्यान जेनिफर घरी असताना तिचा शॉक लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत जेनिफर आणि तिच्या पोटातल्या बाळाचा दुदैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने तिच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे.

हे ही वाचा:  Krishnagiri: युट्यूबवर व्हिडिओ पाहून घरीच डिलिव्हरी…,बायकोसोबत घडली भयंकर घटना

जेनिफरच्या नवऱ्याने दिलेल्या माहितीनूसार, जेनिफर अंघोळी करून बाथरूममधून परतली होती. बाथरूममधून परतल्यानंतर ती लगेच मोबाईल चार्ज करायला गेली. यावेळी तिने एक्सटेंन्शन हातात घेऊन मोबाईल चार्ज करण्याचा प्रयत्न केला. हा मोबाईल चार्ज करताना अचानक स्फोट झाला आणि ती शॉक लागून खाली कोसळली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पतीला या घटनेची माहिती मिळताच त्याने तत्काळ जेनिफरला रूग्णालयात दाखल केले होते. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले, जेनिफरसोबत तिचा बाळ देखील दगावला आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनूसार, जेनिफर अंघोळी वरून आल्याने तिचे शरीर आधीच ओले होते.त्यात तिने एक्सटेंन्शन चालू करताना तिला शॉक लागला आणि तिचा मृत्यू झाला. आईसोबत तिच्या बाळाचा देखील मृत्यू झाला आहे. या घटनेने आता जेनिफरच्या कुटुंबासोबत दुखद घटना घडली आहे.

हे ही वाचा:  Kolhapur Crime News : छेडछाड करणाऱ्या तरुणांना पोलिसांआधीच जमावाने घडवली अद्दल

दरम्यान वरील घटना पाहता वीजेसंबंधी कोणतेही काम करताना काळजी घेणे फार आवश्यक आहे. तुमचे हात-पाय ओले असतील तर ओल्या हातांनी लाईट चालू बंद करणे टाळा.

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT