Sangli News : पोहत पोहत मगरीजवळ गेला, अन् लोकांच्या काळजाचा ठोका चुकला
सांगलीच्या कृष्णाकाठाव अनेक जण पोहण्यासाठी येत असतात. लोकांना नदीत मगर आहेत हे माहितीही आहे. तरीही पोहणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. पण आज वेगळीच घटना घडली, कृष्णा नदीत एकाच वेळी राजदीप आणि मगर हे दोघंही एकमेकांसमोर पोहत असताना दिसले आणि लोकांच्या काळाजाच ठोका चुकला.
ADVERTISEMENT
Sangli News : सांगलीच्या कृष्णा नदीत पोहण्याचा सराव करणाऱ्या एका जलतरणपटूला मगरीने जीवनदान दिल्याची घटना घडली आहे. आज सकाळी कृष्णा नदी पात्रात जलतरणपटू शरद राजदीप हे सरावासाठी नदीत उतरले होते. ते ज्या ठिकाणी पोहत होते तेथून अगदी 15 फुटांवर एक अजस्त्र मगरही पोहत होती. मात्र यावेळी राजदीप यांचे मगरीकडे लक्ष नव्हते. मगर आणि राजदी हे समोरासमोर आहेत हे लोकांना दिसत होते. त्यावेळी लोकांनी आरडाओरडा करून शरद राजदीपला समोर मगर असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या कानात एअर प्लग असल्याने तो पाण्याखाली पोहण्यात तल्लीन झालेला होता. लोकांचे म्हणणे त्यांना काहीच ऐकू येत नव्हते.
ADVERTISEMENT
पोहण्यात राजदीप मग्न
राजदीप पाण्यात पोहत असताना मगर अगदी पोहत पोहत त्याच्या जवळ आली. पण अचानक मगरीनेच आपला मार्ग बदलला, आणि ती बाजूने निघून गेली. हे सगळं चित्र अनेकजण नदीकाठावरुन पाहते होते. त्यामुळे राजदीपला मृत्यू स्पर्श करुन गेला अशीच भावना व्यक्त होत राहिली.
हे ही वाचा >> Eknath Shinde: ‘आपण बोलून मोकळं व्हायचं ना…’, शिंदे-फडणवीसांचा ‘तो’ VIDEO का होतोय व्हायरल?
ते चित्र मोबाईलमध्ये कैद
मगरीच्या समोर येऊन ही शरद सुखरूपपणे बचावले आहेत. मात्र नदीतील मगर आणि राजदीप यांना आता नदीकाठावर थांबलेल्या अनेक लोकांनी त्यांना कॅमेऱ्यामध्ये कैद केले आहे. मगर त्याच्या जवळून निघून गेल्यानंतर मात्र अनेक लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
हे वाचलं का?
काळ आला होता..
पोहण्यात तल्लीन असलेल्या राजदीप यांनी नंतर हे सगळं चित्र मोबाईलमध्ये पाहिले तेव्हा मात्र काळ आला होता, पण वेळ आली नव्हती अशीच त्याची अवस्था झाली होती.
ADVERTISEMENT
कृष्णेत अजस्त्र मगरींचा वावर
सांगलीतील कृष्णा नदीत असंख्य लोक रोज सकाळी पोहायला उतरतात. इतरांप्रमाणेच शरद राजदीपही कृष्णा नदीत पोहण्याचा सराव करतात. पोहण्यासाठी गर्दी असली तरी सांगलीचा बायपास रस्त्यावरील नवा पूल ते बंधारा या भागात अजस्त्र मगरींचा वावर आहे. दररोज एक तरी मगर त्या मार्गाने पाण्यातून फिरताना दिसते.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Maratha Reservation : ‘भिडे गुरूजी सरकारचा सांगकाम्या…’, विजय वड्डेटीवार भडकले
मगर-शरद समोरासमोर
शरद राजदीप पोहत असताना त्यांनी एअर प्लगचा वापर केला होता. त्यामुळे मगर आणि शरद एकमेकांसमोर आल्यावर लोकांनी त्यांना ओरडून सांगूनही त्यांना लोकांचा आवाज ऐकू आला नाही. तरीही राजदीप पोहण्यात तल्लीन होत मगर आणि ते समोरासमोर आले. बघणाऱ्या लोकांना काही तरी अनर्थ घडणार असं वाटत होते. मगर स्पष्टपणे पाण्यावर दिसत असताना अचानक ती दोघं समोरा समोर आली आणि अचानक मगरीने वाट बदलत पाण्यात आत निघून गेली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT