पुण्याच्या पठ्ठयाची कमाल! इंजिनियरिंग केलं नसतानाही गुगलने दिली ‘इतक्या’ लाखाची नोकरी

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

pune student harshal juikar got 50 lakh sallery package at google his not from iit
pune student harshal juikar got 50 lakh sallery package at google his not from iit
social share
google news

अनेक तरूणांचे गुगल सारख्या मोठ्या कंपनीत काम करण्याचे स्वप्न असते. मात्र प्रत्येकाचे हे स्वप्न पुर्ण होत नाही. त्यात आता पुण्याच्या एका पठ्ठ्याला गुगलनेच नोकरी देऊ केली आहे. हर्षल जुईकर (Harshal Juikar) असे या तरूणाचे नाव आहे. हर्षल जुईकरच्या प्रचंड इच्छाशक्ती आणि प्रतिभेच्या बळावर गुगलमध्ये (Google) त्याला नोकरीची ऑफर दिली आहे. या नोकरीत त्याला गुगलने ५० लाखासाराखा गलेलठ्ठ पगार दिला आहे.विशेष म्हणजे हर्षल जुईकर हा नॉन-इंजिनियर पदवीधर आहे. तो Msc पासआऊट झाला आहे. तरी देखील गुगलने त्याला नोकरीची ऑफर दिल्याने आश्चर्य व्यक्त होतोय. (pune student harshal juikar got 50 lakh sallery package at google his not from iit)

ADVERTISEMENT

हर्षल जुईकरला (Harshal Juikar) त्याच्या प्रतिभेच्या बळावर गुगलने 50 लाखाच्या पॅकेजच्या नोकरीची ऑफर दिली आहे. हर्षलने ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीमध्ये Msc केलं होते. तो एमआयटी-वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणेचा विद्यार्थी आहे. विशेष गोष्ट म्हणजे, हर्षल एक नॉन-इंजिनीअरिंग पदवीधर आहे. हर्षलने आपली आवड जोपासत पारंपारिक करिअर मार्गांना नकार देत ब्लॉकचेन तंत्रज्ञानामध्ये एमएससी केले. हर्षलचा प्रवास उत्कटता, कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या सामर्थ्याचा पुरावा आहे. गुगलने त्याच्यातली प्रतिभा पाहून त्याला 50 लाखाच्या पॅकेजच्या नोकरीची ऑफर दिली आहे.

हे ही वाचा : Crime: ‘या’ दोन मुलींच्या हत्येने महाराष्ट्र हादरला, अंगावर काटा आणणारी कहाणी

कॉम्प्युटर सायन्स बॅचलर पदवी घेत असताना मला तंत्रज्ञानाच्या या युगात स्वत:चे स्किल डेव्हलप करण्याचे महत्त्व मला जाणवले होते.यासोबत औपचारिक अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन मी स्वत:चे ज्ञान वाढविण्यासाठी सेल्फ लर्निंगचा निर्णय़ घेतल्याचे हर्षल जुईकर म्हणाला आहे. हर्षल जुईकर पुढे म्हणतो, “मी MIT-WPU, पुणे येथून ब्लॉकचेन तंत्रज्ञानामध्ये मास्टर्स केले. यावेळी अभ्यासादरम्यान इंडस्ट्रीच्या एक्सपर्टकडून खूप काही शिकायला मिळाले आणि मोठ्या डेटासेटवर काम करणे, सांख्यिकीय अल्गोरिदमचे विश्लेषण करणे, व्यावहारिक समस्या सोडवणे आणि भविष्यसूचक मॉडेल तयार करणे, अशा सर्व गोष्टीवर काम केल्याचे हर्षल जुईकर याने सांगितले आहे.

हे वाचलं का?

मला विश्वासच बसत नाही आहे. पण माझ्या कठोर मेहनतीचे आणि डेडिकेशनचे हे फळ आहे. मी टेक जाएंट गुगलमध्ये येणाऱ्या आगामी कआव्हानांना सामोरे जायला तयार आहे. तसेच गुगलने केलेली माझी वैय़क्तिक केलेली निवड ही खूप महत्वपूर्ण आहे. गुगलमध्ये मी इंटर्न म्हणून देखील काम केले आहे.

ज्या विद्यार्थ्यांकडे अभियांत्रिकी पार्श्वभूमीच नाही आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना गुगल किंवा टेक इंडस्ट्रीमध्ये जायचे आहे, त्यांनी भविष्यवादी दृष्टिकोन घेऊन पुढे जावे. तंत्रज्ञान दररोज बदलत आहे आणि विद्यार्थ्यांनी या बदलांसाठी सज्ज असले पाहिजे,असा सल्ला देखील हर्षल जुईकरने तरूणांना दिला आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Suicide Case: नितीन देसाईंच्या पत्नीने पोलिसांना काय दिला जबाब?, FIR जसाच्या तसा..

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT