Rain Update : राज्यात तीन दिवस पाऊस, पण मराठवाडा कोरडाच

मुंबई तक

ADVERTISEMENT

There will be rain in Konkan and West Maharashtra along with Mumbai, but there will be no rain in Marathwada, farmers will suffer financially
There will be rain in Konkan and West Maharashtra along with Mumbai, but there will be no rain in Marathwada, farmers will suffer financially
social share
google news

Rain Update: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली असली तरी मराठवाड्यात (Marathwada) मात्र चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या मुंबईसह (Mumbai) कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस (Heavy Rain) झाला आहे. मात्र अजूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस पडला नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. खरीप हंगामावेळीच पाऊस पडला नसल्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याचा परिणाम ग्रामीण भागातील अर्थकारणावर झाला आहे. त्यामुळे 22 ते 24 तारखेपर्यंत पाऊस पडणार असला तरी त्या पावसाचा मराठवाड्याला फायदा होणार की नाही हे आता येत्या काही दिवसात कळणार आहे. (rain in next three days in maharashtra, no rain marathwada agriculture in crisis)

ADVERTISEMENT

मराठवाड्यात चिंता

यंदा राज्यातील अनेक भागात पाऊस झाला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मुंबईसह उत्तर महाराष्ट्रातही पावसाने हजेरी लावली आहे. मात्र मराठवाड्यात शेतीला पूरक असा पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतीला त्याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आता मराठवाड्यात शेतकरीवर्गातून चिंता व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा >> Cricket : क्रिकेट विश्व हादरलं, मॅच फिक्सिंगच्या जाळ्यात अडकलं कोण?

खरीप हंगामाचे मोठे नुकसान

मराठवाड्यात खरीप हंगामासाठी पावसाची गरज होती. मात्र यावेळी पाऊस झाला नाही. त्याचा फटका खरीप हंगामातील पिकांना बसला आहे. पिकांना वेळेवर पाऊस झाला नसल्याने खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले आहे. यंदा पावसाने मराठवाड्यात दडी मारली असल्याने खरीप हंगाम वाया जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उत्पादकता निम्मी घटणार

महाराष्ट्रातील अनेक भागात पाऊस झाला असला तरी मराठवाड्याला मात्र पावसाने म्हणावी तशी हजेरी लावली नव्हती. सध्याही पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. मात्र परतीच्या पावसाचीही मराठवाड्यात शक्यता नसल्याने तलाव आणि बंधारे मात्र कोरडेच राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या जिल्ह्यात पाणीसाठाही कमी झाला आहे. पाऊस कमी झाल्यामुळे शेतीच्या उत्पादनावर घट होऊन उत्पादकता निम्मी घटणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

हे ही वाचा >> Hardeep Singh Nijjar : कोण होता खलिस्तानी दहशतवादी? ज्याच्या हत्येने भारत-कॅनडा संबंध झाले खराब

पाऊस पडण्याची शक्यता

येत्या काही दिवसांता 22 ते 24 सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र या पावसाचा फायदा मराठवाड्याला होणार की नाही ते आता येणाऱ्या काही दिवसात कळणार आहे. येणाऱ्या काळात पाऊस झाला तरच शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT