1 January 2025 Gold Rate: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोनं गडगडलं! मुंबईसह मोठ्या शहरांत 'इतक्या' रुपयांनी महागलं
Gold Rate Today : नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे आणि जगभरात सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचं स्वागत करण्यात आलंय. परंतु, देशातील सराफा बाजारात आज महिन्याच्या पहिल्याच तारखेला म्हणजे 1 जानेवारीला सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सोन्याच्या किंमतीची आकडेवारी पाहून थक्कच व्हाल

आज सोन्याच्या दरात किती रुपयांनी झाली वाढ?

मुंबईत 1 तोळा सोन्याचा भाव काय?
Gold Rate Today : नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे आणि जगभरात सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचं स्वागत करण्यात आलंय. परंतु, देशातील सराफा बाजारात आज महिन्याच्या पहिल्याच तारखेला म्हणजे 1 जानेवारीला सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. काल 31 डिसेंबरला सोन्याच्या दरात काही ठिकाणी घट झाल्याचं समोर आलं होतं. आज बुधवारी सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा भाव 440 रुपयांनी वाढला आहे. बाजारात आज 22 कॅरेट सोन्याची प्रति ग्रॅमची किंमत 7150 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमची किंमत 7800 रुपयांवर पोहोचली आहे.
आज सोन्याचे भाव भिडले गगनाला
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोन्याची चमक वाढली आहे. देशात आज 1 जानेवारीला सोन्याचे भाव वाढले आहेत. येथील सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 400 रुपयांनी महागले आहेत. यानुसार सोन्याच्या 10 ग्रॅमचा रेट 71500 रुपयांवर पोहोचला आहे. तसच 100 ग्रॅम सोन्याचा भावही 4000 रुपयांनी वाढला असून याची किंमत 715000 रुपये झाली आहे. तर 24 कॅरेट सोन्याचे दर आज 1 जानेवारीला 440 रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 78000 रुपये झाली आहे. तसच 100 ग्रॅमची किंमतही 4400 रुपयांनी वाढली असून याचे आताचे दर 780000 रुपये झाले आहेत.
हे ही वाचा >> Walmik Karad Beed : वाल्मिक कराडने रात्री जेवण केलं नाही, सकाळी नाश्ताही टाळला? संध्याकाळी जेवायला काय मागितलं?
मुंबई
मुंबईत आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमची किंमत 7150 रुपये झाली आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा भाव 7800 रुपये झाला आहे.
नवी दिल्ली
आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमची किंमत 7150 रुपये झाली आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा भाव 7800 रुपये झाला आहे.
बंगळुरू
बंगळुरुत 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमची किंमत 7150 रुपये झाली आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा भाव 7800 रुपये झाला आहे.
हे ही वाचा >> Ashatai Pawar Pandharpur : "शरद पवार आणि अजितदादांना एकत्र येऊदेत...", अजित पवार यांच्या आईचं विठुरायाकडे साकडं
लखनऊ
लखनऊमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमची किंमत 7165 रुपये झाली आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा भाव 7815 रुपये झाला आहे.
नोएडा
नोएडामध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमची किंमत 7165 रुपये झाली आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा भाव 7815 रुपये झाला आहे.