Deep fake : रश्मिका मंदानानंतर रतन टाटांचा डिपफेक व्हिडिओ व्हायरल, व्हिडीओत काय?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

ratan tata deepfakes video viral on social media online betting fraud rashmika mandanna katrina kaif deep fake video
ratan tata deepfakes video viral on social media online betting fraud rashmika mandanna katrina kaif deep fake video
social share
google news

Ratan Tata Deep fake Video viral : गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध व्यक्तींचे डिपफेक व्हिडिओ (Deep Fake Video) व्हायरल होण्याचे प्रमाण वाढले आहे. याआधी साऊथची अभिनेत्री रश्मिका मंदना (Rashmika Mandana) आणि कतरीना कैफचा (Katrina Kaif) डिपफेक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर आता प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांचा डिपफेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून ऑनलाइन सट्टेबाजांच्या घोटाळ्यात सामान्य नागरीकांना अडकवण्याचा प्रयत्न सूरू असल्याची माहिती आहे. नेमकं या डिपफेक व्हिडिओत काय आहे? हे जाणून घेऊयात. (ratan-tata deepfakes video viral on social media online betting fraud rashmika mandanna katrina kaif deep fake video)

ADVERTISEMENT

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या या डिपफेक व्हिडिओच्या माध्यमातून ऑनलाइन सट्टेबाजीच्या घोटाळ्यात सर्वसामान्यांना अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडिओमध्ये, रतन टाटा एका ऑनलाइन सट्टेबाजी प्रशिक्षकाचे समर्थन करताना आणि लोकांना अमीर खान नावाच्या एका व्यक्तीद्वारे चालवल्या जाणार्‍या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील होण्याचे आवाहन करताना दिसत आहे.

हे ही वाचा : MLAs Disqualification Case : “ठाकरेंचा शिंदेंबद्दलचा ‘तो’ ठराव बनावट”

व्हिडिओत काय बोलतायत रतन टाटा?

रिपोर्टनुसार, या फेक व्हिडिओमध्ये प्रसिद्ध उद्योगपती टाटा म्हणतात की, लोक मला दरवेळी विचारतात की श्रीमंत कसे व्हायचे? तर मी तुम्हाला आमिर खानबद्दल सांगू इच्छीतो. भारतातही अनेकांनी एव्हिएटर खेळून लाखोंची कमाई केली आहे. त्यांचे प्रोग्रामर, विश्लेषक आणि कृत्रिम बुद्धिमत्ता ChatGPT यांना धन्यवाद, जिंकण्याची शक्यता 90% पेक्षा जास्त आहे.रतन टाटा यांच्या चेहऱ्याचा वापर करून बनवलेला हा व्हिडिओ आर्थिक फसवणूक आणि घोटाळे करण्यासाठी डीपफेक व्हिडिओ कसे वापरले जाऊ शकतात हे दर्शविते.

हे वाचलं का?

इंडिया टूडे फॅक्टचेक

या व्हिडिओबाबत इंडिया टूडेने केलेल्या फॅक्टचेकमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. इंडिया टूडेने केलेल्या फॅक्टचेकनुसार, आमिर खान हा एक घोटाळेबाज आहे, आणि तो @aviator_ultrawin नावाने टेलिग्राम चालवतो. तो या चॅनेलवरून दावा करतो की , एव्हिएटर हा बेटींग गेम खेळून तुम्ही दरदिवशी कमीत कमी 1 लाख कमवू शकता. तसेच गेम खेळण्यासाठी तो एविएटरवर रजिस्ट्रेशन करण्याचे आवाहन करतो.

हे ही वाचा : Crime : लग्नाच्या पहिल्याच रात्री घात, खिरीमध्ये गुंगीचे औषध मिसळून…लग्नघरात काय घडलं?

इंडिया टुडे फॅक्ट चेकनुसार, “एविएटर” गेम नोंदणीसाठी एक लिंक दिली गेली आहे, त्यावर क्लिक केल्यावर तुम्ही इतर वेबसाइटवर पोहोचता. येथे तुम्हाला मोबाईल नंबर आणि ईमेलसह नोंदणी करण्यास सांगितले जाते. ही एक सामान्य प्रक्रिया आहे जी स्कॅमर्स डेटा मिळविण्यासाठी वापरतात.

ADVERTISEMENT

भारताच्या गेमिंग कायद्यामध्ये सध्या बदल होत आहे. तसेच ऑनलाइन सट्टेबाजी खेळांचे नियमन करण्यासाठी कोणताही विशिष्ट कायदा पारीत नाही. मागील वर्षी, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सट्टेबाजीच्या जाहिरातींबाबत एक सल्लागार जारी केला होता, ज्यामुळे वापरकर्त्यांना होणाऱ्या आर्थिक जोखमींमुळे ऑनलाइन आणि ऑफलाइन सट्टेबाजीला चालना देऊ नये असा सल्ला दिला होता. पण अद्याप कठोर असा कायदा नाही आहे. त्यामुळे नागरीकांनी सतर्क रहावे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT