Dharashiv : शिंदे कॉलेजच्या फेअरवेलमध्ये 'त्या' विद्यार्थीनीचा अचानक झाला मृत्यू! भाषण सुरु असताना काय घडलं?

मुंबई तक

Dharashiv Viral News : धाराशिवमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. एका कॉलेजमध्ये फेयरवेलच्या इव्हेंटला स्टेजवर भाषण देणाऱ्या 20 वर्षीय विद्यार्थीनीचा दुर्देवी मृत्यू झाला.

ADVERTISEMENT

Dharashiv Viral News
Dharashiv Viral News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

धाराशिवमध्ये शिंदे कॉलेजमध्ये घडली धक्कादायक घटना

point

भाषण देत असताना विद्यार्थीनी अचानक स्टेजवर कोसळली अन्...

point

नेमकं घडलं तरी काय?

Dharashiv Viral News : धाराशिवमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. एका कॉलेजमध्ये फेयरवेलच्या इव्हेंटला स्टेजवर भाषण देणाऱ्या 20 वर्षीय विद्यार्थीनीचा दुर्देवी मृत्यू झाला. स्टेजवर भाषण सुरु असताना तरुणी अचानक बेशुद्ध झाली आणि तिचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना कॅमेरात कैल झाली असून व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. वर्षा असं मृत विद्यार्थीनीचं नाव आहे. या दुर्देवी घटनेमुळे धाराशिवमध्ये शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शिंदे कॉलेज परंडा येथील आहे. कॉलेजच्या मित्र-मैत्रिणींना पाहून चेहऱ्यावर हास्य फुललं आणि त्या विद्यार्थीनीने आपलं भाषण सुरु केलं. हसत हसत ही विद्यर्थीनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना संबोधीत करत होती. पण काही सेकंदातच होत्याचं नव्हतं झालं. वर्षा स्टेजवरून खाली कोसळली.

हे ही वाचा >> "मित्रांना हा व्हिडीओ व्हायरल करा" म्हणत तरूणानं इमारतीवरुन उडी घेत स्वत:ला संपवलं, तपासात काय समोर आलं?

त्यानंतर उपस्थित लोकांनी स्टेजवर तातडीनं धाव घेतली आणि वर्षाला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, वर्षा शुद्धीवर आली नाही. त्यामुळे तिला परंडा येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. रिपोर्टनुसार, 8 वर्षांची असतानाच वर्षाची हार्ट सर्जरी झाली होती.

परंतु, मागील 12 वर्षांपासून तिचं आरोग्य उत्तम होतं. ती कोणत्याही प्रकारचे औषधे घेत नव्हती. वर्षाला हार्ट अटॅक आल्याने तिचा मृत्यू झाला, अशी प्राथमिक माहिती आहे.या हृदयद्रावक घटनेनंतर कॉलेजसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. वर्षाचा मृत्यू झाल्याने कॉलेज प्रशासनाने एक दिवसाचा दुखवटा घोषित केला आहे. 

हे ही वाचा >> Eknath Khadse :"बायकांना बोलवायचं, फोन करायचं...", गिरीश महाजनांचे महिला IAS अधिकाऱ्याशी संबंध, शाहांकडे CDR..

हे वाचलं का?

    follow whatsapp