Pune : नीरा नदीच्या पात्रात सापडला पोत्यात बांधलेला मृतदेह, पुणे पुन्हा हादरलं, घटना नेमकी काय?
सारोळा गावच्या शिवारामध्ये नानाची वाडी हे हॉटेल आहे. या हॉटेलच्या जवळच नीरेचं पात्र असून, इथे एका पोत्यात घातलेला मृतदेह निदर्शनास आला. स्थानिक लोकांनी लगेचंच पोलिसांना माहिती दिली. त्यांनंतर पोलिसांनी येऊन तपास केल्यावर प्राथमिक माहितीमध्ये धक्कादायक प्रकार असल्याचा संशय व्यक्त केलाय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

नीरा नदीच्या पात्रात सापडला पोत्यात बांधलेला मृतदेह

भोर तालुक्यातील घटनेनं पुणे जिल्हा हादरला

पोलिसांना घातपाताचा संशय, मृतदेहावर व्रण
Pune Crime News : रोज घडणाऱ्या गुन्हेगारींच्या घटनांमुळे पुणे पोलिसांसमोर सध्या कायदा व सुव्यस्थेचं मोठं आवाहन निर्माण झालं आहे. कोयता गँगचा हैदोस, गाड्यांची नासधूस करणाऱ्या टोळीची दहशत, बलात्काराची घटना आणि रस्त्यात दारून पिऊन अश्लील चाळे करणाऱ्या धनाड्यांची मस्ती... या गोष्टींमुळे शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जाणारं पुणे शहर काही दिवसात गुन्हेगारीचं सासर होतं की काय असा सवाल सोशल मीडियावरील चर्चांमध्ये केला जातोय. अशातच आता आणखी एक विचित्र घटना समोर आली आहे.
हे ही वाचा >> Thane : विधवा महिलेशी जवळीक वाढवली, लग्नाचं आमिष दाखवून वर्षभर... 22 वर्षीय तरूणावर गुन्हा दाखल
पुण्यातील भोर तालुक्यामध्ये असणाऱ्या नीरा नदीच्या पात्रात पोत्यात घालून टाकलेला एक मृतदेह आढळला. या घटनेनं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पुणे सातारा हायवेवर असलेल्या सारोळा गावच्या शिवारात ही घटना घडली. त्यानंतर पोलिसांनी लगेचच या प्रकरणाची दखल घेतली.
पोत्यात बांधून टाकलेल्या या मृतदेहाबद्दल पोलिसांनी लगेचंच तपास सुरू केला असून, मृताचं अंदाजे वय हे 40 वर्ष असल्याची माहिती समोर आली आहे. राजगड पोलिसांनी हा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, घातपात करुन मृतदेह फेकल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
हे ही वाचा >> Uddhav Thackeray : 'जय श्री राम'ला 'जय भवानी-जय शिवाजी'ने उत्तर द्या... आक्रमक उद्धव ठाकरेंची नवी रणनीती
संबंधीत प्रकरणाबद्दल समोर आलेल्या माहितीनुसार, सारोळा गावच्या शिवारामध्ये नानाची वाडी हे हॉटेल आहे. या हॉटेलच्या जवळच नीरेचं पात्र असून, इथे एका पोत्यात घातलेला मृतदेह निदर्शनास आला. स्थानिक लोकांना हा प्रकार शंकास्पद वाटल्यानं त्यांनी लगेचंच पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस तिथे पोहोचले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृताच्या गळ्यावर असलेले व्रण पाहता, त्याला गळा आवळून मारल्याची शक्यता आहे.