Mumbai Pune Expressway वरुन प्रवास करणाऱ्यांसाठी दिलासायक बातमी! MSRDC ने 2030 पर्यंत...
1 एप्रिल 2023 पासून, मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर चारचाकी वाहनाचा टोल 320 रुपये आहे, तर मिनीबससाठी किंवा टेम्पोसाठी 495 रुपये टोल आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मुंबई-पुणे दृतगती मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांना दिलासा

MSRDC चा टोलबद्दल मोठा निर्णय?

मुंबई-पुणे दृतगती मार्गावर सध्या किती आहे टोल?
Mumbai Pune Expressway : मुंबई आणि पुणे या राज्यातल्या दोन प्रमुख शहरांना जोडणाऱ्या दृतगती मार्गावरुन रोज लाखो लोक प्रवास करतात. या मार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे नेहमी लोक त्रस्त असतात. मात्र, या प्रवाशांना आता काहीसा दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं (MSRDC) ने पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील टोलबद्दल एक मोठी माहिती दिली आहे.
हे ही वाचा >> Beed Crime : बीडमध्ये अल्पवयीन तरुणाला घेरून मारलं, तीच पद्धत आणि तसाच व्हिडीओ व्हायरल, प्रकरण काय?
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) अंतर्गत येणाऱ्या महामार्गांच्या टोल दरांमध्ये अलीकडेच वाढ झाली. मात्र, एमएसआरडीसीद्वारे व्यवस्थापित पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग 1 एप्रिल 2023 रोजी केलेल्या वेगळ्या टोल रचनेचं पालन करतो. एमएसआरडीसी अधिकाऱ्यांच्या मते, या द्रुतगती महामार्गासाठी शेवटची टोल वाढ 1 एप्रिल 2023 रोजी लागू करण्यात आली होती. त्यामुळे पुढच्या सात वर्षांसाठी त्यात कोणतेही बदल केले जाणार नाहीत. टोलचे दर 30 एप्रिल 2030 पर्यंत कायम एवढेच राहणार असल्याची माहिती दिली आहे.
1 एप्रिल 2023 पासून, मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर चारचाकी वाहनाचा टोल 320 रुपये आहे, तर मिनीबससाठी किंवा टेम्पोसाठी 495 रुपये टोल आहे.
MSRC च्या या निर्णयाचा फायदा पुणे आणि मुंबईला प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना, वाहतूकदारांना आणि पर्यटकांना होणार आहे. महाराष्ट्रातील सर्वात दास्त व्यस्त द्रुतगती महामार्ग असल्यानं प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
हे ही वाचा >> Aurangzeb Tomb : औरंगजेबाच्या कबरीच्या वादामुळे मंदिरांमध्ये भाविकांची संख्या घटली, पर्यटकही झाले कमी
2005 मध्ये झालेल्या दीर्घकालीन करारानुसार टोलचे दर स्थिर राहतील असं एमएसआरडीसीने स्पष्ट केलं आहे. प्रवाशांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. या निर्णयामुळे दोन प्रमुख शहरांमधील सुरळीत आणि परवडणारी कनेक्टिव्हिटी देऊन,आर्थिक व्यवहारांना चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय.