Pune Police : पुण्यात 'खाकी'लाही भाईगिरीचा नाद? पोलिसाचं गुन्हेगारांसोबत वाढदिवसाचं सेलिब्रेशन

मुंबई तक

Pune News: खुनाच्या प्रयत्नासह गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेल्या गुन्हेगारांसोबत वाढदिवस साजरा केल्याने पोलिसांच्या प्रतिमेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

ADVERTISEMENT

पुण्यातील पोलीस अधिकाऱ्याचं गुन्हेगारांसोबत बर्थ डे सेलिब्रेशन?
पुण्यातील पोलीस अधिकाऱ्याचं गुन्हेगारांसोबत बर्थ डे सेलिब्रेशन?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुणे पोलिसांनाही लागला भाईगिरीचा नाद?

point

'खाकी'मध्येही शिरली गुन्हेगारी प्रवृत्ती?

point

सांगवीमध्ये काय घडलं? सविस्तर रिपोर्ट...

पुणे: गेल्या काही दिवसांपासून राज्यात बीड आणि परिसरातील गुन्हेगारीची चर्चा सुरूय. बीडच्या पोलिसांवर त्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आणि आयुक्तांपासून अनेक अधिकारी बदलण्यात आले. मात्र, पुण्यातही गुन्हेगारीच्या घटनांची वाढती आकडेवारी पाहता, बीडसोबत स्पर्धा सुरू आहे की असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पुण्यातील सांगवी पोलिसांनी थेट गुन्हेगारांसोबत वाढदिवस साजरा केल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पोलीस ठाण्यासमोरच जल्लोषात वाढदिवस

पुण्यातील सांगवी पोलीस ठाण्यासमोर मध्यरात्री फटाके फोडून गुन्हेगारांसोबत वाढदिवस साजरा करणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. गुरुवारी मध्यरात्री खंडणीचे आरोप असलेले पोलीस अधिकारी प्रवीण पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या सोहळ्याला पोलीस कर्मचारी विवेक गायकवाड आणि विजय मोरे यांनीही हजेरी लावली.

हे ही वाचा >> "मी भीक मागतो...", पत्नीला असं म्हणाला अन् कंपनीला पाठवली सुसाईड नोट, हॉटेल रूममध्ये केला स्वत:चा शेवट

सांगवी पोलीस ठाण्यासमोरच नियमांचं उल्लंघन करून पोलीस कर्मचारी प्रवीण पाटील यांनी आपला वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला. प्रवीण पाटील यांनी फायर गन, क्राउन हॅट्स आणि ड्रोनने लावून फिल्मी अंदाजात  आपला वाढदिवस साजरा केला. सामान्य माणसासाठी एक आणि पोलिसांसाठी दुसरा न्याय आहे का? असा प्रश्न सामान्य नागरिक विचारतायत.

वाढदिवसाला गुन्हेगारांची हजेरी...

पोलीस कर्मचारी प्रवीण पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गुन्हेगार मोठ्या जल्लोषात सहभागी झाले होते. त्यामध्ये विशाल काशीद उर्फ ​​कंडया पप्या, प्रज्वल शिर्के, मयूर शिंदे, अण्णा स्वामी आणि वैभव साळुंके उर्फ ​​यांचा समावेश आहे. गंभीर बाब म्हणजे हे सर्व लोक गुन्हेगार आहेत हे माहीत असूनही, सांगवी पोलीस ठाण्यासमोर वाढदिवस साजरा करण्यात आला.

हे ही वाचा >> Dhananjay Munde यांच्या राजीनाम्यानंतर कुणाची अडचण, कुणाला संधी? मंत्रिपद कुणाला?

खुनाच्या प्रयत्नासह गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेल्या गुन्हेगारांसोबत वाढदिवस साजरा केल्याने पोलिसांच्या प्रतिमेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. पोलीस या गुन्हेगारांना प्रोत्साहन देत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सामान्य लोकांना कायद्याचे धडे देणाऱ्या पोलिसांनीही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. प्रवीण पाटील हा सांगवी पोलिस ठाण्याचा कर्मचारी आहे. विवेक गायकवाड आणि विजय मोरे हे देखील या लाइनशी संबंधित आहेत. पोलिस अधिकाऱ्यांचा आदर न करणाऱ्या या पोलिसांवर राजकीय वरदहस्त असल्याचं बोललं जातं. हे लोक दादा, भाऊ आणि भाई यांचे भक्त आहेत. आमच्यावर कारवाई कोण करणार? असं त्यांना वाटत असतं. त्यामुळे या तिघांवर कारवाई होणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp