Pune: आईने मुलीचे नको ते व्हिडिओ शूट केले आणि स्वत:च्या बॉयफ्रेंडला पाठवले, विवाहबाह्य संबंध उघड केल्यानं...

मुंबई तक

आरोपी महिला भारती विकास कुनहाडे आणि तिचा प्रियकर गुरुदेव कुमार स्वामी यांच्यात बऱ्याच दिवसांपासून प्रेमसंबंध होते. याबद्दल मुलीने घरमालकाला सांगितल्यामुळे आईला राग आला होता.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आईनेच लेकीचे व्हिडीओ बनवून व्हायरल केले

point

आईचं अफेअर लेकीनं उघड केल्याचा राग

point

घरमालकाला मुलीने सांगितला आईचा प्रताप

Pune News : पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. माय-लेकीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना म्हणून या प्रकरणाची चर्चा होतेय. बिबवेवाडी परिसरात राहणाऱ्या एका महिलेनं आपल्याच अल्पवयीन मुलीचा बदला घेण्यासाठी तिचा अश्लील व्हिडिओ बनवला आणि तो व्हायरल केला. इतकंच नाही, तर तिने आपल्या प्रियकराला हा व्हिडिओ पाठवून मुलीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास प्रोत्साहन दिलं. या घृणास्पद कृत्यातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

आरोपी महिला भारती विकास कुनहाडे आणि तिचा प्रियकर गुरुदेव कुमार स्वामी यांच्यात बऱ्याच दिवसांपासून प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वी भारतीने आपल्या मुलीचा कपडे बदलतानाचा अश्लील व्हिडिओ बनवला आणि तो काही नातेवाइकांसह आपल्या प्रियकराला पाठवला. मुलीला याची माहिती मिळताच तिने धैर्य दाखवत घरमालकाला आई आणि तिच्या प्रियकराच्या कृत्यांबद्दल सांगितलं. घरमालकाने तातडीने पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला.

हे ही वाचा >> बेल्जियम, डोमिनिकन रिपब्लिक, अँटिग्वा, स्वित्झर्लंड... मेहूल चोकसी पळत राहिला, पोलिसांना कसा सापडला?

प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर दोन्ही आरोपी फरार झाले. मात्र, बिबवेवाडी पोलिसांनी तत्परता दाखवत त्यांना शोधून अटक केली. प्राथमिक तपासात असं समोर आलं की, मुलीने आईच्या  प्रेमसंबंधांबद्दल घरमालकाला सांगितलं होतं. त्यामुळेच संतापलेल्या आईने बदला घेण्यासाठी प्रियकराच्या मदतीने हा व्हिडिओ बनवला आणि मुलीची समाजात बदनामी केली.

हे ही वाचा >> गुंड घायवळला नडणाऱ्या पैलवानाची क्राईम हिस्ट्री, समोर आलेल्या दुसऱ्या व्हिडीओत काय?

पुणे पोलिस आता हा अश्लील व्हिडिओ कसा आणि कुठे कुठे शेअर झाला याचा तपास करत आहेत. या अमानवीय घटनेनं परिसरात संतापाची लाट पसरली असून, स्थानिकांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. सध्या दोन्ही आरोपी पोलीस कोठडीत असून, पुढील तपास सुरू आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp