Pune: काकूसोबत अनैतिक संबंध, पण अचानक बिबट्याच्या हल्ल्याचा अँगल का आला मधे?
Pune News: पुण्यात महिलेचे तिच्या पुतण्यासोबत असलेले अनैतिक संबंध आणि त्यातून झालेली हत्या ही अत्यंत धक्कादायक पद्धतीने समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

बिबट्याचा हल्ला झाला म्हणत लपवला होता खून

तीन महिन्यानंतर वेगळंच सत्य समोर आलं

पुतण्यानं अनैतिक संबंधांच्या सशयातून काकूला संपवलं
Pune Crime News : पुण्यात दिवसेंदिवस एक गुन्हेगारीच्या थरारक घटना समोर येत आहेत. दौंड तालुक्यातूनही आता असाच एक प्रकार समोर आला असून, एका हत्येच्या प्रकरणाच्या तपासात वेगळाच प्रकार समोर आला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाल्याचं प्रकरण काही महिन्यांपूर्वी समोर आलं होतं, आता त्या महिलेच्या मृत्यूचं खरं कारण समोर आलं आहे.
हे ही वाचा >> Marathi Language: 'घाटकोपरची भाषा गुजराती', असं म्हणणारे RSS चे भैय्याजी जोशी आहेत तरी कोण?
नेमकं प्रकरण काय?
दौंडमध्ये गेल्यावर्षी 7 डिसेंबरला लताबाई बबन धावडे यांचा मृत्यू झाला होता. बिबट्यानं त्यांच्यावर हल्ला केला आणि त्या घटनेमध्ये त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं गेलं होतं. मृत महिलेचा मृतदेह ऊसाच्या शेतात सापडल्यानं बिबट्यानं ओढत नेल्याचं म्हटलं होतं.हा सर्व प्रकार मृत महिलेचा पुतण्या अनिल धावडेने पोलिसांना सांगितला होता. पण काकूच्या हत्येचे पुरावे मिटवण्यासाठी पोलीस आणि वनविभागाचे अधिकारी येण्यापूर्वीच या पुतण्याने काकूचा मृतदेह ऊसाच्या शेतातून हलवला होता.
पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती, त्यावेळी सुरूवातीलाच वनविभागाने हा मृत्यू वन्य प्राण्याच्या हल्ल्यात झाला नसल्याची शंका व्यक्त केली होती. त्यामुळे महिलेच्या शवविच्छेदनाचा अहवाल हा नागपूर वन विभागाच्या प्रादेशिक न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. त्यानंतर तिथे हे लक्षात आलं की, महिलेच्या अंगावर कुठल्याही प्राण्याच्या हल्ल्याचे निशाण नाहीत. प्रयोगशाळेने हा अहवाल पोलिसांना दिला होता. त्यावरुन पोलिसांनी पुढील तपास केला आणि तपासात पोलिसांनी पुतण्याला खाक्या दाखवताच त्यानं सगळं खरं सांगितलं. अनैतिक संबंधांतूनच ही हत्या केली आणि दगडाने मारून पुढे वेगळाच कट रचल्याचं समोर आलं.
हे ही वाचा >> Jaykumar Gore : राऊतांनी गंभीर आरोप केले, ज्युनिअर किरीट सोमय्या म्हटलं... जयकुमार गोरेंचं प्रकरण काय?
ठरवलेल्या कटाप्रमाणे पुतण्याने आपल्या काकूला शेतात खुरपण्यासाठी नेलं होतं. त्यावेळी पुतण्याच्या घरी जी व्यक्ती काम करत होती, त्या व्यक्तिसोबत ती महिला शेतात गेली. तेव्हा त्या व्यक्तिने महिलेला बेशुद्ध केलं आणि नंतर तिथे पुतण्या अनिल धावडेने डोक्यात दगड घालून महिलेला संपवलं. हे समोर आल्यानंतर पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या.
दरम्यान, हत्या केल्यानंतर दोघे बहाद्दर तिथेच थांबले नाही, तर त्यांनी बिबट्याच्या हल्ल्याचा बनाव करत वनविभाला भरपाईसुद्धा मागितली होती.