Lok sabha Security Breach : सैन्यात भरती होणार होता, पण… कोण आहे अमोल शिंदे?
अमोल शिंदे 9 डिसेंबरला सैन्यात भरती होणार असल्याचे कुटुंबीयांना सांगून दिल्लीला रवाना झाला होता. दरम्यान यापुर्वी अनेकदा अशाप्रकारे तो भरतीसाठी घराबाहेर पडला होता, त्यामुळे तो असे काही करेल याचा अजिबात संशय आला नाही, असे कुटुंबियांनी पोलिसांनी सांगितले आहे
ADVERTISEMENT
Lok sabha Security Breach, Amol Shinde : संसदेचे हिवाळी अधिवेशन (Winter Session) सुरु असताना बुधवारी सुरक्षेत मोठी चुक झाल्याची घटना घडली. चार तरूणांनी संसदेत घुसखोरी करून अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या (parliament smoke can attack) आणि सरकार विरोधी घोषणाबाजी दिल्या होत्या. या प्रकरणात आता संसदेतून चौघांना तर इतर दोघांनाही अटक झाली होती. या आरोपींवर आता युएपीएच्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी दोन आरोपी हे महाराष्ट्राचे आहेत. यामधीलच एक असलेल्या लातूरच्या (25 वर्षीय) अमोल शिंदेला (Amol Shinde) सैन्यात भरती व्हायचं होत, यासाठी तो 9 डिसेंबरला घरातून दिल्लीसाठी रवाना झाला होता.मात्र आता त्याला संसदेत घुसखोरी प्रकरणी अटक झाली आहे.त्यामुळे हा अमोल शिंदे कोण आहे? हे जाणून घेऊयात.(parliament security breach latur amol shinde prepare for police recruitment family background new delhi)
ADVERTISEMENT
अमोल धनराज शिंदे हा महाराष्ट्रातील लातूरच्या चाकूर तालुक्यातील झरी गावचा रहिवासी आहे. अमोल हा बीए पदवीधर आहे. त्याने संसद भवन परिसरात घुसखोरी करून पिवळ्या रंगाचा अश्रुधुर सोडला होता. इतकंच नाही तर त्याने संसद भवन परिसरात घोषणाबाजी देखील केली होती. त्यानंतर पोलिसांनी अमोल शिंदेला अटक केली होती.
लातूर पोलिसांचे म्हणणे काय?
या अटकेची माहिती मिळताच लातूर पोलिसांनी अमोल शिंदे यांचे घर गाठून त्याच्या कुटुंबियांची आणि शेजाऱ्यांची चौकशी केली होती. या चौकशीनंतर 25 वर्षीय अमोल शिंदे हा अनुसूचित जातीचा असल्याची माहिती मिळाली. त्यासोबत त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. आई-वडील आणि दोन भाऊही रोजंदारीवर काम करतात. एक भाऊ मुंबईजवळ पनवेलमध्ये काम करतो. तर अमोल हा सैन्य आणि पोलीस भरतीची तयारी करत होता.
हे वाचलं का?
हे ही वाचा : अमोल शिंदेच्या मदतीला महाराष्ट्राच्या ‘या’ वकिलाची धाव, कायदेशीर लढा देणार!
लातूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल शिंदे 9 डिसेंबरला सैन्यात भरती होणार असल्याचे कुटुंबीयांना सांगून दिल्लीला रवाना झाला होता. दरम्यान यापुर्वी अनेकदा अशाप्रकारे तो भरतीसाठी घराबाहेर पडला होता, त्यामुळे तो असे काही करेल याचा अजिबात संशय आला नाही, असे कुटुंबियांनी पोलिसांनी सांगितले आहे.
संसदेतील घटनेवर वडील काय म्हणाले?
मी शेतीच करतो.. रोजगारावर जातो.. माझं अमोलशी 10 तारखेला शेवटचं बोलणं झालं.. 9 तारखेला गेला तो इथून. पोलीस भरती आहे, मिलिटरी भरती आहे.. म्हणून मी दिल्लीला चाललोय असं सांगितलं.भरतीची माझी अपेक्षा होती. पण मला नोकरी लागली नाही.. मी एवढं शिकलो पण काय फायदा नाही माझा.
ADVERTISEMENT
आपण काय चोरी केलीए का.. कोणाची लबाडी केली? वर्षाला लाखभर खर्च करत होतो. कोणी पैसे भरून कामाला लागत होते.. हा रोजगार करून किती दिवस करू म्हणून त्याने हे केलं असेल. आता काय करायचं आम्ही? वाचलं तर येईल गावाकडं.. मेलं तर मेलं तिकडं.. काय एक नव्हतं म्हणून बसायचं.. हा त्याने कुठं डाका घातलाय किंवा काही केलंय म्हटलं तर वेगळं..रोज सिमेंट कामाला जात होता.. आम्हाला म्हणून गेला की, पोलीस भरती आहे.. तिकडे जातो.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Security Breach in Lok Sabha : लातूरचा अमोल ते गुरुग्रामचा विशाल, 6 जणांनी कसा रचला कट?
त्याने तिकडे काय केलं आणि काय नाही.. हे आम्हाला काहीच माहीत नाही. फक्त हे पोलीस लोकं आले तेव्हा माहित झालं. मी एवढंच म्हटलं की, पोरगं जिवतं आहे का.. मेलंय तेवढंच सांगा.. तेवढ्याच तयारीत आम्ही आहोत. मेलं तरी माती करायला तयार आहोत आणि जिवंत असलं तरी पण बघायला तयार आहोत. अशी प्रतिक्रिया अमोल शिंदेच्या वडिलांनी मुंबई Tak शी बोलताना दिली.
अमोलने अभ्यासासाठी आणि पोलिस सेवेच्या तयारीसाठी महिन्याला 4 हजार रुपये मागितले होते, पण एवढे पैसे कुठून जमा करणार, आम्ही शेतमजूर आहोत. निवडीसाठी लाखो रुपये खर्च होतील.कधी-कधी तो म्हणत असे की त्याचे वय वाढत आहे आणि खूप प्रयत्न करूनही तो पोलीस सेवेत येऊ शकला नाही. असे अमोलच्या वडिलांनी सांगितले.
आईची प्रतिक्रिया काय?
अमोल काहीच सांगत नव्हता.फक्त म्हणायचा की, माझं काम आहे. मी चाललो दिल्लीला आधी मुंबईला म्हणाला. त्याने मुंबईला गेल्यावर त्याचा अण्णाला फोन केला की, माझा मोबाईल बंद झाला आहे, मी दिल्लीजा जाणार आहे. त्याच्याशी शेवटच्या फोन 9 तारखेलाच झाला असे अमोलच्या आईने सांगितले.
दरम्यान कुठे अमोल लष्करात भरती होणार होता आणि आता दहशतवादी बनला आहे. या प्रकरणी आता अमोलसह त्याच्या साथिदारांवर युएपीएअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा अधिक तपास सुरु आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT