UPSC Archit Dongre: मराठमोळा अर्चित डोंगरेने UPSC साठी IT कंपनीतील नोकरी सोडली, अन् देशात आला तिसरा!
UPSC: पुण्यातील अर्चित डोंगरेने आपली चांगल्या पगाराची नोकरी सोडली आणि UPSC साठी तयारी केली. ज्यामध्ये त्याने अखिल भारतीय रँक 3 मिळवला.
ADVERTISEMENT

UPSC Rank 3 Archit Dongre Success Story: UPSC नागरी सेवा परीक्षा 2024 चा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातील पुणे येथील अर्चित डोंगरेने ऑल इंडिया रँक 3 मिळवून महाराष्ट्राची मान उंचावली आहे. अर्चित डोंगरे हा टॉप 3 मध्ये एकमेव पुरुष स्पर्धक आहे. पहिल्या दोन्ही क्रमांकावर मुली आहेत.
UPSC साठी अर्चित डोंगरेने सोडलेली IT कंपनीतील नोकरी
अर्चित डोंगरे याने त्याचे शालेय शिक्षण मुंबईतून घेतले आणि त्याचे ज्युनियर कॉलेज शिक्षण पुण्यात पूर्ण केले. त्याने वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (VIT) मधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक पदवी घेतली आहे. पदवी पूर्ण केल्यानंतर, त्याने सुमारे एक वर्ष एका आयटी कंपनीत काम केले. पण काही काळानंतर, नागरी सेवा परीक्षेची चांगली तयारी करण्यासाठी त्याने नोकरी सोडली.
हे ही वाचा>> मेंढ्या चरायला नेल्या तेव्हाच फोन आला अन्... UPSC मध्ये यश मिळवलेला मेंढपाळ कुटुंबातील बिरदेव डोणे कोण?
अर्चित डोंगरेचा यूपीएससीमधील हा काही पहिलाच प्रयत्न नव्हता. यापूर्वी, त्याने यूपीएससी 2023 च्या परीक्षेत 153 वा क्रमांक मिळवला होता. परंतु त्याच्या सततच्या प्रयत्नांमुळे आणि दृढनिश्चयामुळे त्याला 2024 मध्ये त्याच्या रँकिंगमध्ये लक्षणीय सुधारणा करण्यास मदत झाली, ज्यामुळे तो देशातील पहिल्या तीनमध्ये आला.
"जिन खोजा तिन पाइया, गहरे पानी पैठ, मैं बपुरा बूडन डरा, रहा किनारे बैठ।"
संत कबीरांच्या या ओव्याचा अर्थ असा आहे की, जो माणूस कठोर परिश्रम करतो त्याला यश मिळते पण जो माणूस बुडण्याच्या भीतीने पाण्यात डुबकी मारत नाही आणि किनाऱ्यावर बसतो त्याला काहीही साध्य होत नाही. अर्चित डोंगरेने कबीरजींचे हे वाक्य खरे करून दाखवले आहे की प्रयत्न करून यश निश्चितच मिळते.
हे ही वाचा>> UPSC 2024: यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्रात पहिला आणि देशात तिसरा आलेला आर्चित डोंगरे आहे तरी कोण?
यूपीएससीने 22 एप्रिल 2025 रोजी नागरी सेवा अंतिम निकाल जाहीर केला. परीक्षेत बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट upsc.gov.in ला भेट देऊन त्यांचा यूपीएससी सीएसई निकाल पाहू शकतात. या वर्षी शक्ती दुबे ही अव्वल स्थानावर आहे. तर हर्षिता गोयलने दुसरे स्थान पटकावले आहे. अर्चित डोंगरे हा तिसऱ्या स्थानावर आहे. या वर्षी यूपीएससीने विविध सेवांसाठी एकूण 1009 उमेदवारांची निवड केली आहे. ज्यामध्ये 335 सामान्य श्रेणी, 109 ईडब्ल्यूएस, 318 ओबीसी, 160 एससी आणि 87 एसटी श्रेणीतील उमेदवारांचा समावेश आहे.