Samruddhi Mahamarg Accident : पूल कसा कोसळला, मृत्यु झालेल्या 17 लोकांची नावं काय?
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात समृद्धी महामार्गावर पूलाचा गर्डर कोसळला. या दुर्घटनेत 17 कामगारांचा मृत्यू झाला आहे.
ADVERTISEMENT

Samruddhi Mahamarg Accident latest : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाने पुन्हा 17 जणांचे प्राण घेतले. समृद्धी महामार्गाचे तिसऱ्या टप्प्यातील काम सुरु असताना हा भयंकर अपघात झाला. दुर्घटना घडल्यानंतर शोध आणि बचाव कार्य हाती घेण्यात आलं. ढिगाऱ्याखालून 17 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. तर 3 जण जखमी झाले आहेत. या घटनेची सविस्तर माहिती प्रशासनाकडून देण्यात आली असून, मृत्यू झालेल्यांची नावेही समोर आली आहेत.
समृद्धी महामार्ग अपघात : कुठे आणि कधी कोसळला पूल?
शहापूर तालुक्यातील सरलांबे गावाजवळील सिंगापूर येथे मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर काम सुरू असताना अत्याधुनिक पद्धतीचा ग्रेडर लाँचर पुलावर पडला. मंगळवारी (1 ऑगस्ट) पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास ही घडली. घटनेतील जखमींना उपचारासाठी ठाण्यातील कळवा रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र कळवा रुग्णालयात न्यूरोसर्जन नसल्याकारणाने कामगारांना मुंबई येथील सायन रुग्णालयात हलविण्यात आले.
वाचा >> Firing: ‘ये सब PAK से ऑपरेट हैं…’, जयपूर-मुंबई ट्रेनमधील ‘तो’ व्हिडिओ व्हायरल
मिळालेल्या माहितीनुसार, हा ब्रीज सुमारे 90 ते 100 फूट उंचीचा असून, नवयुगा या कंपनीला या पुलाचे कंत्राट देण्यात आलेले आहे. या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेतली जात नसल्यामुळे ही दुर्घटना घडली असल्याचं म्हटलं जात आहे.
वाचा >> whatsapp scam : लाईक्स आमिष अन् ठाण्यातील व्यक्तीने गमावले 37 लाख, तुम्ही ही चूक करू नका
दुर्घटना घडलेल्या ठिकाणी NDRF जवान आणि ठाणे महानगर पालिकेचे TDRF जवान युद्ध पातळीवर बचाव कार्य करत आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांचा शोध सुरूच असून, ग्रेडर कापून बाजूला करण्याचे काम सुरू आहे.
मृत्यू झालेल्या कामगारांची नावं
1) गणेश रॉय
2) ललन राजभर
3) परमेश्वर सहानी
4) प्रदीप रॉय
5) राजेश शर्मा
6) संतोष जैन
7) राधेश्याम यादव
8) आनंद यादव
9) पप्पू कुमार
10) कन्नन
11) सुब्रमण्य सरकार
12) अरविंद कुमार
13) सुरेंद्र पासवान
14) बळीराम सरकार
15) मनोज सिंह
16) नितीन सिंह
समृद्धी महामार्गावरील अपघाताची चौकशी
या घटनेची माहिती मिळताच कॅबिनेट मंत्री दादा भुसे पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. ही ग्रेडर लाँचर यंत्रणा सिंगापूर येथील अतिशय अद्यावत असल्याचे दादा भुसे यांनी सांगितले. या लाँचरच्या सहाय्याने आता पर्यंत 98 ग्रेडर यशस्वीपणे लाँच केले होते. काही तांत्रिक कारणांमुळे सदरचा अपघात झाले असल्याची माहिती आहे. सध्या वाचलेल्या कामगारांना उपचार देणे महत्त्वाचे असून, हा अपघात कसा झाला याची चौकशी करणार असल्याचे देखील दादा भूसे यांनी सांगितले.