Solapur : रेल्वेसमोर उडी घेतली, मृतदेहाचे झाले चार तुकडे, भावी डॉक्टराने आयुष्य का संपवलं?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

solapur news mbbs second year student end her life shocking story
solapur news mbbs second year student end her life shocking story
social share
google news

Solapur News : सोलापूर (Solapur)  जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका भावी डॉक्टरने (Doctor Student) आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याची घटना घडली आहे. भावी डॉक्टरने रेल्वेसमोर उडी देऊन आत्महत्या केली आहे. या घटनेत त्याच्या शरीराचे चार तुकडे पडले आहेत. सचिन श्रीमंत चौधरी(23) असे या भावी डॉक्टरचे नाव आहे. तो अश्विनी वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होता. या घटनेने चौधरी कुटुंबावर आणि अश्विनी वैद्यकीय महाविद्यालयावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणात आता पोलीस सचिन चौधरीच्या आत्महत्येचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहे. (solapur news mbbs second year student end her life shocking story)

ADVERTISEMENT

सचिन चौधरी हा मूळचा छत्रपती संभाजी नगर(औरंगाबाद) येथील रहिवाशी आहे. सोलापुरातील कुंभारी येथील अश्विनी मेडिकल कॉलेज या खाजगी वैद्यकीय महाविद्यालयत तो एमबीबीएसचे शिक्षण घेत होता. तो द्वितीय वर्षात होता. रविवारी सकाळी दहाच्या सुमारास सचिन चौधरी हॉस्टेलमधून गपचूप बाहेर पडला. सचिन यावेळी होटगी गावाजवळील पुलाखाली गेला. तिकडे जाऊन त्याने रेल्वेसमोर उडी देऊन आत्महत्या केली. यावेळी रेल्वेच्या धडकेत त्याच्या शरिराचे चार तुकडे पडले होते. या घटनेची माहिती स्थानिकांना मिळताच पोलिसांना माहिती दिली.

हे ही वाचा : Lok Sabha 2024 : ठाकरेंची लोकसभेसाठी रणनीती! 10 शिलेदार उतरवले मैदानात

पोलीस घटनास्थळी पोहोचताच सचिन चौधरीचे मृतदेहाचे चार तुकडे पाहून त्यांच्या अंगावरही काटा आला होता. वळसंग पोलिसांनी पंचनामा करुन तुकडे झालेला सचिनचा मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनसाठी पाठवला. यावेळी अश्विनी वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सोलापूर मधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी केली होती. वडिल श्रीमंत चौधरी यांना देखील माहिती देण्यात आली असून औरंगाबाद येथून सोलापूरकडे ते रवाना झाले आहेत.

हे वाचलं का?

दरम्यान श्रीमंत चौधरी यांना सचिन हा मोठा मुलगा होता.सचिन हा शालेय जीवनापासून अतिशय हुशार विद्यार्थी होता.सचिनचे वडील श्रीमंत चौधरी औरंगाबाद(छत्रपती संभाजी नगर) येथे शेती करतात. बारावीला चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर लाखो रुपये फी भरून कुटुंबियांनी सचिनला अश्विनी मेडिकल कॉलेज सोलापूर येथे अॅडमिशन केले. सचिन हा घरात पहिलाच डॉक्टर होणार होता. एमबीबीएसच्या प्रथम वर्षांत सुद्धा सचिनने चांगले गुण मिळवले होते. द्वितीय वर्षांत मात्र सचिनने स्वतःच्या आयुष्याचा शेवट केला आहे.

हे ही वाचा : Deepak Kesarkar :’…तर तुम्हाला अपात्र करेन’, मंत्री केसरकर भावी शिक्षिकेवर का भडकले?

दरम्यान आता सचिन चौधरी याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले? त्याच्या मृत्यूचे खरे कारण काय आहे? याचा तपास पोलीस करीत आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT