Ayodhya Poul: ठाण्यात मारहाण, शाईफेक.. ठाकरे गटाच्या अयोध्या पौळ म्हणाल्या; ‘हा तर ट्रॅप…’

मुंबई तक

ADVERTISEMENT

shiv sena thackeray group ayodhya poul pelted ink beaten kalwa thane shinde group
shiv sena thackeray group ayodhya poul pelted ink beaten kalwa thane shinde group
social share
google news

Politics of Maharashtra: मुंबई: शिवसेना (UBT) पक्षाच्या सोशल मीडिया राज्य समन्वयक आणि पदाधिकारी अयोध्या पौळ (Ayodhya Poul) यांच्यावर काल (16 जून) रात्री ठाण्याजवळील कळवा भागात जाहीर कार्यक्रमात शाईफेक करण्यात आली. तसेच काही महिलांकडून त्यांना मारहाण देखील केली गेली. मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त कळव्यात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमासाठी आलेल्या असताना त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. (shiv sena thackeray group ayodhya poul pelted ink beaten kalwa thane shinde group)

ADVERTISEMENT

कळव्यातील मनीषा नगर येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान हा कार्यक्रम मात्र ठाकरे गटाचा नव्हता. तर मला मारहाण करण्यासाठी एक ट्रॅप रचण्यात आला होता असा आरोप पौळ यांनी केला आहे.

या प्रकरणी अयोध्या पौळ यांनी असंही म्हटलं की, ‘सुषमा अंधारे आणि खा. राजन विचारे, ठाकरे गट ठाणे जिल्हा अध्यक्ष केदार दिघे देखील या कार्यक्रमास येणार असल्याचे भासवून मला आमंत्रित केलं

हे वाचलं का?

अयोध्या पौळ यांच्यासोबत काय घडलं?

दरम्यान, कळव्यात कार्यक्रमासाठी पोहचल्यानंतर अयोध्या पौळ या सर्व महापुरुषांच्या फोटोला हार घालत असताना तुम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला शेवटी हार का घातला? असा अजब सवाल करत स्थानिक महिलांनी पोळ यांच्यावर प्रथम शाई फेकली आणि नंतर त्यांना मारहाण करण्यात आली.

हे ही वाचा >> Chawadi: 20 वर्षांपूर्वीच महाविकास आघाडी झाली असती, फक्त…; प्रफुल पटेलांचा गौप्यस्फोट

यावेळी ठाकरे गटाच्या कोणताही पदाधिकारी या ठिकाणी नाहीत हे लक्षात आल्याने. हा ठाकरे गटाचा कार्यक्रम नसून हा ट्रॅप रचण्यात आला असल्याचे स्थानिक ठाकरे गटातील महिला पदाधिकारी यांनी यावेळी सांगितले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

याप्रकरणी पौळ या कळवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविण्यासाठी गेलेल्या असताना देखील पोलीस स्टेशनबाहेर पोलिसांसमोर देखील धक्काबुक्की आणि मारहाण करण्यात आली. यानंतर पोलिसांनी अयोध्या पोळ यांची तक्रार नोंदवून घेत पोलीस स्टेशन बाहेर जमलेल्या शिंदे गटाच्या महिला तसेच पुरुष कार्यकर्त्याना पांगवले.

हे ही वाचा >> Chawadi: ‘साहेबांशी माझे संबंध कसे हे कळायला अजित पवारांना…’, प्रफुल पटेल असं का म्हणाले?

शाईफेक आणि मारहाणीच्या घटनेनंतर अयोध्या पौळ काय म्हणाल्या?

‘मी अन् माझा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालतो अन माझ्या देशाचे #संविधान कोणावरही हात उचलायची परवानगी देत नाही म्हणून होते असलेला हल्ला अहिंसेचा मार्ग अवलंबत सहन करत होते, माझी लढाई ही संविधानिक आहे अन् मी ती लढेल. आज माझा #शिवसेना पक्ष, माझे नेते-उपनेते, आमदार अन लाखो #शिवसैनिक माझ्या सोबत होता. लढण्याची ताकद तुम्ही दिली सर्वांनी.’

टीप : एक एक करुन व्हिडिओ समोर येत आहेत ते सोशल मीडियावर शेअर करेलच आणि घडलेला प्रकार तुम्हा सर्वांच्या पुढे मांडेल.

असं ट्विट अयोध्या पौळ यांनी केलं आहे. ज्यानंतर आता या संपूर्ण घटनेचा शिवसेनेकडून निषेध करण्यात येत असून संबंधित आरोपींविरोधात कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT