Budget 2024 : अर्थमंत्री विसरल्या पण PM मोदींनी सांगितले बजेटमधील ‘ते’ दोन महत्वाचे निर्णय

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

pm narendra modi tell to important decision of budget 2024 nirmala sitharaman interim budget
pm narendra modi tell to important decision of budget 2024 nirmala sitharaman interim budget
social share
google news

Budget 2024, Nirmala Sitharaman, Pm Narendra Modi : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज मोदी सरकारच्या शेवटच्या कार्यकाळातला अंतरिम अर्थसंकल्प (Budget 2024) सादर केला. या अर्थसंकल्पानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi)  यांनी लाईव्ह येऊन देशवासियांना संबोधित केले. यावेळी निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांच्याकडून अर्थसंकल्प मांडताना राहून गेलेल्या दोन महत्वाच्या निर्णयाची माहिती दिली. नेमके हे दोन निर्णय काय आहेत? ते जाणून घेऊयात. (pm narendra modi tell to important decision of budget 2024 nirmala sitharaman interim budget)

ADVERTISEMENT

पंतप्रधान मोदी देशवासियांना संबोधन करताना म्हणाले की, बजेटमध्ये दोन महत्वपूर्ण निर्णय सांगायचे राहून गेले आहेत. रिसर्च आणि इनोव्हेशनमध्ये 1 लाख करोड रूपये फंड बनवण्याची घोषणा झाली आहे. या बजेटमध्ये फिस्कल डेफीसीटला नियंत्रणात ठेवून कॅपिटल एक्सपेंडिचरला 11 लाख 11 हजार 111 करोड रूपयांची ऐतिहासिक उच्चांक दिला गेला आहे. तसेच आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चरच्या निर्माणानंतर तरूणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

हे ही वाचा : Uddhav Thackeray : “आता तुम्ही अतिरेक्यांना शेतकरी समजायला लागलात”, ठाकरेंचा मोदींवर घणाघात

यावेळी निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प मांडताना सांगितलेल्या घोषणा पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी यांनी सांगितल्या आहेत. 40 हजार वदे भारतचे डब्बे बनवून त्यांना सामान्य ट्रेनमध्ये लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सरकारने गरिबांसाठी 4 करोड घरे बनवली आहे, आता 2 कोटी घरे बनवण्याची उद्दीष्ट ठेवले असल्याचे मोदी यांनी सांगितले आहे.

हे वाचलं का?

तसेच सरकारने याआधी 2 करोड महिलांना लखपती दीदी बनवण्याचे लक्ष्य ठेवले होते. आता हे लक्ष्य आम्ही 3 कोटीवर नेले आहे. आयुष्यमान भारत योजनेतून आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांना देखील लाभ मिळणार आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

हे ही वाचा : NCP : शरद पवार राष्ट्रवादीचे सदस्यच नाहीत, अध्यक्ष कसे?; अजित पवार गटाची अखेरची खेळी

दरम्यान हा अर्थसंकल्प गरीब आणि मध्यम वर्गीयांना ताकद देणार आहे. या अर्थसंकल्पातून विकसित भारताची गँरंटी मिळतेय असे देखील पंतप्रधान मोदी यांनी सांगितले आहे. मागच्या सरकारने सर्वसामान्यांवर दशकापासून तलवार लटकवून ठेवली होती,असा टोला देखील मोदींनी राहुल गांधींना लगावला. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठीही खुप महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्यामुळे मी पुन्हा देशवासियांना या ऐतिहासिक बजेटच्या शुभेच्छा देतो,असे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT