Pune: पुण्यात 19 वर्षीय तरूणीवर बलात्कार, भावासोबत बसवून काढले आक्षेपार्ह व्हिडीओ

मुंबई तक

रांजणगाव पोलीस ठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला तिच्या चुलत भावासोबत तिच्या घराजवळील एका निर्जन ठिकाणी बसली होती. तेव्हा दोन तरुण दुचाकीवरून तिथे आले.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बलात्काराच्या घटनेनं पुणे जिल्हा पुन्हा हादरला

point

शिरूरमध्ये 19 वर्षीय तरूणीचा बलात्कार

point

पोलिसांनी अवघ्या दोन तासांत केली आरोपीला अटक

Pune : पुण्यात गेल्या काही दिवसांपूर्वीच स्वारगेट बस स्थानकावर झालेल्या घटनेनं महाराष्ट्र हादरला होता. त्यानंतर आता पुणे जिल्ह्यात पुन्हा एक चीड आणणारी घटना घडली आहे. शनिवारी रात्री शिरूरमध्ये दोन तरुणांनी चाकूचा धाक दाखवून 19 वर्षीय मुलीवर बलात्कार केला. नराधम एवढ्यावरच थांबले नाही, तर आरोपीने पीडिता आणि तिच्या चुलत भावाला जबरदस्तीने आक्षेपार्ह स्थितीत बसवलं आणि संपूर्ण घटनेचा व्हिडिओही बनवला. (Pune Crime News)

कशी घडली घटना?

रांजणगाव पोलीस ठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला तिच्या चुलत भावासोबत तिच्या घराजवळील एका निर्जन ठिकाणी बसली होती. तेव्हा दोन तरुण दुचाकीवरून तिथे आले. त्यांनी दोघांनाही चाकूने धमकावलं आणि जबरदस्तीने व्हिडिओ बनवला. यानंतर दोन्ही आरोपींनी मुलीवर एक-एक करून बलात्कार केला आणि सोन्याचे दागिनेही लुटले.

हे ही वाचा >> सहजासहजी नाही झाला धनंजय मुंडेंचा राजीनामा, ही आहे Inside स्टोरी.. क्रोनोलॉजी पाहा!

या घटनेनंतर धाडस दाखवत मुलीने तात्काळ 112 वर फोन करून पोलिसांना माहिती दिली. पोलिस पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि गुन्हा दाखल केला.

आरोपीला 2 तासांत अटक

पोलिसांनी घडलेल्या घटनेची दखल घेत, वेळ न घालवता आरोपींची माहिती  गोळा केली आणि त्यांचा शोध सुरू केला. दोन्ही आरोपींना अवघ्या दोन तासांत अटक करण्यात आली. पोलिसांनी लुटलेले सोन्याचे दागिनेही जप्त केले आहेत.

हे ही वाचा >> Karuna Munde : धनंजय मुंडेंना हिंमतीने भिडली, करूणा मुंडे आहे तरी कोण? वाचा सगळी हिस्ट्री!

आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (BNS) संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपीला 7 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp