Parliament Security Breach : ‘ते’ तरुण नेमके लोकसभेत शिरले तरी कसे?, ‘ती’ घटना जशीच्या तशी

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

parliament security breach two youth jumps into lok sabha chamber from gallery new delhi news
parliament security breach two youth jumps into lok sabha chamber from gallery new delhi news
social share
google news

Parliament Security Breach : संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून आज लोकसभेत मोठा गोंधळ पाहायला मिळाला. लोकसभेत (Loksabha) कामकाज सुरू असताना प्रेक्षक गॅलरीतून अचानक दोन अज्ञात व्यक्तींनी सभागृहात उड्या घेतल्या होत्या. त्यानंतर खासदारांच्या बाकावर उड्या मारत या तरूणांनी अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या होत्या. या दोन्ही तरूणांना आता ताब्यात घेतले आहे. सागर आणि मनोरंजन असे संसदेत घुसखोरी (Parliament Security Breach) करणाऱ्या तरूणांचे नाव आहे. या दोघांसह संसदेच्या बाहेरील परिसरातून देखील एका महिलेला आणि पुरूषाला ताब्यात घेतले आहे.दरम्यान हे आरोपी तरूण नेमके या संसदेत आणि सभागृहात घुसलेच कसे? आणि भाजप खासदाराच्या नावाच्या विजिटर पास घेऊन या तरूणांनी घसुखोरी केल्याचा आरोप होतो आहे. नेमका हा आरोपी कुणी केला आहे हे जाणून घेऊयात. (parliament security breach two youth jumps into lok sabha chamber from gallery new delhi news)

ADVERTISEMENT

संसदेची सुरक्षाभेदून लोकसभेच्या सभागृहात उडी मारून दहशत माजवणाऱ्या तरुणांनी कर्नाटकाच्या म्हैसूर येथील भाजप खासदार प्रताप सिम्हा यांच्या नावाने विजिटर पास आणले होते, असा दावा बसपाचे निलंबित खासदार दानिश अली यांनी केला आहे. या संबंधित पासचा फोटो देखील समोर आला आहे. या फोटोवर प्रताप सिम्हा यांचे नाव आहे आणि सागर शर्मा या आरोपींचे देखील नाव लिहले आहे. दानिश अली यांच्या या दाव्यानंतर प्रताप सिम्हा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेऊन स्पष्टीकरण दिले आहे.

हे ही वाचा : छमछम! पुणे-साताऱ्यातील डॉक्टरांचे तोकड्या कपड्यातील 4 तरुणींसोबत चाळे, नावे आली समोर

 

हे वाचलं का?

आरोपी सागर आणि मनोरंजन या दोघांनी खासदार प्रताप सिम्हाच्या पासवर लोकसभेत घुसखोरी केली होती. त्यानंतर या दोघांनी प्रेक्षक गॅलरीत पोहोचून लोकसभेच्या सभागृहात उड्या घेतल्या होत्या. खासदारांच्या बाकावर उड्या मारून नंतर बुटातून स्प्रे काढत अश्रूधुर सोडला होता.

दरम्यान लोकसभेच्या सभागृहातच नाही तर संसद परिसरातही दोघांनी घुसखोरी केली होती. या दोघांनी संसद परिसरात जोरदार घोषणाबाजी करत अश्रूधुरांच्या नळकांड्या सोडल्या होत्या. या घटनेनंतर दोघांना अटक करण्यात आली आहे. नीलम (42) आणि अमोल शिंदे (25) असे या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Sindhudurg Crime : 19 वर्षीय दीर 35 वर्षीय वहिनीसोबत भाड्याच्या खोलीत राहिला, नंतर…

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT