Kishor Aware : बापाच्या अपमानाचा बदला! किशोर आवारेंच्या हत्येचं कारण समोर

मुंबई तक

ADVERTISEMENT

pimpri chinchwad Police arrested former corporator Bhanudas Khalde's son Gaurav Khalde in connection with kishor Aware's murder.
pimpri chinchwad Police arrested former corporator Bhanudas Khalde's son Gaurav Khalde in connection with kishor Aware's murder.
social share
google news

-कृष्णा पांचाळ, पिंपरी चिंचवड

ADVERTISEMENT

Pune Crime news : जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे हत्या एक मोठी माहिती समोर आली आहे. आवारे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी माजी नगरसेवक भानुदास खळदे यांचा मुलगा गौरव खळदे याला शनिवारी (13 मे) अटक केली. किशोर आवारे हत्या प्रकरणात तो मुख्य सूत्रधार असल्याची माहिती समोर आली असून, पिंपरी चिंचवडचे एसीपी पद्माकर घनवट यांनी ‘मुंबई Tak’शी बोलताना महत्त्वाची माहिती दिली.

माजी नगरसेवक आणि जनसेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची तळेगाव नगरपरिषदेसमोर हत्या करण्यात आली. कोयत्याने 21 वार आणि 3 गोळ्या झाडत आवारेंना निर्घृणपणे मारण्यात आलं. यात आवारे यांचा जागेवरच मृत्यू झाला. याप्रकरणात आवारे कुटुंबीयांनी पोलिसांत फिर्यादी दिली होती. त्यात राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्यावरही आरोप करण्यात आला. सुनील शेळके यांनी हत्येचा निषेध करत आरोप फेटाळून लावले.

हे वाचलं का?

किशोर आवारेंची हत्या : पोलिसांना तपास काय मिळालं?

या प्रकरणी पिंपरी चिंचवडचे एसीपी पद्माकर घनवट यांनी माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार भानुदास खळदे आणि किशोर आवारे हे जनसेवा पार्टीचे नगरसेवक होते. भानुदास खळदे यांची तळेगाव नगरपालिकेच्या हद्दीत एक स्कीम सुरू होती. त्यासाठी रोड करताना झाडं तोडण्यात आली होती.

हेही वाचा >> NCP MLA: धक्कादायक… राष्ट्रवादीच्या आमदार सुनील शेळकेंविरोधात हत्येचा कट रचल्या प्रकरणी गुन्हा दाखल

नगरपालिकेची परवानगी घेऊन त्यांनी झाडं तोडली होती. पण, किशोर आवारे यांना वाटलं की, त्यांनी परवानगी न घेता झाडं तोडली. त्यामुळे त्यांनी नगरपालिकेला अर्ज दिला की बेकायदेशीरपणे झाडं तोडली असून, त्यांच्यावर कारवाई करावी.

ADVERTISEMENT

किशोर आवारेंनी हात उचलला अन्…

दरम्यान, नंतर किशोर आवारे आणि भानुदास खळदे हे दोघेही नगरपालिकेच्या बैठकीनिमित्ताने समोरासमोर आले होते. त्यांच्यात सीईओंच्या कार्यालयाबाहेरच वाद झाला. त्यांनी सांगितलं की, मी परवानगी घेऊन झाडं तोडली. त्यावर किशोर आवारे म्हणाले की, परवानगी घेतलेली नाही. त्यानंतर वाद वाढत गेला आणि किशोर आवारे यांनी त्यांना सर्वांसमोर थापड मारली. तशी तक्रार भानुदास खळदे यांनी पोलिसांत दुसऱ्या दिवशी दिली होती.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Karnataka : सर्वात मोठा विजय! BJP, JD(S) चे बालेकिल्ले काँग्रेसने कसे बळकावले?

या प्रकरणात पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करून किशोर आवारे यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. त्यांच्यानंतर हा विषय संपला होता. नंतर त्यांच्या मुलाच्या मनात आपल्या वडिलांचा सर्वांसमोर अपमान झाला. त्यांची अप्रतिष्ठा झाली, याचा राग मनात होता. त्यानंतर त्याने हत्या करणाऱ्यांना जमवलं आणि ही हत्या घडवून आणली, असं पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे.

या प्रकरणी सहा आरोपींना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आलेलं आहे. पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवडचे एसीपी पद्माकर घनवट यांनी दिली.

कोण आहे गौरव खळदे?

-गौरव खळदे हा सिव्हिल इंजिनिअर आहे. तो त्यांचा बांधकाम व्यवसाय संभाळतो.

-गौरव खळदे आणि हत्या करणारा शाम निगडकर यांची मैत्री होती. गौरव खळदे हा शामला वेळोवेळी आर्थिक मदत करत होता.

-याच मैत्रीमुळे शाम निगडकर आणि त्याच्या साथीदाराकडून किशोर आवारे यांची हत्या करण्यात आली

-यासाठी जानेवारीपासून किशोर आवारे याच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. गेल्या महिन्याभरापासून रेकी करत होते. अखेर नगरपरिषदेच्या कार्यालयात त्यांना गाठून हत्या केली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT