Atal Setu Toll Rate: सागरी सेतूवरुन जायचं असेल तर ‘एवढे’ पैसे द्यावेच लागतील, पाहा Toll Rate

रोहित गोळे

ADVERTISEMENT

shivdi nhava sheva atal setu roll rate if you want to go to sea bridge inaugurated by pm modi you have to pay too much rupees see toll rate
shivdi nhava sheva atal setu roll rate if you want to go to sea bridge inaugurated by pm modi you have to pay too much rupees see toll rate
social share
google news

Mumbai Trans Harbour Link Atal Setu: मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (12 जानेवारी) देशातील सर्वात मोठा असलेल्या सागरी सेतूचं लोकार्पण करण्यात आलं. शिवडी-न्हावा शेवा अटल सागरी सेतूचं पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलं. तब्बल 21 किमी लांबीचा हा सागरी सेतू थेट रायगड जिल्ह्याला मुंबईशी जोडणार आहे. या सेतूमुळे 2 तासाचं अंतर हे अवघ्या 20 मिनिटात कापता येणार आहे. त्यामुळे रायगड आणि नवी मुंबईकरांना मुंबई ही अधिकच जवळ आली आहे. पण याच सेतूवरून जर आपल्याला प्रवास करायचा असेल तर त्याचा टोल देखील तेवढाच भरभक्कम भरावा लागणार आहे. (ashivdi nhava sheva atal setu roll rate if you want to go to sea bridge inaugurated by pm modi you have to pay too much rupees see toll rate)

ADVERTISEMENT

शिवडी ते न्हावा शेवा हा सागरी सेतू उभारण्यासाठी तब्बल 21 हजार कोटींहून अधिकचा खर्च आला आहे. त्यामुळे आता हेच पैसे टोलच्या माध्यमातून सरकार वसूल करणार आहे. सुरुवातीला या मार्गासाठी 500 रुपये टोल आकारण्यात यावा अशी मागणी केली जात होती. मात्र, नंतर एकेरी वाहतुकीसाठी 250 रुपये टोल निश्चित करण्यात आला होता. पण हा टोल केवळ चार चाकी कारसाठीच होता. इतर वाहनांसाठी टोल हा वेगवेगळा असून आता त्याचं दर पत्रक देखील समोर आलं आहे.

हे वाचलं का?

या सागरी सेतूवरून कारने जर आपण दोन्ही बाजूने प्रवास करणार असाल तर आपल्याला त्यासाठी 375 रुपये टोल मोजावा लागणार आहे. पण एकाच बाजूने प्रवास करणार असाल तर मात्र 250 रुपये द्यावे लागतील. याशिवाय दैनंदिन पास 625 रुपये आणि मासिक पास (कारसाठी) 12,500 रुपये एवढा असणार आहे.

CAR –

  • एकेरी वाहतुकीसाठी – 250 रुपये टोल
  • परतीच्या प्रवासासाठी – 375 रुपये टोल
  • दैंनदिन पास – 625 रुपये टोल
  • मासिक पास 12,500 रुपये टोल

LCV/Mini Bus –

  • एकेरी वाहतुकीसाठी – 400 रुपये टोल
  • परतीच्या प्रवासासाठी – 600 रुपये टोल
  • दैंनदिन पास – 1000 रुपये टोल
  • मासिक पास 20,000 रुपये टोल

BUS/2-AXLE Truck –

  • एकेरी वाहतुकीसाठी – 830 रुपये टोल
  • परतीच्या प्रवासासाठी – 1245 रुपये टोल
  • दैंनदिन पास – 2075 रुपये टोल
  • मासिक पास 41,500 रुपये टोल

MAV (2 AXLE) –

  • एकेरी वाहतुकीसाठी – 905 रुपये टोल
  • परतीच्या प्रवासासाठी – 1360 रुपये टोल
  • दैंनदिन पास – 2265 रुपये टोल
  • मासिक पास 45,250 रुपये टोल

MAV (4 to 6 AXLE) –

  • एकेरी वाहतुकीसाठी – 1300 रुपये टोल
  • परतीच्या प्रवासासाठी – 1950 रुपये टोल
  • दैंनदिन पास – 3250 रुपये टोल
  • मासिक पास 65,000 रुपये टोल

Oversized

  • एकेरी वाहतुकीसाठी – 1580 रुपये टोल
  • परतीच्या प्रवासासाठी – 2370 रुपये टोल
  • दैंनदिन पास – 3950 रुपये टोल
  • मासिक पास 79,000 रुपये टोल

ADVERTISEMENT

टोलचे हे दर आजपासून म्हणजेच 13 जानेवारी 2024 ते 31 जानेवारी 2024 पर्यंतच असणार आहे. म्हणजेच पुढच्या वर्षी या दरात बदल करण्याचा निर्णय सरकार घेऊ शकतं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT