विठूरायाच्या महापुजेचा मान कुणाला? फडणवीस की अजितदादा? दोन उपमुख्यमंत्र्यांमुळे…
राज्याला दोन उपमुख्यमंत्री लाभल्याने पंढरपुरच्या विठुरायाच्या महापूजेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे हा पेच सोडवण्यासाठी आता न्याय आणि विधी विभागाकडे गेला आहे.
ADVERTISEMENT
Pandharpur Vitthal mandir: राज्याच्या राजकारणात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री (Two Deputy Chief Ministers) मिळाल्यापासून अनेक पेच निर्माण होताना दिसून आले. मात्र आता कार्तिकी यात्रेची विठ्ठलाची होणारी शासकीय पूजा (shasakiy mahapooja) उपमुख्यमंत्र्यांच्याच हस्ते होत असते. मात्र राज्याला दोन-दोन उपमुख्यमंत्री असल्यामुळे विठूरायाच्या पूजेचा नवा पेच निर्माण झाला आहे. कारण आता दोघांपैकी विठ्ठलाची पूजा नेमकी कुणी करायची असा सवाल आता मंदिर समितीसमोर (Temple Committee) निर्माण झाला आहे.
ADVERTISEMENT
समितीचा पेच विधी-न्याय विभागाकडे
पंढरपूरमध्ये 23 नोव्हेंबर रोजी कार्तिकी यात्रा होते आहे. या यात्रेनिमित्त विठूरायाची पूजा ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होते. मात्र आता दोन उपमुख्यमंत्री असल्याने विठ्ठलाची पूजा करण्याचा मान कुणाला द्यायचा असा सवाल मंदिर समितीसमोर निर्माण झाल्यामुळे त्यांनी हा वाद विधी व न्याय विभागाकडे दिला आहे.
विठूरायची पूजा कोण करणार
मंदिर समितीकडून कार्तिकी यात्रेला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बोलवण्यात आले तरी मग विठूरायची पूजा कुणी करायची आणि रुक्मिणीची पूजा कोण करणार असा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळेच हा पेच आता विधी व न्याया विभागामार्फत सोडवण्याचा प्रयत्न मंदिर समितीने केला आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा >>सहा महिने नाही, अजित पवारांना पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवणार -देवेंद्र फडणवीस
मंदिर समितीचा निर्णय
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार आहे. गेल्या कार्तिकी पूजा ही देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते झाली होती. मात्र आता अजित पवारही उपमुख्यमंत्री असल्यामुळे हा विठ्ठलाच्या पूजेचा मान कुणाला मिळणार असा
पेच मंदिर समितीसमोर निर्माण झाला आहे.
हे ही वाचा >> Guardian Minister: अजित पवारांपुढं भाजप नमलं, दादांनी ‘हवं ते’ घेतलं; पालकमंत्र्यांची नवी यादी जाहीर!
दोन्ही उपमुख्यमंत्री सारखेच
मंदिर समितीसमोर हा पेच निर्माण झाला असल्यामुळे विधी व न्याय विभागाकडे हा प्रश्न सोपवण्यात आला आहे. मंदिर समितीने म्हणते की, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री दोघेही आम्हाला सारखेच आहेत. त्यामुळे हा वाद आता विधी आणि न्या विभागाने सोडवावा अशी विनंती केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT