महाराष्ट्रातील आजचे हवामान 28 April 2025 : राज्यात उष्णतेची लाट, 'या' 5 जिल्ह्यांना यलो अलर्ट, चंद्रपूरमध्ये पारा 45.8 अंशावर
Maharashtra Weather Today: राज्यात एकीकडे उष्णतेची लाट आहे तर दुसरीकडे अवकाळी पावसाचं संकट आहे. चंद्रपूरमध्ये यंदाच्या हंगामातील सर्वाधिक 45.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहेत. जळगावमध्ये तापमान 44.3 अंशांपर्यंत पोहोचलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

विदर्भातील काही भागांत 27 आणि 28 एप्रिल रोजी गारपिटीची शक्यता

आंबा, काजू आणि द्राक्ष यांसारख्या पिकांना धोका

राज्यातील पाच जिल्ह्यांना वाढत्या तापमानामुळे यलो अलर्ट
Maharashtra Weather Update : राज्यात सध्या हवामानात कमालीचे बदल होत असून, अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट आली आहे. त्यातच आता विदर्भ आणि मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट तीव्र राहण्याची शक्यता आहे. चंद्रपूर, अकोला, नागपूर, जालना आणि बीड या जिल्ह्यांना हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे.
चंद्रपूरमध्ये यंदाच्या हंगामातील सर्वाधिक 45.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहेत. जळगावमध्ये तापमान 44.3 अंशांपर्यंत पोहोचलं आहे. पुण्यात कमाल तापमान 41 अंश आणि नाशिकमध्ये 38 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. मुंबईत तापमान 35 अंशांपर्यंत राहील, परंतु दमट हवामानामुळे उकाडा जाणवेल.
गारपिटी आणि पावसाचा इशारा
हे ही वाचा >> पुण्यातील वरंध घाटात सापडला शीर नसलेला मृतदेह, हात-पायही बांधलेले, गुरं चारणाऱ्यांनी काय पाहिलं?
विदर्भातील काही भागांत 27 आणि 28 एप्रिल रोजी गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही काही ठिकाणी हलक्या पावसाची नोंद होऊ शकते. लातूर, धाराशिव, सोलापूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे. कोकणातही पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असून, वादळी वाऱ्यामुळे मच्छीमारांना खोल समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी सावधानता
उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांना दुपारी 12 ते 3 या वेळेत बाहेर पडायचं टाळायचं आवाहन करण्यात आलं आहे. पुरेसं पाणी पिणे, हलके कपडे घालणे आणि उष्माघातापासून बचाव करण्याचे सल्ले हवामान खात्यानं दिले आहेत. दुसरीकडे, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे. विशेषत: आंबा, काजू आणि द्राक्ष यांसारख्या पिकांना धोका निर्माण झाला आहे.
हे ही वाचा >> प्रेमविवाहाचा राग, निवृत्त PSI बापाने हळदीच्या कार्यक्रमात लेकीला गोळी घालून संपवलं, तर जावईही...
हवामान तज्ज्ञांचे मत
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी सांगितले की, "एप्रिल अखेरीस वातावरणात अचानक बदल होत असून, गारपिटी आणि पावसाची शक्यता वाढली आहे.