Pune : पुणेकरांनो सावधान! तुमच्या ताटातलं पनीर भेसळयुक्त? पोलिसांनी छापा टाकत पकडलं दीड हजार किलो बनावट पनीर

मुंबई तक

Pune : पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 6 ने अन्न आणि औषध विभागाच्या अधिकाऱ्यांसह मांजरी खुर्दमध्ये एका बेकायदेशीर पनीर उत्पादन युनिटवर छापा टाकला. त्यावेळी त्यांच्यासमोर पनीर बनवताना वेगळंच साहित्य समोर आलं.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यात पनीरमध्ये भेसळ, पोलिसांची कारवाई

point

पुणे पोलिसांकडून लाखो रुपयांचं पनीर जप्त

point

पाम तेलासह वेगवेगळ्या केमिकल्सचा वापर करुन बनवत होते पनीर

Pune News : पुणे शहर जेवढं शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं, तेवढंच ते पुण्यातल्या खाद्यसंस्कृतीसाठीही ओळखलं जातं. अस्सल गावरान मांसाहारी पदार्थांसह दुसरीकडे शाकाहारी पदार्थांच्याही खास डीश तुम्हाला मिळतात. मात्र, खवय्यांसाठी आणि प्रत्येक कुटुंबासाठी चिंता वाढवणारी ही बातमी. कारण तुमच्या ताटात जे पनीर येतंय, ते भेसळयुक्त असण्याची शक्यता आहे. पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 6 ने अन्न आणि औषध विभागाच्या अधिकाऱ्यांसह मांजरी खुर्दमध्ये एका बेकायदेशीर पनीर उत्पादन युनिटवर छापा टाकला. 1,400 किलो भेसळयुक्त पनीर जप्त अधिकाऱ्यांनी ज्पत केलं.

हे ही वाचा >> Coma Patient Video : रुग्णालयानं सांगितलं पेशंट कोमात अन् तो चालत बाहेर आला... व्हायरल व्हिडीओचं प्रकरण काय?

गुप्त माहितीनंतर टाका छापा...

पोलीस अमलदार सचिन पवार आणि रमेश मेमाणे यांना शुक्रवारी माणिक नगरमधून मोठ्या प्रमाणात निकृष्ट दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन आणि वितरण सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक वाहिद पठाण आणि इतर अधिकाऱ्यांनी छापा टाकला. छापा टाकल्यानंतर अधिकाऱ्यांना पनीर तयार करण्यासाठी हानिकारक रसायनं आणि कृत्रिम घटकांचा वापर करून अस्वच्छ उत्पादन होत असल्याचं दिसलं. जप्त केलेलं भेसळयुक्त पनीर स्थानिक बाजारपेठेत पाठवलं जाणार होतं, त्यापूर्वीच ही कारवाई झाली. 

तब्बल 11 लाखाचा माल जप्त...

हे ही वाचा >> Udayanraje Bhosale : उदयनराजे भोसले औरंगजेबाच्या कबरीबद्दल काय म्हणाले? कबर नेमकी आहे तरी कुठे?

पोलिसांनी 11 लाख 56 हजार 690 रुपये किमतीचं  1,400 किलो पनीर, 400 किलो जीएमएस पावडर, 1,800 किलो एसएमपी पावडर, 718 लिटर पाम ऑइल असं एकूण 11 लाख 56 हजार रुपये किमतीचं उत्पादनं जप्त केली. पोलिसांनी वाघोलीतील दुबेनगर येथील रहिवासी सोपान चाबुराव साळवे (45) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस म्हणाले, “यापूर्वी आरोपीवर असाच बेकायदेशीर भेसळयुक्त पनीर कारखाना चालवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो FDA ने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत नव्हता.''

हे वाचलं का?

    follow whatsapp