3 दिवस, 4 रात्र...जावयासोबत पळून गेलेल्या सासूचं काय झालं? कुटुंबियांनाही बसला मोठा धक्का
Viral Love Story : अलिगढमध्ये सासू अनिता आणि जावई राहुल यांच्या अजब प्रेम कहाणीमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. दोघांनीही 8 एप्रिलच्या रात्री घर सोडल्यापासून आतापर्यंत 3 दिवस आणि 4 रात्री उलटल्या आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

जावयासोबत पळून गेलेल्या सासूसोबत काय घडलं?

पोलिसांनी तपासले दोघांचेही सीडीआर डिटेल्स

दोन्ही कुटुंबियांना बसला धक्का
Viral Love Story : अलिगढमध्ये सासू अनिता आणि जावई राहुल यांच्या अजब प्रेम कहाणीमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. दोघांनीही 8 एप्रिलच्या रात्री घर सोडल्यापासून आतापर्यंत 3 दिवस आणि 4 रात्री उलटल्या आहेत. परंतु, ना सासूचा पत्ता लागत आहे. ना जावयाचा...यामुळे दोन्ही कुटुंबियांचं टेन्शन वाढलं आहे. आता पोलिसांच्या सर्व अपेक्षा मोबाईल सीडीआर रिपोर्ट (कॉल डिटेल रेकॉर्ड) वर अवलंबून आहेत.
अलिगढचे डेप्युटी सीएम महेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांनी पळून जाण्याआधी मोबाईल फोन बंद केले होते. यामुळे लोकेशन ट्रेस होत नाहीय. राहुल याआधी रुद्रपूरमध्ये काम करत होता. यामुळे पोलिसांना संशय आहे की, दोघेही रुद्ररूपमध्ये लपले असतील. सासू अनिता आणि तिचा होणारा जावई राहुल, फक्त घर सोडूनच गेले नाहीत.
हे ही वाचा >> M. Com ते पुण्याचा कुख्यात डॉन.. स्वत:ला 'BOSS' म्हणवून घेणारा निलेश घायवळ आहे तरी कोण?
पोलिसांनी तपासले दोघांचेही सीडीआर डिटेल्स
तर घरात लग्नासाठी ठेवलेले दागिने आणि पैसेही लंपास करून गेले. अलिगढमधून पळून जाण्याआधी दोघांनी फोनवरून कोणाकोणाशी संपर्क केला, याचाही तपास पोलीस सीडीआरच्या माध्यमातून काढत आहेत. तसच कोणी त्यांना मदत केली, ज्यामुळे त्यांना लपून बसण्यास मदत झाली, याचाही पोलीस शोध घेत आहेत.
पत्नी पळून गेल्याने पती जितेंद्रला मोठा धक्का बसला आहे. तो आता घरातून बाहेरही जात नाहीय. अशीच परिस्थिती त्याच्या मुलीची सुद्धा आहे. ती अजूनही कोणाशी बोलत नाहीय. होणाऱ्या नवऱ्यासोबत तिची आई पळून गेल्याने पीडित मुलीचं आरोग्य खराब झालं आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचारही सुरु आहेत. आता तिची तब्येत ठिक आहे. पण ती या प्रकरणाबाबत कोणालाही काही सांगत नाहीय.
हे ही वाचा >> लालबागचा राजाच्या मंडपातील कार्यकर्ता ते ठाकरेंचा विश्वासू शिलेदार.. कोण आहेत सुधीर साळवी?
ही धक्कादायक घटना अलिगढच्या मडराक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मनोहरपूर गावात घडली. येथील जितेंद्र कुमार नावाच्या व्यक्तीने याप्रकरणी पोलिसांत तक्रार केली आहे. या घटनेमुळं पोलिसही थक्क झाले आहेत. जितेंद्रच्या मुलीचं 16 एप्रिलला लग्न होतं. लग्नाच्या पत्रिकाही वाटल्या होत्या. कुटुंबात मुलीच्या लग्नाची तयारीही सुरु होती. परंतु, सासू होणाऱ्या जावयाच्या प्रेमात आकंड बुडाली अन् सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.