इअरफोन घालणं जीवावर बेतलं.. 16 वर्षांच्या मुलीचा कसा गेला जीव?

मुंबई तक

16 year old girl died after being hit by a train while crossing the railway track wearing earphones a tragic incident in palghar

ADVERTISEMENT

पालघरमध्ये 16 वर्षीय मुलीचा रेल्वे अपघातात मृत्यू (ai image)
पालघरमध्ये 16 वर्षीय मुलीचा रेल्वे अपघातात मृत्यू (ai image)
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पालघरमध्ये 16 वर्षीय मुलीचा रेल्वे अपघातात मृत्यू

point

इअरफोन घालून रेल्वे ट्रॅकमधून चालत जात होती 16 वर्षीय मुलगी

point

इअरफोन घालणं बेतलं जीवावर

पालघर: पालघरमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका 16 वर्षांच्या मुलीचा एक्सप्रेस ट्रेनने धडक दिल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा मुलगी रेल्वे ट्रॅक ओलांडत होती तेव्हा तिने कानात इअरफोन घातले होते. त्यामुळे तिला ट्रेनचा आवाज आला नाही आणि त्यामुळेच झालेल्या अपघातात तिचा मृत्यू झाल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. (16 year old girl died after being hit by a train while crossing the railway track wearing earphones a tragic incident in palghar)

ती इअरफोन घालून रेल्वे ट्रॅक ओलांडत होती

गुरुवारी दुपारी 1.10 वाजता सफाळे आणि केळवे रोड रेल्वे स्थानकांदरम्यान ही घटना घडल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यातील माकणे गावातील वैष्णवी रावल ही तरुणी रेल्वे रुळ ओलांडत असताना कोचुवेली-अमृतसर सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेनने तिला धडक दिली. सरकारी रेल्वे पोलिसांच्या (जीआरपी) एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुलीने इअरफोन लावले असल्याने तिला जवळून येणाऱ्या ट्रेनचा आवाज ऐकू आला नाही. मुलीच्या मृत्यूची बातमी कळताच तिच्या कुटुंबीयांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा>> Maharashtra Bandhara Blast : भंडाऱ्यात ऑर्डनन्स फॅक्ट्रीमध्ये भीषण स्फोट, दूरपर्पयंतचा परिसरा हादरला...

अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीला गंभीर दुखापत झाली होती आणि तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. पण इथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सध्या, तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे आणि अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

हे ही वाचा>> Jalgaon Train Accident : "चहा वाल्यानं सांगितलं आग लागली, म्हणून लोकांनी रेल्वेतून खाली उड्या मारल्या"

दरम्यान, गुरुवारी दुपारच्या सुमारास उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात 12533 लखनौ-मुंबई पुष्पक एक्सप्रेसमधून उडी मारल्याने 12 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली होती. ट्रेनमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्याने पुष्पक एक्सप्रेसमधील प्रवाशांनी लगतच्या ट्रॅकवर उड्या मारल्या. पण त्याचवेळी समोर येत असल्याने बंगळुरू-दिल्ली कर्नाटक एक्सप्रेसने त्यांना धडक दिली. ज्यामध्ये प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

हे वाचलं का?

    follow whatsapp