चितळे बंधू मिठाईवालेंची फसवणूक! बाकरवडीची चव बदलल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस, कसा झाला पर्दाफाश?
Pune Latest News : पुण्यातीस चितळे बंधू मिठाईवाले यांच्या बाकरवडीच्या ब्रँडची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

चितळे बंधू मिठाईवालेंची कशी झाली फसवणूक?

लोकांनी केल्या बाकरवडीची चव बदलल्याच्या तक्रारी

पुणे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Pune Latest News : पुण्यातीस चितळे बंधू मिठाईवाले यांच्या बाकरवडीच्या ब्रँडची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. परंतु, चितळे बंधू मिठाईवाले यांच्या बाकरवडीची चव बदलल्याच्या तक्रारी अनेक दिवसांपासून समोर येत होत्या. त्यानंतर फिर्यादी यांनी तक्रारीची दखल घेत चितळे स्वीट होम नावाने विक्री करणाऱ्या दुकानातून काही पाकिटे खरेदी केली. त्यानंतर चितळे बंधूंच्या आणि त्यांच्या बाकरवडीच्या पाकिटात तफावत दिसून आली. चितळे स्वीट होममध्ये मिळणाऱ्या बाकरवडीची चव वेगळी असून ग्राहकांची फसवणूक होत असल्याचं उघडकीस आलं. याप्रकरणी पुणे शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पुणे शहर पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल्ल काय म्हणाले?
"पुणे शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागात तक्रार दाखल झाली होती. त्या तक्रारीची चौकशी केल्यानंतर एक गुन्हा उघडकीस आला आहे. प्रसिद्ध चितळे बंधू मिठाईवाले आहेत. त्यांचा बाकरवडीचा प्रसिद्ध ब्रँड आहे. त्याची मार्केटमध्ये कॉपी तयार करण्यात आली होती. चितळे स्वीट नावाचा दुसरा स्वीट हाऊस आहे. त्यांनी त्यांची बाकरवडी तयार केली, पण त्याची बाकरवडी तयार केल्यानंतर ज्या पॅकेटमध्ये त्यांनी त्याची विक्री सुरु केली. तो पॅकेट वेगळ्या प्रकारचा होता.
हे ही वाचा >> नव्या नवरीला सोडून 'तो' महिला कॉन्स्टेबलसोबत पळाला! बायकोला म्हणाला, "आम्ही दोघे विष पिऊन..."
त्यांनी त्याच्या साईटवर त्याचा कस्टमर केअर नंबर, मॅन्यूफॅक्चरिंग डिटेल, इमेल आयडी, वेबसाईट डिटेल हे चितळे बंधू मिठाईवाल्याचे वापरले आहेत. त्यामुळे दुसऱ्या जनरल स्टोअर्समध्ये डिटेल्स आणि पत्तासुद्धा चितळे बंधू मिठाईवाल्याची होती. नावाचा आणि मॅन्यूफॅक्चरिंगच्या डिटेल्सचा गैरवापर करून फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी विश्राम बाग पोलीस स्टेशनमध्ये कलम 318(2), 350, 66(सी), 66 (ड) अंतर्गत गुन्दा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास सुरु आहे", अशी माहिती पुणे शहर पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल्ल यांनी माध्यमांशी बोलताना दिली.